*पुसेगाव पोलीस स्टेशनची धडाकेबाज टिम वर्क कामगिरी* ...
*अपहरण करून खून करण्याचा प्रयत्न करणा-या अनोळखी आरोपीचा अवघ्या तीन तासात शोध घेवून गुन्हा उघड करण्यात पुसेगांव पोलीस ठाणेस यश*
*सदरची कारवाई आपल्या ग्रुपचे सदस्य व सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.संदीप शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली* ...
पुसेगाव पोलीस ठाणे हद्दीत दिनांक २६/०६/२०२२ रोजी रात्री १२.०० वा. चे सुमारास फिर्यादी सौ. जयश्री ३५ वर्षे रा.रविवार पेठ, सातारा ता.जि-सातारा या त्यांचे पती महेश गोरे व दाजी उम होळ तसेच त्यांची दोन मूल वेद्राविका महेश गोरे वय-८ वर्षे रा.रविवार पेठ, सातारा ता. जि. सातारा व विश्वजीत महेश गोरे वय-४ महिने रा. रविवार पेठ, मानारा सातारा व भाची कृतिका उर्फ रुपाली उत्तम हो वय २१ वर्षांव जि.सातारा यांचे बरोबर शिगणापूर पंथून सालाग येथे हुंदाई आयटेन गाडी क्रमांक एम.एच.११.सी.जी. ८३८३ या गाडीने जात असताना महेश गोरे व उत्तम होठ हे पाणी घेण्यासाठी मौजे पुसेगांव गावद्ये हद्दीत शिवाजी चौक येथे थांबवून चौकातील पाण टपरी येथे पाणी बॉटल आणण्यासाठी उत्तरुन गेले असता एक अनोळखी व्यक्ती हा वरील गाडीचे ड्रायव्हर सिटवर अचानकपणे येथुन बसुन गाडी चालवुन फिर्यादी यांची दोन्ही मूले वेदार्तिका वग-८ वर्षे व विश्वजित वय ४ महिने यांना तसेच फिर्यादी व त्यांची भाची ऋतिका उर्फ रुपाली हिला वाईट हेतुने पळवून घेवून गेला होता. त्यावेळी सदर गाडीतील फिर्यादी यांनी अनोळखी इसमास प्रतिकार करतेवेळी झालेल्या झटापटीत पर नमुद चारचाकी गाडी ही येरळा नदीचे पुलाचे पुढे रस्त्याचे खाली उतरून ती चंद पडली. त्यावेळी फिर्यादी यांनी आरडा-अंगा केला असता सदर खी इसमाने फिर्यादी यांचा गावाचुन खून करण्याचा प्रयत्न केला. सदर बाबत फिर्यादी यांनी पुसेगांव पोलीस ठाणेस दिनांक २६/०६/२०२२ रोजी सदर अनोळखी इसमाविरुद्ध तक्रार दिलेली होती.
सदर घटणेचे गांर्भीय ओळखून मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. गणेश फिद्रे यो तसेच श्री. संदिप शितोळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ गुन्ह्याचे घटनास्थळास भेट देवून संशयीत आरोपीचे शोचकामी पुसेगांव पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून व सूचना देपुन अनोळखी आरोपीचा शोध घेणेकामी रवाना केले. त्यानंतर पुसेगांव पोलीस वाणेकडील अधिकारी व अंमलदार यांनी शिवाजी चौक पुसेगांव येथील सी. सी. टी. व्ही. फुटेजची पाहणी करून संशयीत इसमाचा शोध घेणेसाठी पुसेगांव शहरातील परिसर पिंजून काढला असता एक संशयीत इसम हा पुसेगांव से दहिवडी रोडला महालक्ष्मी हॉटेलचे आडोशाला लपुन बसलेला दिसल्याने त्याचा पोलीसांना संशय आल्याने त्यास ताब्यात घेवून पुसेगांव पोलीस ठाणे येथे आणले व त्याचेकडे सदर गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यास सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास संदिप शितोळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पुसेगाव पोलीस ठाणे हे करीत आहेत.
सदर कारवाईत मा. उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे सरे, पुसेगांव पोलीस ठाणेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. संदिप शितोळे, पोलीस हवालदार एस. एस. भोसले, पोलीस हवालदार डी. बी. बर्गे, पोलीस नाईक सचिन जगताप, पोलीस नाईक सुनिल अबदागिरे, महिला पोलीस नाईक पी. एल. जगदाळे, पोलीस शिपाई महेश पवार यांनी सहभाग घेतलेला होता. अशा प्रकारे घडलेल्या अति गंभीर गुन्ह्याचा पोलीसांनी तात्काळ कसोशीने शोध घेवून आरोपीतास अवघ्या तीन तासात अटक करून गुन्हा उघड केल्यामुळे फिर्यादी तसेच सातारा जिल्हा बार कौन्सील यांनी पोलीस प्रशासनाने केलेल्या कामगिरीची प्रशंसा केलेली आहे.
No comments:
Post a Comment