Tuesday, January 19, 2021

दिनांक. १९/०१/२०२१ खंडाळा तालुक्यातील मौजे मरिआईचीवाडी येथील 1 कि.मी बर्ड फ्लू संक्रमित क्षेत्र भाग म्हणून घोषीत जिल्हाधिकाऱ्यांनी केले आदेश जारी...

              $ *रॉयल सातारा न्युज* $

 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏


खंडाळा तालुक्यातील मौजे मरिआईचीवाडी येथील 1 कि.मी बर्ड फ्लू संक्रमित  क्षेत्र भाग म्हणून घोषीत
       जिल्हाधिकाऱ्यांनी केले आदेश जारी
 
सातारा दि.19 (जिमाका) : खंडाळा तालुक्यातील मौजे मरिआईचीवाडी (कापरेवस्ती व शिंदेवस्ती) येथे बर्ड फ्लू या रोगाचे निदान झाल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी  बाधित जागेचा केंद्रबिंदू धरुन 1 कि.मी. त्रिज्येच्या परिघातील क्षेत्र हे संक्रमीत क्षेत्र व 10 कि.मी. त्रिज्येच्या परिघातील क्षेत्र हे सर्वेक्षण क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. तसेच जिल्ह्यात संभाव्य बर्ड फ्लू या रोगाचा प्रसार रोखणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी खालीलप्रमाणे आदेश दिले आहेत.
या आदेशानुसार  मौजे मरिआईचीवाडी (कापरेवस्ती व शिंदेवस्ती)  येथील बाधित जागेच्या केंद्रस्थानापासून संक्रमित क्षेत्र व सर्वेक्षण क्षेत्रामधील सर्व देशी कुक्कुट पक्षी, पोल्ट्री फार्म मधील पक्षी व इतर प्रजातीचे पाळीव पक्षी यांची जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, सातारा यांच्या अंतर्गत स्थापित जलद प्रतिसाद पथकामार्फत शास्त्रोक्त पध्दतीने पक्षांना मारण्याची क्रिया करण्यात यावी. मृत पक्ष्यांची मार्गदर्शक सूचनेनुसार विल्हेवाट लावण्यात यावी. संक्रमित क्षेत्रातील पक्षीखाद्य घटक अंडी, अंडयाचे पेपर ट्रे, बास्केट खुराडी व पक्षी खत / विष्टा इ. चे शास्त्रोक्त पध्दतीने नष्टीकरण करुन विल्हेवाट लावण्यात यावी. संक्रमीत क्षेत्रामधील पक्षांची कलींग, स्वच्छता, निर्जंतुकीकरण इ. मोहिम प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कुक्कुट पक्षी / चिकन व अंडी विक्रीची दुकाने सुरु करण्यास व यांमध्येही फक्त सर्वेक्षण क्षेत्रामधील उत्पादित कुक्कुट पक्षी व अंडी यांची अंतर्गत होणारी हालचाल व विक्रीस परवानगी राहील. सर्वेक्षण क्षेत्रामध्ये बाहेरुन येणारे व बाहेर पाठविण्यात येणारे चिकन प्रक्रिया उत्पादने/कुक्‌कुट पक्षी, खाद्य व अंडी इ. ची हालचाल, विपणन व विक्रीवर 3 महिने बंदी लागू राहील.

No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...