रॉयल सातारा न्युज* $
~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार
उदयनराजे गरजले; उडतारे, भुईंज, किकली, खडकी, विररमाडे, अमृतवाडी कळंभे चिंधवली जांभ गावांना भेटी
वाई : काँग्रेस पक्षातील नेत्यांकडून घोटाळे बाजीचा प्रकार अनेक वर्षे सुरू आहे. जे चुकीच आहे, त्याला चूक म्हणण्याचं धाडस माझ्यात आहे. महायुतीच्या माध्यमातून घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार, असा विश्वास खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला.
भुईंज ता. वाई येथील महालक्ष्मी मंदिरात ग्रामस्थांना संबोधित करताना उदयनराजे बोलत होते. यावेळी माजी आमदार मदन भोसले भाजपच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुरभी भोसले, अर्जुनराव भोसले, सरपंच विजय वेळे, सतीश भोसले, मदन शिंदे, गजानन भोसले मोहन भोसले, ईशान भोसले संजय शिंदे विजय शिंदे विकास पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
उदयनराजे म्हणाले, शिवाजी महाराज हे लोकशाहीचे जनक आहेत. सर्वसामान्य रयतेसाठी त्यांनी काम केले. त्यांचा वारसा सांगत असताना सर्वसामान्यांचा विकास उत्कर्ष करण्यासाठी मी कायमच वाटचाल करत आलो आहे. गैरप्रकार मला खपत नाही. लोकांच्या विश्वासाला तडा जाता कामा नये, हे मी कायमच जपत आलो आहे. भ्रष्टाचारांसोबत जाण्याचे पाप माझ्याकडून घडणार नाही. भ्रष्टाचार करणाऱ्या विरोधातील वैचारिक मत तयार करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत आहे. त्यामुळे मतदारांनी साथ द्यावी.
मदन भोसले म्हणाले, भुईंज गावातील १८ पगड जाती उदयनराजेंच्या पाठीशी आहेत. आम्ही काँग्रेस संस्कृतीत वाढलो आहे परंतु भाजपच्या माध्यमातून नरेंद्र मोदींनी केलेल्या कामाची तुलना कोणाशी होऊ शकत नाही भारत शक्तिशाली विकसित देश म्हणून ओळख निर्माण करण्याचे काम मोदींनी केले आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसदाराला विजयी करण्याची जबाबदारी सर्वांची आहे गावकी भावकीची निवडणूक नसून देशाचे भवितव्य घडवणारी ही निवडणूक असल्याने प्रत्येकाची ही नैतिक जबाबदारी आहे.
दरम्यान, भुईंज येथील नाभिक समाज वीरशैव लिंगायत समाज धनगर समाज मुस्लिम समाज मातंग समाज स्वाभिमानी नाविन्य महिला बचत गट आदी संघटनांच्या वतीने उदयनराजेंना पाठिंब्याचे लेखी पत्र देण्यात आले.
चिंधवली येथे श्री नवलाई देवीचे दर्शन घेतले यावेळी पैलवान जयवंत पवार माणिक पवार बाळासाहेब विधाते माजी आमदार कांताताई नलावडे कविता देशमुख सुनील काटकर विकास शिंदे दीपक ननावरे, सदानंद लेले, संजय शिंदे, विकास पवार, रणजित माने आदी उपस्थित होते.
किकली येथे ग्रामदैवत भैरवनाथाचे दर्शन, मुख्य चौकातील शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले याप्रसंगी कुमार बाबर धनंजय बाबर बबन बाबर सुरेश बाबर शिवाजी बाबर किशोर बाबर सूर्यकांत वाघमारे भानुदास बाबर रामदास बाबर राजेंद्र बाबर वीरसिंग बाबर अनिल बाबर अनिकेत बाबर धनंजय बाबर निलेश बाबर अक्षय बाबर पंकज बाबर यश बाबर धनंजय गायकवाड उपस्थित होते.
जांब येथील भैरवनाथ व हनुमान मंदिरात दर्शन प्रसंगी पैलवान मधुकर शिंदे अक्षय शिंदे सरपंच अभिजीत शिंदे उपस्थित होते. उडतरे येथे ग्रामदैवत श्री काळेश्वर महाराजांचे दर्शन घेतले. या ठिकाणी युवकांचा उत्साह मोठ्या प्रमाणावर जाणवला. याप्रसंगी उपसरपंच चंद्रकांत बाबर, नरेंद्र बाबर प्रवीण पवार प्रकाश पवार दत्तात्रय पवार अवधूत पवार आदी उपस्थित होते
असले येथील भवानी मातेच्या दर्शनप्रसंगी ईशान भोसले विजय वाघ शहाजी वाघ मदन पिसाळ प्रवीण निकम प्रमोद निगडे अमर वाघ स्वप्निल वाघ शशिकला वाघ उपस्थित होते. व्याजवाडी यात्रेनिमित्त श्री बाळ सिद्धनाथ देवस्थान येथे दर्शन घेतले. याप्रसंगी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रोहिदास पिसाळ गणेश पिसाळ तालुकाध्यक्ष दीपक ननावरे किशोर पिसाळ दत्तात्रय कुदळे उपस्थित होते. पाचवड येथे झालेल्या कार्यक्रमात निरव पाटोळे आदित्य इथापे अर्चना इथापे वर्षा जंगम सुनील जंगम धनंजय गायकवाड अमरसिंह गायकवाड रेश्मा गायकवाड दिनेश मोरे संदीप पवार चंद्रकांत भोसले उपस्थित होते. अमृतवाडी येथे सुयोग पाटील सरपंच सचिन रत्नपारखे, अक्षय साळुंखे आदींच्या उपस्थितीत उदयनराजे यानी मार्गदर्शन केले. खडकी येथे सरपंच प्रीतम शिंगटे दीपक जाधव सुनील जाधव संभाजी शिंगटे श्रीकांत शिंगटे सुरज जाधव नामदेव जाधव रमेश शिंगटे प्रशांत शिंगटे योगेश शिंगटे सागर जाधव यांच्या उपस्थितीत मेळावा झाला.
विरमाडे येथे बाळ सिद्धनाथ देवस्थान येथे दर्शन घेतले. यावेळी सरपंच स्वाती कचरे उपसरपंच जयवंत सोनवणे तुषार सोनवणे सविता सोनवणे आत्माराम सोनवणे संगीता सोनवणे उपस्थित होते. कळंबे येथे मानाई देवी चे दर्शन घेतले याप्रसंगी हनुमंत गायकवाड जितेंद्र गायकवाड अभिजीत जाधव संभाजी गायकवाड सुरेश गायकवाड तानाजी शिवथरे संजय शिंदे आदी उपस्थित होते.
वाई तालुका गर्जे उदयनराजे... उदयनराजे
वाई तालुक्यातील गावागावात उदयनराजेंचे अत्यंत उत्साहात स्वागत केले. उदयनराजेंच्या स्वागतासाठी जागोजागी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. भुईंज येथे खुल्या जीपमधून उदयनराजेंची मिरवणूक काढण्यात आली. बाईक रॅली काढून युवकांनी उत्साह वाढवला. ठिकठिकाणी पाठिंब्याचे पत्र देण्यात आले. त्यामुळे वाई तालुका गर्जे उदयनराजे... उदयनराजे असेच चित्र पाहायला मिळाले.
फोटो
भुईंज : येथील महालक्ष्मी मंदिरात आयोजित बैठकीत बोलताना खासदार उदयनराजे भोसले समवेत माजी.आमदार मदन भोसले.
भुईंज : खासदार उदयनराजेंची खुल्या जी मधून काढलेली मिरवणूक. यावेळी उपस्थित माजी आमदार मदन भोसले सुरभी भोसले ईशान भोसले.
No comments:
Post a Comment