$ *रॉयल सातारा न्युज* $
~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏
कोरोनाच्या काळात थेट चित्रातून ' पॉझिटिव्ह ' विचार.
ऋतिक कुंभार हा साताऱ्यातील ल्हासुर्ने या गावचा आहे.
२१ वर्षाच्या ऋतिक हा पुण्यातील कलेचं माहेर घर असणार अभिनव कला महाविद्यालय मध्ये कमर्शिअल आर्ट शिकत आहे....
लॉकडाऊनच्या काळात ऋतिक ने जल रंगामध्ये तसेच अक्रीलिक /ऑईल कलर,डिजिटल चित्र या माध्यमांमध्ये खूप छान प्रकारे चित्र काढलेली आहेत.
ऋतिकने निसर्गचित्रे, व व्यक्तिचित्र ,कारोनाच्या काळात "सर्वांनी घरी रहा व सुरक्षित रहा" असे संदेश देणारे चित्र काढलेली आहेत,तसेच रयतेचे राजे श्री. छ.शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर, अशे अनेक चित्र ऋतीकने काढलेले आहेत.
"गोल्डन सनसेट" हे ऋतिक ने काढलेले खूप मस्त चित्र आहे,या चित्रात शेतकरी व सूर्याचा घरी परतण्याची वेळ ही एकच आहे, सायंकाळी हे दोघे दिवस भर आपले काम करून घरी परतात,या चित्रात कलर ची ठेवण आणि सायंकाळ चा क्षण खूप मस्त चित्रातून मांडलेली आहे..
शेतकऱ्याची बैलगाडी ,निसर्ग,हुबेहूब चित्रातून टिपलेला आहे...
कोरोणाच्या काळात सुद्धा पोसिटीव्ह विचार मांडणार सातारच्या मातीतला हा सुंदर असा चित्रकार ऋतिक कुंभार......
No comments:
Post a Comment