Saturday, June 20, 2020

सातारा तालुक्यातील दोन क्षेत्रे मायक्रो कंटेनमेंट झोन मुक्त

सातारा दि. 20( जि. मा. का ) : कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने सातारा तालुक्यातील निगुडमाळ ग्रामपंचायत हद्द व सातारा शहरातील कारागृह- मुख्य स्थळ पोलीस क्लब हे परिसर सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (मायक्रो कंटेनमेंट झोन) म्हणून घोषित करण्यात आले होते. 

आता ते दोन्ही क्षेत्रामधून सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र उठविण्याचा/ शिथील करण्याचा आदेश उपविभागीय अधिकारी तथा इन्सीडंट कमांडर सातारा यांनी पारित केला असल्याने मौजे निगुडमाळ व सातारा शहरातील कारागृह- मुख्यस्थळ पोलीस क्लब ही क्षेत्रे मायक्रो कंटेनमेंट झोनमुक्त झाली आहेत. परंतू जिल्हाधिकारी यांच्या दिनांक 31 मे रोजीच्या आदेशान्वये तसेच शासनाकडून प्राप्त होणारे कोरोनाबाबतचे आदेश व  दिशानिर्देश त्या क्षेत्रावर बंधनकारक राहतील असे आदेशामध्ये नमुद आहे.

No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...