रॉयल सातारा न्युज* $
~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
सेंट्रींग प्लेटा चोरी करणारा चोर अखेर जेरबंद; शाहूपुरी पोलिसांची कारवाई
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बुधवार नाक्यावरुन सेंट्रींग प्लेटा चोरी केल्याप्रकरणी गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने निलेश रामदास भिसे (रा.बुधवार नाका, सातारा) याला अटक करण्यात आली. संशयिताकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून न्यायालयात हजर केले असता त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दि. ३१ रोजी रात्री चोरीची घटना घडल्यानंतर अज्ञाताविरुध्द शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. चोरट्याने ६ हजार रुपये किंमतीच्या १० प्लेटा चोरुन नेल्याने डीबीचे पथक याचा तपास करत असताना त्यांना संशयिताची माहिती मिळाली. त्यानुसार त्याला ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली देवून मुद्देमाल पोलिसांना दिला. फौजदार नानासाहेब कदम, पोलिस हवालदार लैलेश फडतरे, अमित माने, स्वप्नील कुंभार यांनी कारवाईत सहभाग घेतला.
No comments:
Post a Comment