रॉयल सातारा न्युज* $
~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
सातारा : - शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेकडुन घरफोडी चोरीचे प्रयत्नाचा गुन्हा उघड करुन दोन सराईत चोरटे जेरबंद करण्यात यश . शाहूपुरी पोलीस ठाणेस दि . 05/06/2022 रोजी रात्री 3.30 वा . चे सुमारास करंजेपेठ सातारा येथील एका घरात घरफोडी चोरी करण्याचा प्रयत्न झाले बाबतची तक्रार प्राप्त झाली होती . नमुद तक्रारी वरुन दि .06 / 06 / 2022 रोजी शाहूपुरी पोलीस ठाणेस गुरनं . 196/2022 भादिवसक , 457,380,511,34 प्रमाणे गुन्हा दाखल आहे . सदरचा गुन्हा दाखल झाले नंतर मा.पोलीस अधीक्षक श्री . अजयकुमार बन्सल , मा . अपर पोलीस अधीक्षक श्री . अजित बोऱ्हाडे , श्री . रणजित पाटील मा . उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग सातारा यांनी शाहूपुरी पोलोस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री . संजय पतंगे यांना नमुद गुन्हा उघडकीस आणणे बाबत सूचना दिलेल्या होत्या . त्याप्रमाणे मा.पोलीस निरीक्षक श्री . संजय पतंगे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सदरचा गुन्हा उघडकीस आणणेसाठी प्रयत्न करीत होते . त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखचे अमलदार नमुद गुन्ह्याचे घटनास्थळी भेट देवून घटनास्थळाचे आजुबाजुचे CCTV फुटेजची पाहणी केली असता त्यामध्ये तीन संशयीत इसम दिसून आले . सदर CCTV फुटेजचे आधारे गुन्हे शाखेचे अंमलदार तीन संशयीत इसमांचा शोध घेत होते . सदर संशयीत इसमाचा शोध घेत असताना दि .06 / 6 / 2022 रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अमलदार यांना गोपनिय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली को CCTV फुटेजमध्ये केंद झालेले तीन इसम हे आकाशवाणी झोपडपट्टीमध्ये राहणारे असून ते आकाशवाणी झोपडपट्टीचे पाठीमागे ओढयाचे कडेला बसलेले आहेत . अशी माहिती मिळाल्याने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार हे तात्काळ सदर ठिकाणी गेले असता त्यांना संशयीत इसम पळून जावु लागले त्यावेळी गुन्हे शाखेच्या अंमलदार यांनी नमुद आरोपीचा पाठलाग केला . तेव्हा त्यापैकी एक इसमास पकडण्यात आले तसेच त्याठिकाणी त्यांची मोटार सायकल मिळुन आल्याने तो ताब्यात घेण्यात आली . ताब्यात घेतलेल्या संशयीत इसमाकडे गुन्हया बाबत विचारपुस केली , परंतु त्याने उडवा उडवीची उत्तरे दिल्याने पोलीसांनी त्याचेकडे कौशल्याने तपास केला असता त्याने नमुद गुन्हयाची कबुली दिली . तसेच त्याचे साथीदारांचे बाबत माहिती दिली . त्यानंतर दि .07 / 06 / 2022 रोजी उर्वरीत संशयीत इसमाचा शोध घेत असताना गुन्हयातील दुसरा संशयीत इसमास पकडण्यात गुन्हे शाखेच्या अंमलदारांना यश आले आहे . अशा प्रकारे गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदर गुन्हयाचा सलग तपास करून आरोपी बाबत गोपनिय माहिती प्राप्त करुन घरफोडी चोरीचा गुन्हा उघडकीस आणुन गुन्हयातील दोन सराईत आरोपीना जेरबंद केले आहे . तसेच त्यांचेकडून गुन्हा करणेसाठी वापरलेली मोटार सायकल हस्तगत केली आहे . गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरचा घरफोडी चोरीचे हवालदार अतुला तावरे ह्या करीत आहेत . प्रयत्नाचा गुन्हा घडले पासुन 24 तासाचे आत उघडकीस आणला आहे . सदर गुन्हयाचा पुढील तपास महिला पोलीस सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री . अजयकुमार बन्सल , मा . अपर पोलीस अधीक्षक श्री . अजित बोन्हाडे , मा.रणजित पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा शहर विभाग , यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री . संजय पतंगे , सहा . पोलीस निरीक्षक श्री . अभिजीत यादव , पोलीस हेडकॉन्स्टेबल हसन पवार , स्वप्निल सावंत यांनी केली आहे . तडवी , लैलेश अशोक फडतरे , पोलीस नाईक अमित माने , स्वप्निल कुंभार , ओंकार यादव पो.कॉ. सचिन.
No comments:
Post a Comment