*पत्रकारितेच्या क्षेत्रात नवोदितांना भरपूर संधी संधीचा लाभ उठवा*
- *किशोर बेडकीहाळ*
*ग्रंथालय व्यवस्थापन आणि ग्रामीण पत्रकारिता परीक्षेच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण*
सातारा दि. ५ - पत्रकारितेच्या क्षेत्रात नव्याने येणाऱ्यांना भरपूर संधी या क्षेत्रात आहे मात्र आपण ती कशा पद्धतीने त्या संधीचा उपयोग करून घेतो यावरच सगळे अवलंबून आहे त्यामुळे विकासात्मक व समाजाभिमुख पत्रकारिता करून नावलौकिक संपादन करा असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकीहाळ यांनी सातारा येथे बोलताना केले.
शिवाजी विद्यापीठाच्या दुरशिक्षण केंद्राच्या ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या ग्रंथालय व्यवस्थापन आणि ग्रामीण पत्रकारिता व जनसंवाद प्रमाणपत्र कोर्स चा निकाल लागला असून त्यात उत्तीर्ण झालेल्या दूरशिक्षण केंद्राच्या सातारा जिल्हा विभागीय केंद्राच्या वतीने प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम किशोर बेडकीहाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी प्राचार्य अण्णासाहेब होवाळे , ज्येष्ठ पत्रकार सर्वश्री दिनकर झिंबरे , शिवाजी राऊत , विजय मांडके व जिल्हा समन्वयक डॉ. सूर्यकांत गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना प्रमाणपत्रांचे वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
आपण लिहिलेल्या बातमीत किती उपस्थित त्यांची नावे आपण दिली यापेक्षा आपण अन्याय झालेल्या किती घटनांना वाचा फोडली हे महत्त्वाचे आहे असे विचार शिवाजी राऊत यांनी व्यक्त केले. तर दिनकर झिंबरे यांनी समाजातील तळाच्या घटकाला आपल्या बातमीत स्थान द्यावे असे मत व्यक्त केले.
यावेळी बोलताना विजय मांडके यांनी आपल्या सभोवताली ज्या घटना घडतात त्याचे दिग्दर्शन आपल्या बातमी रूपे लेखनातून आले पाहिजे व त्या गोष्टींना न्याय दिला पाहिजे असे सांगितले.
प्रास्ताविक जिल्हा समन्वयक डॉ सूर्यकांत गायकवाड यांनी केले. आभार प्रशिक्षणार्थी प्रा सुनील गायकवाड यांनी मानले.
Friday, August 11, 2023
*ग्रंथालय व्यवस्थापन आणि ग्रामीण पत्रकारिता परीक्षेच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण*
रॉयल सातारा न्युज* $
~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....
रॉयल सातारा न्युज* $ ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...
-
$ *रॉयल सातारा न्युज* $ ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ *937 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 14 बाधितांचा मृत्यू...
-
$ *रॉयल सातारा न्युज* $ ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏 *1090 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 11 बाधितांचा मृत...
-
$ *रॉयल सातारा न्युज* $ ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏 716 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 8 बाधितांचा मृत्यू ...
No comments:
Post a Comment