*राहुल तपासे(दादा) यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा-जिल्हाध्यक्ष संतोष नलवडे*
सातारा जिल्हा इलेक्ट्रॉनिक मिडीया असोसिएशन च्या वतीने शंभूराज देसाई यांच्याकडे केली मागणी
एबीपी माझाचे ज्येष्ठ पत्रकार राहुल तपासे यांच्यावर जीव घेणा हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सातारा जिल्हा इलेक्ट्रॉनिक मिडीया असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. या हल्लेखोरांचा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त केला आहे.
रायगाव हद्दीत पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर दि.30 मे रोजी रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास तक्रारदार राहूल हिंदुराव तपासे हे त्यांच्या एम एच 11 बीझेड 1519 या ब्रीझा कारमधून साताराकडे येत होते. त्यावेळी एम एच 14 ईएच 9 या फॉर्च्युनर कारमध्ये तिघेजण मद्यप्राशन करत कार चालवत होते. ही बाब राहूल तपासे यांनी पाहिली असता ‘आमच्याकडे का पाहिले’ या कारणातून चिडून जावून तक्रारदार राहूल तपासे यांना जीवे मारण्याच्या हेतूने त्यांच्या ब्रीझा कारला भीषण धडक दिली. सुदैवाने या घटनेत राहूल तपासे बचावले आहेत. या घटनेनंतर संशयित कार चालक मात्र तेथून कारसह फरार झाले. जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्यानंतर त्यांनी हा सर्व प्रकार सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे व सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांना सांगितली. यानंतर दोघांनी जिल्हा पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना सांगून तात्काळ घटनेचा शोध घेवून संशयित आरोपींना अटक करण्याची मागणी केली. यानंतर तात्काळ पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी भुईंज पोलिसांना तात्काळ तपासाच्या सूचना करताच गुरुवारी याप्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकारानंतर हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी. अशी मागणी सातारा इलेक्ट्रॉनिक मीडिया असोशियन चे जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे यांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना फोन द्वारे केली आहे.सदर घटनेत हल्लेखोरांवर पत्रकार हल्ला विरोधी कायदानुसार कारवाई करावी अशी मागणी देखील संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे... संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे, उपाध्यक्ष प्रकाश शिंदे ,प्रमोद तोडकर, जेष्ठ सल्लागार तुषार तपासे, सचीन जाधव, ओमकार कदम,सादीक शेख ,विकास भोसले कार्याध्यक्ष अमित वाघमारे,सचिव किरण मोहिते,खजिनदार वैभव बोडके, सहसचिव तबरेज बागवान,सदस्य सचिन सापते सोहेल मुलाणी,स्वप्नील गव्हाणे,आतीश ललित लोखंडे,R.d.भोसले,संजय कारंडे,चंद्रकांत पवार,प्रमोद इगळे,प्रकाश वायदंडे,संतोष कांबळे,प्रशांत बाजी,राहुल ताटेपाटील,सचिन मदने,अनुराग दिवार आदींनी कारवाईची मागणी केली आहे
No comments:
Post a Comment