*64 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधितांचा मृत्यू*
सातारा दि.5 (जिमाका): जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 64 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 2 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
*सातारा तालुक्यातील* सातारा 7, मंगळवार पेठ 3, कोडोली 1, गोडोली 1, मंगळवार पेठ 2, खेड 3, सैदापूर 1, संगमनगर 1, सासपाडे 1, नागठाणे 1,
*कराड तालुक्यातील* मलकापूर 1, नारासणवाडी 1, वडगांव 1, बडगांव 1,
*फलटण तालुक्यातील* लक्ष्मीनगर 1,
*खटाव तालुक्यातील* खटाव 1, येराळवाडी 1, वडुज 1, निमसोड 4, वडुज 4, बनपुरी 1,
*कोरेगाव तालुक्यातील* कोरेगांव 7, चिमणगांव 1, सासुर्वे 1, रहिमतपुर 1,
*खंडाळा तालुक्यातील* शिरवळ 1, लोणंद 2,म्हावशी 2,
*वाई तालुक्यातील* रामडोह आळी 1, वासोले 1, बावधन 2,सिध्दनाथवाडी 1, किकली 1, व्याहाळी 1,
*महाबळेश्वर तालुक्यातील*
*माण तालुक्यातील* दहिवडी 2, वावरहिरे 1,गोंदवले बु. 1,
*इतर* --
*बाहेरील जिल्ह्यातील* --
* 2 कोरोना बाधितांचा मृत्यू*
खाजगी रुग्णालयात उपचार घेतलेल्या नांदवळ वडुज ता. खटाव येथील 67 वर्षीय पुरुष, येराळवाडी ता. खटाव येथील 69 वर्षीय महिला या दोन कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
*एकूण नमुने -316407*
*एकूण बाधित -56731*
*घरी सोडण्यात आलेले -54135*
*मृत्यू -1824*
*उपचारार्थ रुग्ण-772*
मतदार ओळखपत्र संकेतस्थळावर उपलब्ध
सातारा दि. 5 (जि मा का): भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ज्या नवमतदारांना दि. 1 नोव्हेंबर 2020 ते 15 जानेवारी 2021 या कालावधीत नवीन नोंदणी केलेली आहे. त्या नवमतदारांना मतदार ओळखपत्र प्राप्त करुन घेण्यासाठी https://nvsp.in या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
वरील संकेतस्थळावरुन पुढीलप्रमाणे मतदान ओळखपत्र प्राप्त करुन घेऊ शकता. सुरुवातील नोंदणी करुन घ्या. तुमचा मतदार ओळखपत्र क्रमांक किंवा रेफरंन्स क्रमांक नमुद करा. नोंदणी केलेल्या मोबाईल वर आलेला ओटीपी टाकून पडताळणी करुन घ्यावी. डाऊनलोड या टॅबवरुन आपले मतदार ओळखपत्र प्राप्त करुन घ्यावे.
याबाबत सातारा नगरपालिका क्षेत्रातील मतदार समन्वय अधिकारी तथा मुख्याधिकारी नगरपालिका सातारा यांच्याशी संपर्क साधावा. तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) व तहसिल कार्यालय, निवडणूक शाखा सातारा येथे संपर्क साधावा, असे आवाहन तहसिलदार श्रीमती आशा होळकर यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment