Sunday, June 21, 2020
कोरोनातून बऱ्या झालेल्या 19 जणांना आज दिला डिस्चार्ज
सातारा दि. 21 ( जि. मा. का ) : विविध रुग्णालयांतील व कोरोना केअर सेंटर्समधून उपचार घेवून बरे झालेल्या 19 नागरिकांना 10 दिवसांनंतर डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
डिस्चार्ज दिलेल्यामध्ये क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथून शिरवळ ता. खंडाळा येथील 48 वर्षीय पुरुष, वेळे ता.वाई येथील 59 वर्षीय पुरुष.
कोरोना केअर सेंटर फलटण येथून फलटण तालुक्यातील वडले येथील वय 40, 89 व 30 वर्षीय पुरुष व वय 12 मुलगा व 1 वर्षाचे बाळ.
कोरोना केअर सेंटर पार्ले येथून कराड तालुक्यातील तुळसण येथील वय 50 व 22 वर्षीय महिला.
मायणी मेडीकल कॉलेज येथून खटाव तालुक्यातील सातेवाडी येथील 76 वर्षीय वृध्दा
कोरोना केअर सेंटर शिरवळ येथून खंडाळा तालुक्यातील आसवली येथील 25 वर्षीय पुरुष.
कोरोना केअर सेंटर वाई येथून वाई तालुक्यातील पाचवड येथील 52 वर्षीय पुरुष, व्याजवाडी येथील वय 58 27 व 29 वर्षीय पुरुष, 39 वर्षीय महिला तसेच 13 व 16 वर्षीय युवती, व आसरे येथील 55 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
पालकमंत्र्यांच्या हस्ते कृषी बचतगटांना तुर व खते वाटप
सातारा दि. 21 (जिमाका): कृषी विभागामार्फत राष्ट्रीय अन्नसुरक्षा विकास कार्यक्रमांतर्गत कृषी बचतगटांना तुर वाटप व बांधावर खते पोहोच वाटप राज्याचे सहकार व पणन मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राधान्य कुटुंबाचे 207 लाभार्थींना मोफत धान्य वाटपही करण्यात आले.
कोरेगाव तालुक्यातील मौजे साप येथे आयोजित केलेल्या कार्यकमास कोरेगाव तहसीलदार रोहिणी शिंदे, राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने, साप ग्रामपंचायतीच्या सरपंच शशिकला शेडगे, उपसरपंच नागेश अडसुळे यांच्यासह ग्रामपंचायतीचे इतर सदस्य, ग्रामसेवक संतोष पाटील, मंडळाधिकारी श्री.सावंत, तलाठी देविदास जाधव, कृषी सहायक श्री भोसले आदींची उपस्थिती होती.
Saturday, June 20, 2020
सातारा तालुक्यातील दोन क्षेत्रे मायक्रो कंटेनमेंट झोन मुक्त
सातारा दि. 20( जि. मा. का ) : कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने सातारा तालुक्यातील निगुडमाळ ग्रामपंचायत हद्द व सातारा शहरातील कारागृह- मुख्य स्थळ पोलीस क्लब हे परिसर सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (मायक्रो कंटेनमेंट झोन) म्हणून घोषित करण्यात आले होते.
आता ते दोन्ही क्षेत्रामधून सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र उठविण्याचा/ शिथील करण्याचा आदेश उपविभागीय अधिकारी तथा इन्सीडंट कमांडर सातारा यांनी पारित केला असल्याने मौजे निगुडमाळ व सातारा शहरातील कारागृह- मुख्यस्थळ पोलीस क्लब ही क्षेत्रे मायक्रो कंटेनमेंट झोनमुक्त झाली आहेत. परंतू जिल्हाधिकारी यांच्या दिनांक 31 मे रोजीच्या आदेशान्वये तसेच शासनाकडून प्राप्त होणारे कोरोनाबाबतचे आदेश व दिशानिर्देश त्या क्षेत्रावर बंधनकारक राहतील असे आदेशामध्ये नमुद आहे.
जिल्ह्यातील 4 नागरिक कोरोनाबाधितआतापर्यंत 624 जण उपचार घेऊन घरी तर जिल्ह्यात उपचार घेणारे 141
सातारा दि. 20( जि. मा. का ) : विविध रुग्णालयांमध्ये व कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या 4 नागरिकांचा रिपोर्ट कोरोना बाधित आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
कारोनाबाधित रुग्णांमध्ये सातारा शहरातील गुरुवार पेठ येथील 54 वर्षीय महिला, कराड तालुक्यातील तळबीड येथील 26 वर्षीय पुरुष, चोचेगाव येथील 30 वर्षीय महिला, पाटीलवाडी (म्हासोली) येथील 48 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
आतापर्यंत सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 804 इतकी झाली असून, 624 नागरिक त्यातून बरे झाले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 39 नागरिकांचा मृत्यू झाला असून उपचार घेत असलेल्या नागरिकांची संख्या 141 इतकी झाली आहे. बाहेरच्या जिल्ह्यातील 4 बाधित रुग्ण आपल्या जिल्ह्यात उपचार घेत आहेत, त्यांची बाधित रुग्ण म्हणून त्यांच्या जिल्ह्यात गणना केली आहे.त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील बाधितांच्या एकूण संख्येतून ते वजा करण्यात येत आहेत.अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक आमोद गडीकर यांनी दिली आहे.
212 नागरिकांचे घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीला
चिखली ता.कराड पुरुषाचा मृत्यू पश्चात रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह; आजअखेर मृतांची संख्या 39212 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....
रॉयल सातारा न्युज* $ ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...
-
$ *रॉयल सातारा न्युज* $ ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏 716 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 8 बाधितांचा मृत्यू ...
-
$ *रॉयल सातारा न्युज* $ ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏 659 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित;9 बाधितांचा मृत्यू ...
-
$ *रॉयल सातारा न्युज* $ ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏 *1016 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित;10बाधितांचा मृत्यू*...