Saturday, August 13, 2022

शिवसंग्राम पक्षाचे नेते आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन !मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर भीषण अपघात...

                 रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

शिवसंग्राम पक्षाचे नेते आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर भीषण अपघात...
मुंबई पुणे दुर्गती महामार्गावर भातान बोगद्याजवळ शिवसंग्राम पक्षाचे नेते आमदार विनायक मेटे यांच्या कारचा भीषण अपघात झाला यामध्ये त्यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते आमदार प्रशांत ठाकूर यांनी मेटे यांना मुंबईला हलविण्याबाबत डॉक्टरांशी चर्चा केली मात्र डॉक्टरांनी त्यांना निधन झाल्याची कल्पना दिली. डॉक्टर धर्मांग यांनी मेटे यांचे निधन झाल्याचे जाहीर केले.

Monday, July 11, 2022

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्युज : नविन लेबर कोड आठवड्यातुन 3 दिवस सुट्टी ! सरकारची मोठी घोषणा

                  रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे ती म्हणजे नविन कामगार नियमानुसार आठवड्यातुन तीन दिवस सुट्टी मिळणार आहे . म्हणजेच आठवड्यातुन केवळ चार दिवस काम करावे लागणार आहे . यामुळे वेतनात कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येणार नाहीत , परंतु या नविन लेबर कोडचे काही नियम स्पष्ट करण्यात आले आहेत .
मिडीया रिपोर्ट नुसार नविन कामगार नियमामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना आठवड्यातुन तीन दिवस सुट्टी मिळणार , परंतु चार दिवसामधील कामाच तास वाढविण्यात येणार आहे . म्हणजेच जुन्या लेबर कोडनुसार दिवसाला कामाचे तास 8 होते ,तर नविन कामगार नियमानुसार कामाचे 10 तास करण्यात येणार आहे .ज्यामुळे आठवड्यातुन तीन दिवस सुट्टी शक्य आहे .शिवाय सरकारी कार्यालयामध्ये , शिफ्ट पद्धतीने काम केले जाणार आहे .त्याचबरोबर खाजगी कंपनी सारखे अतिरिक्त कामाचा मोबदला देखिल सरकारी कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे .
मिडीया वृत्तानुसार सरकारकडुन 44 केंद्रीय श्रम कायद्याचे एकत्रिकरण करुन नविन 4 कामगार संहिता तयार करण्यात येणार आहे .सदर नियमांची अंमलबजावणी खाजगी कंपनींना देखिल लागु होण्याची शक्यता आहे .

Sunday, June 26, 2022

दिनांक २६/०६/२०२२. पुसेगाव पोलीस स्टेशनची धडाकेबाज टिम वर्क कामगिरी...

                रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

*पुसेगाव पोलीस स्टेशनची धडाकेबाज टिम वर्क कामगिरी* ...

*अपहरण करून खून करण्याचा प्रयत्न करणा-या अनोळखी आरोपीचा अवघ्या तीन तासात शोध घेवून गुन्हा उघड करण्यात पुसेगांव पोलीस ठाणेस यश*

*सदरची कारवाई आपल्या ग्रुपचे सदस्य व सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.संदीप शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली* ...


पुसेगाव पोलीस ठाणे हद्दीत दिनांक २६/०६/२०२२ रोजी रात्री १२.०० वा. चे सुमारास फिर्यादी सौ. जयश्री ३५ वर्षे रा.रविवार पेठ, सातारा ता.जि-सातारा या त्यांचे पती महेश गोरे व दाजी उम होळ तसेच त्यांची दोन मूल वेद्राविका महेश गोरे वय-८ वर्षे रा.रविवार पेठ, सातारा ता. जि. सातारा व विश्वजीत महेश गोरे वय-४ महिने रा. रविवार पेठ, मानारा सातारा व भाची कृतिका उर्फ रुपाली उत्तम हो वय २१ वर्षांव जि.सातारा यांचे बरोबर शिगणापूर पंथून सालाग येथे हुंदाई आयटेन गाडी क्रमांक एम.एच.११.सी.जी. ८३८३ या गाडीने जात असताना महेश गोरे व उत्तम होठ हे पाणी घेण्यासाठी मौजे पुसेगांव गावद्ये हद्दीत शिवाजी चौक येथे थांबवून चौकातील पाण टपरी येथे पाणी बॉटल आणण्यासाठी उत्तरुन गेले असता एक अनोळखी व्यक्ती हा वरील गाडीचे ड्रायव्हर सिटवर अचानकपणे येथुन बसुन गाडी चालवुन फिर्यादी यांची दोन्ही मूले वेदार्तिका वग-८ वर्षे व विश्वजित वय ४ महिने यांना तसेच फिर्यादी व त्यांची भाची ऋतिका उर्फ रुपाली हिला वाईट हेतुने पळवून घेवून गेला होता. त्यावेळी सदर गाडीतील फिर्यादी यांनी अनोळखी इसमास प्रतिकार करतेवेळी झालेल्या झटापटीत पर नमुद चारचाकी गाडी ही येरळा नदीचे पुलाचे पुढे रस्त्याचे खाली उतरून ती चंद पडली. त्यावेळी फिर्यादी यांनी आरडा-अंगा केला असता सदर खी इसमाने फिर्यादी यांचा गावाचुन खून करण्याचा प्रयत्न केला. सदर बाबत फिर्यादी यांनी पुसेगांव पोलीस ठाणेस दिनांक २६/०६/२०२२ रोजी सदर अनोळखी इसमाविरुद्ध तक्रार दिलेली होती.

सदर घटणेचे गांर्भीय ओळखून मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. गणेश फिद्रे यो तसेच श्री. संदिप शितोळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ गुन्ह्याचे घटनास्थळास भेट देवून संशयीत आरोपीचे शोचकामी पुसेगांव पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून व सूचना देपुन अनोळखी आरोपीचा शोध घेणेकामी रवाना केले. त्यानंतर पुसेगांव पोलीस वाणेकडील अधिकारी व अंमलदार यांनी शिवाजी चौक पुसेगांव येथील सी. सी. टी. व्ही. फुटेजची पाहणी करून संशयीत इसमाचा शोध घेणेसाठी पुसेगांव शहरातील परिसर पिंजून काढला असता एक संशयीत इसम हा पुसेगांव से दहिवडी रोडला महालक्ष्मी हॉटेलचे आडोशाला लपुन बसलेला दिसल्याने त्याचा पोलीसांना संशय आल्याने त्यास ताब्यात घेवून पुसेगांव पोलीस ठाणे येथे आणले व त्याचेकडे सदर गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यास सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास संदिप शितोळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पुसेगाव पोलीस ठाणे हे करीत आहेत.

सदर कारवाईत मा. उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे सरे, पुसेगांव पोलीस ठाणेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. संदिप शितोळे, पोलीस हवालदार एस. एस. भोसले, पोलीस हवालदार डी. बी. बर्गे, पोलीस नाईक सचिन जगताप, पोलीस नाईक सुनिल अबदागिरे, महिला पोलीस नाईक पी. एल. जगदाळे, पोलीस शिपाई महेश पवार यांनी सहभाग घेतलेला होता. अशा प्रकारे घडलेल्या अति गंभीर गुन्ह्याचा पोलीसांनी तात्काळ कसोशीने शोध घेवून आरोपीतास अवघ्या तीन तासात अटक करून गुन्हा उघड केल्यामुळे फिर्यादी तसेच सातारा जिल्हा बार कौन्सील यांनी पोलीस प्रशासनाने केलेल्या कामगिरीची प्रशंसा केलेली आहे.

Wednesday, June 8, 2022

दिनांक ०८/०६/२०२२. शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेकडुन घरफोडी चोरीचे प्रयत्नाचा गुन्हा उघड करुन दोन सराईत चोरटे जेरबंद करण्यात यश .

 
                 रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~




सातारा : - शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेकडुन घरफोडी चोरीचे प्रयत्नाचा गुन्हा उघड करुन दोन सराईत चोरटे जेरबंद करण्यात यश . शाहूपुरी पोलीस ठाणेस दि . 05/06/2022 रोजी रात्री 3.30 वा . चे सुमारास करंजेपेठ सातारा येथील एका घरात घरफोडी चोरी करण्याचा प्रयत्न झाले बाबतची तक्रार प्राप्त झाली होती . नमुद तक्रारी वरुन दि .06 / 06 / 2022 रोजी शाहूपुरी पोलीस ठाणेस गुरनं . 196/2022 भादिवसक , 457,380,511,34 प्रमाणे गुन्हा दाखल आहे . सदरचा गुन्हा दाखल झाले नंतर मा.पोलीस अधीक्षक श्री . अजयकुमार बन्सल , मा . अपर पोलीस अधीक्षक श्री . अजित बोऱ्हाडे , श्री . रणजित पाटील मा . उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग सातारा यांनी शाहूपुरी पोलोस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री . संजय पतंगे यांना नमुद गुन्हा उघडकीस आणणे बाबत सूचना दिलेल्या होत्या . त्याप्रमाणे मा.पोलीस निरीक्षक श्री . संजय पतंगे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सदरचा गुन्हा उघडकीस आणणेसाठी प्रयत्न करीत होते . त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखचे अमलदार नमुद गुन्ह्याचे घटनास्थळी भेट देवून घटनास्थळाचे आजुबाजुचे CCTV फुटेजची पाहणी केली असता त्यामध्ये तीन संशयीत इसम दिसून आले . सदर CCTV फुटेजचे आधारे गुन्हे शाखेचे अंमलदार तीन संशयीत इसमांचा शोध घेत होते . सदर संशयीत इसमाचा शोध घेत असताना दि .06 / 6 / 2022 रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अमलदार यांना गोपनिय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली को CCTV फुटेजमध्ये केंद झालेले तीन इसम हे आकाशवाणी झोपडपट्टीमध्ये राहणारे असून ते आकाशवाणी झोपडपट्टीचे पाठीमागे ओढयाचे कडेला बसलेले आहेत . अशी माहिती मिळाल्याने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार हे तात्काळ सदर ठिकाणी गेले असता त्यांना संशयीत इसम पळून जावु लागले त्यावेळी गुन्हे शाखेच्या अंमलदार यांनी नमुद आरोपीचा पाठलाग केला . तेव्हा त्यापैकी एक इसमास पकडण्यात आले तसेच त्याठिकाणी त्यांची मोटार सायकल मिळुन आल्याने तो ताब्यात घेण्यात आली . ताब्यात घेतलेल्या संशयीत इसमाकडे गुन्हया बाबत विचारपुस केली , परंतु त्याने उडवा उडवीची उत्तरे दिल्याने पोलीसांनी त्याचेकडे कौशल्याने तपास केला असता त्याने नमुद गुन्हयाची कबुली दिली . तसेच त्याचे साथीदारांचे बाबत माहिती दिली . त्यानंतर दि .07 / 06 / 2022 रोजी उर्वरीत संशयीत इसमाचा शोध घेत असताना गुन्हयातील दुसरा संशयीत इसमास पकडण्यात गुन्हे शाखेच्या अंमलदारांना यश आले आहे . अशा प्रकारे गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदर गुन्हयाचा सलग तपास करून आरोपी बाबत गोपनिय माहिती प्राप्त करुन घरफोडी चोरीचा गुन्हा उघडकीस आणुन गुन्हयातील दोन सराईत आरोपीना जेरबंद केले आहे . तसेच त्यांचेकडून गुन्हा करणेसाठी वापरलेली मोटार सायकल हस्तगत केली आहे . गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरचा घरफोडी चोरीचे हवालदार अतुला तावरे ह्या करीत आहेत . प्रयत्नाचा गुन्हा घडले पासुन 24 तासाचे आत उघडकीस आणला आहे . सदर गुन्हयाचा पुढील तपास महिला पोलीस सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री . अजयकुमार बन्सल , मा . अपर पोलीस अधीक्षक श्री . अजित बोन्हाडे , मा.रणजित पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा शहर विभाग , यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री . संजय पतंगे , सहा . पोलीस निरीक्षक श्री . अभिजीत यादव , पोलीस हेडकॉन्स्टेबल हसन पवार , स्वप्निल सावंत यांनी केली आहे . तडवी , लैलेश अशोक फडतरे , पोलीस नाईक अमित माने , स्वप्निल कुंभार , ओंकार यादव पो.कॉ. सचिन.

Thursday, June 2, 2022

*राहुल तपासे(दादा) यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा-जिल्हाध्यक्ष संतोष नलवडे*

                 रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
*राहुल तपासे(दादा) यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा-जिल्हाध्यक्ष संतोष नलवडे*

सातारा जिल्हा इलेक्ट्रॉनिक मिडीया असोसिएशन च्या वतीने शंभूराज देसाई यांच्याकडे केली मागणी

एबीपी माझाचे ज्येष्ठ पत्रकार राहुल तपासे यांच्यावर जीव घेणा हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सातारा जिल्हा इलेक्ट्रॉनिक मिडीया असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. या हल्लेखोरांचा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त केला आहे.

रायगाव हद्दीत पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर दि.30 मे रोजी रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास तक्रारदार राहूल हिंदुराव तपासे हे त्यांच्या एम एच 11 बीझेड 1519 या ब्रीझा कारमधून साताराकडे येत होते. त्यावेळी एम एच 14 ईएच 9 या फॉर्च्युनर कारमध्ये तिघेजण मद्यप्राशन करत कार चालवत होते. ही बाब राहूल तपासे यांनी पाहिली असता ‘आमच्याकडे का पाहिले’ या कारणातून चिडून जावून तक्रारदार राहूल तपासे यांना जीवे मारण्याच्या हेतूने त्यांच्या ब्रीझा कारला भीषण धडक दिली. सुदैवाने या घटनेत राहूल तपासे बचावले आहेत. या घटनेनंतर संशयित कार चालक मात्र तेथून कारसह फरार झाले. जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्यानंतर त्यांनी हा सर्व प्रकार सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे व सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांना सांगितली. यानंतर दोघांनी जिल्हा पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना सांगून तात्काळ घटनेचा शोध घेवून संशयित आरोपींना अटक करण्याची मागणी केली. यानंतर तात्काळ पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी भुईंज पोलिसांना तात्काळ तपासाच्या सूचना करताच गुरुवारी याप्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकारानंतर हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी. अशी मागणी सातारा इलेक्ट्रॉनिक मीडिया असोशियन चे जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे यांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना फोन द्वारे केली आहे.सदर घटनेत हल्लेखोरांवर पत्रकार हल्ला विरोधी कायदानुसार कारवाई करावी अशी मागणी देखील संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे... संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे, उपाध्यक्ष प्रकाश शिंदे ,प्रमोद तोडकर, जेष्ठ सल्लागार तुषार तपासे, सचीन जाधव, ओमकार कदम,सादीक शेख ,विकास भोसले कार्याध्यक्ष अमित वाघमारे,सचिव किरण मोहिते,खजिनदार वैभव बोडके, सहसचिव तबरेज बागवान,सदस्य सचिन सापते सोहेल मुलाणी,स्वप्नील गव्हाणे,आतीश ललित लोखंडे,R.d.भोसले,संजय कारंडे,चंद्रकांत पवार,प्रमोद इगळे,प्रकाश वायदंडे,संतोष कांबळे,प्रशांत बाजी,राहुल ताटेपाटील,सचिन मदने,अनुराग दिवार आदींनी कारवाईची मागणी केली आहे

Tuesday, February 8, 2022

पुसेगाव पोलीसांची धडाकेबाज कामगिरी .... दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक करुन त्यांचेकडुन चोरीच्या ५ मोटारसायकल, ९ मोबाईल, २ तलवारी व दरोडा टाकणेचे साहित्य असा एकूण दोन लाख पंचविस हजार रु. किमतीचा मुद्देमाल जप्त.

             रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
*पुसेगाव पोलीसांची धडाकेबाज कामगिरी* .... 
दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक करुन त्यांचेकडुन चोरीच्या ५ मोटारसायकल, ९ मोबाईल, २ तलवारी व दरोडा टाकणेचे साहित्य असा एकूण दोन लाख पंचविस हजार रु. किमतीचा मुद्देमाल जप्त.

*सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.संदीप शितोळे यांच्या टिमची उल्लेखनीय कामगिरी...*


मागील काही दिवसापासुन वाढत्या मोटारसायकल चोरी, घरफोडी चोरीच्या अनुषंगाने मा. अजयकुमार बंसल पोलीस अधिक्षक सो, सातारा, मा.अजित बो-हाडे अपर पोलीस अधिक्षक सो. सातारा, मा.गणेश किंद्रे उपविभागीय पोलीस अधिकारी सोकोरेगाव विभाग यांनी मार्गदर्शन करून पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करणेच्या सुचना दिलेल्या होत्या त्या अनुशंगान दिनांक ६/२/२०२२ रोजी रात्री १० वाजणेचे सुमारास पुसेगाव पोलीस ठाणे हद्दीत सपोनि संदिप शितोळे, सुनिल आबदागिरे, वैभव वसव पुष्कर जाधव उमेश देशमुख, अशोक सरक हे पेट्रोलींग करत असताना मौजे बुध ता. खटाव गावचे हद्दीत राजापुर फाटा येथे काही संशयीत इसम उभे असलेचे दिसुन आलेने त्यांचेकडे विचारपुस केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देत शेताचे दिशेने पळून जावु लागले. त्यांचेवरील संशय बळावेलेने त्यांचा पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्यांनी दरोडा टाकणेचे उद्देशाने आलेबाबत सांगीतले त्यांचेकडे त्यांचे ताब्यातील दोन प्लसर मोटारसायकल, दोन तलवारी, ५ मोबाईल १ स्क्रुडाव्हर, १ पक्कड, १ गज, व्हिलपाना असे दोराडा टाकणेचे साहित्य मिळुन आले. त्यांना पोलीस ठाणेस आणुन त्यांना विश्वासात घेवून त्यांचेकडे विचारपुस केली असता त्यांनी फलटण, पुणे, बारामती, पाटस, बिगवण परीसरात चो-या केलेबाबत सांगीतले आहे.

पुसेगाव पोलीस ठाणेस गुरनं.३२/२०२२ गुन्हा दाखल करणेत आला असून त्यांचेकडे अधिक तपास केला असता त्यांचेकडुन चोरीच्या एकुण ५ मोटारसायकल किं.अं. १ लाख ऐंशी हजार रुपये व एकुण ९ मोबाईल किं. अं. ४५ हजार रुपये चा मुद्देमाल जप्त करणेत पुसेगाव पोलीसांना यश आलेले आहे. त्यांना अटक करून पोलीस कस्टडी घेणेत आलेली आहे. आरोपींनी आणखी काही गंभीर गुन्हे आहेत अगर कसे या बाबतचा अधिक तपास चालु असुन सपोनि संदिप शितोळे हे सदर गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

सदर कारवाई मा. अजयकुमार बंसल पोलीस अधिक्षक सो, सातारा, मा.अजित बो-हाडे अपर पोलीस अधिक्षक सोो. सातारा, मा.गणेश किंद्रे उपवभागीय पोलीस अधिकारी सो. कोरेगाव विभाग यांचे मार्गदर्शनाखाली सदर कारवाई मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप शितोळे, सुनिल आबदागीरे, अशोक सरक, वैभव वसव, पुष्कर जाधव, उमेश देशमुख, विजय खाडे, सचिन जगताप, दौलत कुदळे, हे कारवाई मध्ये सहभागी होते.

Wednesday, January 5, 2022

सेंट्रींग प्लेटा चोरी करणारा चोर अखेर जेरबंद; शाहूपुरी पोलिसांची कारवाई...

                 रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
सेंट्रींग प्लेटा चोरी करणारा चोर अखेर जेरबंद; शाहूपुरी पोलिसांची कारवाई

शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बुधवार नाक्यावरुन सेंट्रींग प्लेटा चोरी केल्याप्रकरणी गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने  निलेश रामदास भिसे (रा.बुधवार नाका, सातारा) याला अटक करण्यात आली. संशयिताकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून न्यायालयात हजर केले असता त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दि. ३१ रोजी रात्री चोरीची घटना घडल्यानंतर अज्ञाताविरुध्द शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. चोरट्याने ६ हजार रुपये किंमतीच्या १० प्लेटा चोरुन नेल्याने डीबीचे पथक याचा तपास करत असताना त्यांना संशयिताची माहिती मिळाली. त्यानुसार त्याला ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली देवून मुद्देमाल पोलिसांना दिला. फौजदार नानासाहेब कदम, पोलिस हवालदार लैलेश फडतरे, अमित माने, स्वप्नील कुंभार यांनी कारवाईत सहभाग घेतला.

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...