रॉयल सातारा न्युज* $
~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते साताऱ्यात भ्रष्टाचाराचं रोपटे लावतात
उदयनराजे यांची खरमरीत टीका; जिल्ह्यात एकही भ्रष्टाचार न करणारा उमेदवार त्यांना मिळाला नाही
सातारा : महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्याचे माझ्यावर खूपच प्रेम आहे. मला विरोध करण्यासाठी ते जिल्ह्यात चार चार सभा घेणार आहेत. माझ्या विरोधात त्यांना इतक्या मोठ्या जिल्ह्यामध्ये एकही चारित्र्यसंपन्न उमेदवार मिळाला नाही, आता ते घोटाळ्याचे रोपट जिल्ह्यात लावण्याचा प्रयत्न करत आहेत अशी खरमरीत टीका लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.
सातारा येथील लेक व्ह्यू हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या आजी-माजी नगरसेवकांच्या बैठकीत ते बोलत होते. उदयनराजे म्हणाले, काँग्रेस पुरस्कृत महाविकास आघाडीला लोकांसमोर जाऊन मते मागण्याची नैतिकता राहिली नाही. या पक्षाला जनतेने पाठिंबा दिला त्या पाठिंबाच्या बळावर देशाला 50 वर्ष मागे खेचण्याचं पाप या पक्षाने केले आहे. देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी नरेंद्र मोदी प्रयत्न करत असताना नैतिकता नसलेले लोक विरोधाला विरोध करत लोकांमध्ये गैरसमज पसरवत आहेत. विकासाच्या मुद्द्यावर कायमस्वरूपी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. 21व्या शतकात मोठी स्पर्धा जास्तीत जास्त विकास कामे झाली पाहिजेत त्यासाठी एकी महत्त्वाची आहे वेळ गेली की पुन्हा ती येऊ शकत नाही त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात कामे मार्गी लागायचे असतील तर स्थिरता अत्यंत गरजेचे आहे. राज्यात केंद्रात स्थिर सरकार असेल तर विकास कामे झपाट्याने होतील. स्वार्थापोटी सरकारमध्ये एकत्र आलेले लोक लोकांचा विकास कधीच साधू शकत नाहीत त्यामुळे आपण अत्यंत सावधगिरीने पुढची पाऊले टाकली पाहिजेत.
माझ्या हातात घड्याळ, गळ्यात कमळ आणि खांद्यावर धनुष्य
जिल्ह्याला गतवैभव प्राप्त करून द्यायचे. चुटकीसरशी सगळे प्रश्न सोडवण्याची हिंमत माझ्यात आहे माझ्या गळ्यात कमळ आहे हातात घड्याळ तर खांद्यावर धनुष्यबाण आहे. त्यामुळे या सर्व महायुतीच्या ताकतीच्या जोरावर भविष्यात सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे आमदार निवडून येतील असा विश्वास उदयनराजेंनी व्यक्त केला.
फोटो ओळ
सातारा येथे आयोजित केलेल्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना खासदार उदयनराजे भोसले.
No comments:
Post a Comment