Tuesday, July 28, 2020

दिनांक 28/07/2020. 67 नागरिकांना दिला डिस्चार्ज;उपचारा दरम्यान 3 जणांचा मृत्यू597 जणांचे नमुने पाठविले तपासणीला...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

67 नागरिकांना दिला डिस्चार्ज;उपचारा दरम्यान 3 जणांचा मृत्यू

597 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

 

            सातारा दि. 28 (जिमाका):  जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 67 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले तर 597 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तसेच वाई तालुक्यातील एक पुरुष व सातारा तालुक्यातील एक पुरुष व एका महिलेचा मृत्यू झाला असल्याची  माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

            घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये वाई तालुक्यातील वाई येथील 52 वर्षीय महिला, यशवंतनगर येथील 22 वर्षीय पुरुष, 20 व 32 वर्षीय महिला व 9 वर्षाची बालीका, सोनगीरवाडी येथील 29 वर्षीय पुरुष व 28 वर्षीय महिला, 

            कराड तालुक्यातील तारुख येथील 26 वर्षीय महिला 2 वर्षाची दोन बालके, मलकापूर येथील 64 वर्षीय पुरुष, यादववाडी (मसुर) येथील 43 वर्षीय पुरुष, कवटे येथील 35 वर्षीय पुरुष, कारवडी येथील 28 वर्षीय पुरुष.

सातारा तालुक्यातील जीहे येथील 61 वर्षीय महिला, कोडोली येथील 10 व 8 वर्षाची बालके, 30 वर्षीय महिला, नागठाणे येथील 47 वर्षीय महिला व 23 वर्षीय पुरुष,  बुधवार पेठ येथील 32 वर्षीय महिला, शहापूर येथील 28 वर्षीय पुरुष,  तामजाई नगर येथील 45 वर्षीय पुरुष.

खंडाळा तालुक्यातील अष्टविनायक ग्लास फॅक्ट्री येथील 18 वर्षीय तरुण.

जावली तालुक्यातील पुनवडी येथील 39,42,59,33, 31, 29,93, 50, 19,64, 30,34, 43,38,23,50,23,43 वर्षीय पुरुष व 56, 26,60, 50, 59,35   वर्षीय महिला व 7,12,7,5 व 7  वर्षाच्या बालीका,18 वर्षीय तरुणी, 17 वर्षीय तरुण, 3 व 10 वर्षाचा बालक, सायगांव येथील 17 वर्षीय युवक,  52 वर्षीय महिला, आलेवाडी येथील 32 वर्षीय पुरुष, 9 वर्षीय बालक, 11 वर्षीय बालीका व 35 वर्षीय महिला, दापवाडी येथील  29 व 56 वर्षीय पुरुष.

माण तालुक्यातील गोंदवले बु. येथील 21 वर्षीय महिला व 75 वर्षीय पुरुष.

597 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

            क्रांतीसिंह नाना  पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातरा येथील 40, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड  येथील 81, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील  12, कोरेगांव येथील 12, वाई येथील 46, शिरवळ येथील 17, रायगाव 26, पानमळेवाडी 93, मायणी 42, महाबळेश्वर 10, पाटण 54,खावली येथे 74 व कृष्णा  हॉस्पिटल कराड येथील 90 असे एकूण  597 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असुन पुणे व कराउ येथे तपासणी करीता पाठविण्यात आले असल्याचीही माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.

उपचारा दरम्यान 3 जणांचा मृत्यू

        क्रांतीसिंह नाना  पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातरा येथे परखंदी ता. वाई येथील 72 वर्षीय पुरुष व कुस बु. ता. सातारा येथील 70 वर्षीय पुरुष या दोन कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर सतारा येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये सोनगांव, क्षेत्रमाहुली ता. सातारा येथील 62 वर्षीय महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यांचा खाजगी प्रयोगशाळेत अहवाल कोविड बाधित आला आहे, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली.



No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...