Thursday, February 4, 2021

दिनांक. ०४/०२/२०२१. *_मा.शशिकांत शिंदे यांच्या पाठीशी अजित पवार....आम्ही धमकीला घाबरत नाही : अजित पवार उपमुख्यमंत्री...

               $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏

कार्यकर्त्यांना बरे वाटावे म्हणून बोलले असतील; आम्ही धमकीला घाबरत नाही : अजित पवारउपमुख्यमंत्री 
अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले, धमकी देण्यात काहीही अर्थ नसतो. कदाचित समोरच्यांना व कार्यकर्त्यांना जरा बरे वाटण्याकरिता असे वक्तव्य करावे लागते. आपले कार्यकर्ते आपल्यासोबतच राहावेत, यासाठी काही जण अशा गोष्टी बोलत असतात.
 *सातारा* . धमकी देण्यात काहीही अर्थ नसतो. कार्यकर्त्यांना व समोराच्यांना बरे वाटावे, आपले कार्यकर्ते आपल्यासोबतच राहावेत. यासाठी असे वक्तव्य कधी कधी करावे लागते. पण त्यांच्या धमकीला घाबरण्याचे कारण नाही, असे प्रतिउत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवेंद्रसिंहराजेंनी शशीकांत शिंदेंना दिलेल्या धमकीवर दिले आहे.

भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या सध्या सातारा-जावळी मतदारसंघावरून कलगीतूरा रंगला आहे. राष्ट्रवादीची पक्ष संघटना बांधताना शशिकांत शिंदे यांच्यावर जबाबदारी देताना त्यांना सातारा जावळीतही लक्ष घालण्याची सूचना पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सांगितले आहे. त्यामुळे सध्या शिवेंद्रसिंहराजे भोसले व शशीकांत शिंदे यांच्यात कलगीतूरा रंगला आहे.

माझी वाट लावण्याचा कोणी प्रयत्न केल्यास मी समोरच्याची वाट लावल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, असा इशारा शिवेंद्रसिंहराजेंनी दिला होता. यावर मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले, धमकी देण्यात काहीही अर्थ नसतो. कदाचित समोरच्यांना व कार्यकर्त्यांना जरा बरे वाटण्याकरिता असे वक्तव्य करावे लागते. आपले कार्यकर्ते आपल्यासोबतच राहावेत, यासाठी काही जण अशा गोष्टी बोलत असतात. मुळात या वक्तव्याबद्दल मला काहीही माहिती नाही. त्यामुळे अशा धमकीला घाबरण्याचे कारण नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले..

No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...