Sunday, June 21, 2020

पालकमंत्र्यांच्या हस्ते कृषी बचतगटांना तुर व खते वाटप

सातारा दि. 21 (जिमाका): कृषी विभागामार्फत राष्ट्रीय अन्नसुरक्षा विकास कार्यक्रमांतर्गत कृषी बचतगटांना तुर वाटप व बांधावर खते पोहोच वाटप राज्याचे सहकार व पणन मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राधान्य कुटुंबाचे 207 लाभार्थींना मोफत धान्य वाटपही करण्यात आले.

कोरेगाव तालुक्यातील मौजे साप येथे आयोजित केलेल्या कार्यकमास कोरेगाव तहसीलदार रोहिणी शिंदे,  राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने, साप ग्रामपंचायतीच्या सरपंच शशिकला शेडगे, उपसरपंच नागेश अडसुळे यांच्यासह ग्रामपंचायतीचे इतर सदस्य, ग्रामसेवक संतोष पाटील, मंडळाधिकारी श्री.सावंत, तलाठी देविदास जाधव, कृषी सहायक श्री भोसले आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...