Wednesday, April 24, 2024

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: देसाई 
सभेस रामदास आठवले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा दिनांक 29 एप्रिल रोजी सैदापूर ता. कराड येथील 
एग्रीकल्चर कॉलेज ग्राउंड वर होणार आहे. यासाठी किमान एक लाख कार्यकर्ते जमणार आहेत. पंतप्रधान मोदी यांचे महाराष्ट्रावर असलेले लक्ष, साताऱ्यावर असणारे प्रेम आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याशी असणारे वैयक्तिक संबंध यामुळे या सभेत उदयनराजे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब होणार अशी खात्री आम्हाला आहे. असा ठाम विश्वास सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या सर्व मित्र पक्षांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबर आरपीआय पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले हे देखील या विराट सभेस उपस्थित राहून मतदारांना मार्गदर्शन करतील असे सांगितले.

 पत्रकार परिषदेस आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार महेश शिंदे, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीनकाका पाटील, अतुलबाबा भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, आर पी आय चे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, शिवसेना शिंदे गटाचे नेते पुरुषोत्तम जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे सातारा जिल्हा अध्यक्ष अमित कदम, माजी आमदार कांताताई नलावडे, मनोजदादा घोरपडे, भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र महिला संघटक चित्रलेखा माने कदम, भाजप सातारा अध्यक्ष  सुरभीताई भोसले, दलित महासंघाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे, सचिन नलावडे ,युवराज कांबळे तसेच भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे गट , राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गट याचे पदाधिकारी पत्रकार परिषदेत उपस्थित होते.


 याप्रसंगी बोलताना शंभूराज देसाई पुढे म्हणाले ,जिल्ह्यातील चारही आमदार ,सर्व नेते, पदाधिकारी, माजी आमदार झटून कामाला लागले आहेत. मी स्वतः माझ्या मतदारसंघात 11 जाहीर सभा घेणार आहे. तसेच गाठीभेटी ,मेळावे यांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व सहा मतदारसंघात सर्वच नेते ताकतीने कामाला लागले आहेत. महायुतीमध्ये असणाऱ्या चार आमदारांनी तर अंग मोडून काम करण्यास प्रारंभ केला आहे.स्वत:च्या निवडणुकीस ज्या पध्दतीने काम केले जाते तसे काम केले जात आहे.सहाजिकच सैदापूर तालुका कराड येथे होणारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पश्चिम महाराष्ट्रातली रेकॉर्ड ब्रेक सभा असेल. ही सभाच खासदार उदयनराजे भोसले यांच्या विजयावर शिक्का मोर्तब  करेल.

 विविध प्रश्नांना उत्तर देत असताना पालकमंत्री शंभूराजे देसाई म्हणाले ,पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातारच्या गादीला नेहमीच सन्मान देतात. त्यामुळे या निवडणुकीत उदयनराजे यांना प्रचंड बहुमताने विजयी करणे यासाठी नियोजन झाले असून त्याच्या कार्यवाहीस प्रारंभ झाला आहे.


आ. मकरंद पाटील यांच्याबाबत पत्रकार प्रश्न उपस्थित करतात मात्र मकरंद पाटील पूर्ण ताकतीनिशी कामाला लागले आहेत. महाबळेश्वर ,वाई, खंडाळा येथे त्यांचे कार्यकर्ते खासदार उदयनराजे भोसले यांचे काम करत असून वाई येथे महाराजांना नक्कीच दमदार मताधिक्य मिळेल. महाराजांचा उमेदवारी अर्ज भरताना वाई येथील सर्वाधिक गाड्यातून कार्यकर्ते आले होते. त्याचबरोबर येथील कार्यकर्ते उत्साहाने त्यात सहभागी झाले आहेत. माजी आमदार मदनदादा भोसले यांचा संपर्कही जोरदार सुरू आहे. त्यामुळे वाई येथे आम्हाला मताधिक्य मिळणार यात शंका नाही .
रविराज आणि यशराज देसाई गावोगावच्या बैठकांच्यावर भर देणार आहेत असेही देसाई म्हणाले.
यावेळी पाटण,कराड चे दोन्ही मतदार संघ महाराजांना सर्वाधिक मताधिक्य असा विश्वास व्यक्त केला.याचे कारण सांगताना ते म्हनाले ,धैर्यशील कदम,मनोजदादा घोरपडे आणि अतुलबाबा भोसले यांचा झंझावाती प्रचार सुरू आहे.अतुल भोसले यांनी तर मोदी यांच्या सभेसाठी जातीने लक्ष घातले आहे. असेही देसाई म्हणाले.

दरम्यान, सातारा लोकसभेचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत मनोगत व्यक्त केले. तसेच कोणाचेही नाव न घेता विरोधकांवर तिखट शब्दात निशाणा साधला.
खा.उदयनराजे म्हणाले , विरोधकांना जिल्ह्यामध्ये चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्व उमेदवार म्हणून मिळू नये हे विरोधकांचे दुर्दैव, शोकांतिका आहे. घोटाळे करणारे भ्रष्टाचारी, माथाडी ,कष्टकरी आणि शेतकऱ्यांच्या पैशाचा अपहर करणारे उमेदवार सातारकरां समोर उभे केले आहेत. लोकशाहीच्या न्यायालयात त्यांना नक्कीच शिक्षा होईल. आमचा कोणाला वैयक्तिक विरोध असण्याचे कारण नाही, मात्र भ्रष्ट विचाराला आम्ही विरोध करणारच. आम्ही गप्प बसलो तर, त्यांच्या भ्रष्टाचाराबाबत कोणी बोलणार नाही. म्हणून आमदार महेश शिंदे यांनी त्यांच्या भ्रष्टाचाराबाबत आवाज उठवला .त्यांनी उठवलेला आवाज योग्यच आहे. खरे तर आम्ही तुमच्या विश्वासावर निवडून येतो .तुमच्या त्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही, हे नक्की आहे. सहा विधानसभा मतदारसंघात चार आमदार हे महायुतीचे आहेत.
 विरोधक मागच्या निवडणुकीची तुलना आजच्या परिस्थितीशी करत आहेत. मात्र आता परिस्थिती बदललेली आहे. वेगळी आहे. यापुढे विधानसभेच्या निवडणुकीत वाटेल त्या परिस्थितीत सातारा जिल्ह्याला महायुतीचे सहा आमदार पाहायला मिळतील असा ठाम निर्धार करतो. विश्वास मी देतो. असे खासदार उदयनराजे भोसले म्हणाले.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्रंदिवस विकासासाठी झटत आहेत. आम्हा सगळ्यांमध्ये एक वाक्यता आहे. विकासाचा विचार आहे. या उलट विरोधी पक्षाकडे विस्कळीतपणा आणि स्वार्थ एवढेच दिसून येतो. आम्ही सर्व एका विचाराने एकत्र येत आहोत .एकत्र राहिलो आहोत. आमचे उद्दिष्ट एक आहे. आमचा विचार विकासाचा आहे. त्यामुळे आम्ही केवळ घोषणा देत नाही तर प्रत्यक्ष काम करून दाखवतो.यासाठी मला सहा विधानसभा मतदारसंघातून भक्कम पाठिंबा आहे.
 असे सांगून खासदार उदयनराजे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या घटने संदर्भात मार्मिक टिपणी केली.

 गोरगरिबांची मुले शिकावीत शिक्षणापासून वंचित राहू नयेत ,त्यांनी प्रगतीची भरारी मारावी या उद्देशाने कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली. मात्र या शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी तयार केलेली घटनाच सध्याच्या संचालकांनी बदलली. राज्याचा मुख्यमंत्री रयत शिक्षण संस्थेचा पदसिद्ध अध्यक्ष असावा. त्यामुळे या शिक्षण संस्थेला मदत व्हावी. ही मदत गरीब मुलांच्या शिक्षणासाठी व्हावी असा विचार कर्मवीर भाऊराव पाटलांचा होता. मात्र यांनी घटना स्वतःच बदलली आणि स्वतःलाच तहहयात अध्यक्ष करून घेतले. यामध्ये लोककल्याण, गोरगरिबांसाठी काम करणे हा यशवंत विचार संपवून टाकला. खरे तर रयत शिक्षण संस्था स्थापन करण्यात आमच्या घराण्याचे महत्वाचे योगदान आहे. त्याचा मला अभिमान आहे. मात्र सध्या सुरू असलेला हा प्रकार यशवंत विचारांना तिलांजली देणाराच आहे. 
-----------------------------चौकट
मी माझ्या विचारांवर ठाम: महेश शिंदे 
 कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी, शरद पवार यांनी यशवंत विचार सांगू नयेत हा त्यांचा विचार पुन्हा एकदा अधोरेखित केला. त्याचे कारण सांगताना ते म्हणाले,मी माझ्या विचारांवर ठाम आहे.कारण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांचे विचार त्यांचे कर्तृत्व आणि आत्ता दिलेला उमेदवार त्याचे कर्तृत्व हे पूर्णपणे भिन्न आहेत.एकमेका विरोधी आहेत.अशा घोटाळेबाजांना यशवंतराव चव्हाण साहेबांनी कधीच उभे केले नसते. त्यामुळे शरद पवार यांनी यशवंत विचारांची महती सांगू नये असे आमदार महेश शिंदे म्हणाले.
---------------
यावेळी नितीन काका यांनी, आमच्यात कोणतीच नाराजी नाही असे स्पष्ट केले. वाई येथे खासदार उदयनराजे भोसले यांचे काम जोरात सुरू असून, त्यांना आम्ही मताधिक्य देणार असे स्पष्ट केले. प्रारंभी पंचवीस वर्षापासून अस्तित्वात असणाऱ्या घड्याळा चिन्हाला उमेदवारी मिळावी असा आमचा आग्रह होता. विचार होता. मात्र कालांतराने वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाल्यावर खासदार उदयनराजे भोसले यांचे नेतृत्व मान्य करण्याचे ठरले. आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्या चे वाईकरांनी ठरवले. नाराजी नव्हती आणि नसेल असे ते म्हणाले.

Tuesday, April 23, 2024

घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले...

               रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार 
उदयनराजे गरजले; उडतारे, भुईंज, किकली, खडकी, विररमाडे, अमृतवाडी कळंभे चिंधवली जांभ गावांना भेटी
वाई : काँग्रेस पक्षातील नेत्यांकडून घोटाळे बाजीचा प्रकार अनेक वर्षे सुरू आहे. जे चुकीच आहे, त्याला चूक म्हणण्याचं धाडस माझ्यात आहे. महायुतीच्या माध्यमातून घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार, असा विश्वास खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला. 
भुईंज ता. वाई येथील महालक्ष्मी मंदिरात ग्रामस्थांना संबोधित करताना उदयनराजे बोलत होते. यावेळी माजी आमदार मदन भोसले भाजपच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुरभी भोसले, अर्जुनराव भोसले, सरपंच विजय वेळे, सतीश भोसले, मदन शिंदे, गजानन भोसले मोहन भोसले, ईशान भोसले संजय शिंदे विजय शिंदे विकास पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. 
उदयनराजे म्हणाले, शिवाजी महाराज हे लोकशाहीचे जनक आहेत. सर्वसामान्य रयतेसाठी त्यांनी काम केले. त्यांचा वारसा सांगत असताना सर्वसामान्यांचा विकास उत्कर्ष करण्यासाठी मी कायमच वाटचाल करत आलो आहे. गैरप्रकार मला खपत नाही. लोकांच्या विश्वासाला तडा जाता कामा नये, हे मी कायमच जपत आलो आहे. भ्रष्टाचारांसोबत जाण्याचे पाप माझ्याकडून घडणार नाही. भ्रष्टाचार करणाऱ्या विरोधातील वैचारिक मत तयार करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत आहे. त्यामुळे मतदारांनी साथ द्यावी.
मदन भोसले म्हणाले, भुईंज गावातील १८ पगड जाती उदयनराजेंच्या पाठीशी आहेत. आम्ही काँग्रेस संस्कृतीत वाढलो आहे परंतु भाजपच्या माध्यमातून नरेंद्र मोदींनी केलेल्या कामाची तुलना कोणाशी होऊ शकत नाही भारत शक्तिशाली विकसित देश म्हणून ओळख निर्माण करण्याचे काम मोदींनी केले आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसदाराला विजयी करण्याची जबाबदारी सर्वांची आहे गावकी भावकीची निवडणूक नसून देशाचे भवितव्य घडवणारी ही निवडणूक असल्याने प्रत्येकाची ही नैतिक जबाबदारी आहे.
दरम्यान, भुईंज येथील नाभिक समाज वीरशैव लिंगायत समाज धनगर समाज मुस्लिम समाज मातंग समाज स्वाभिमानी नाविन्य महिला बचत गट आदी संघटनांच्या वतीने उदयनराजेंना पाठिंब्याचे लेखी पत्र देण्यात आले. 
चिंधवली येथे श्री नवलाई देवीचे दर्शन घेतले यावेळी पैलवान जयवंत पवार माणिक पवार बाळासाहेब विधाते माजी आमदार कांताताई नलावडे कविता देशमुख सुनील काटकर विकास शिंदे दीपक ननावरे, सदानंद लेले, संजय शिंदे, विकास पवार, रणजित माने आदी उपस्थित होते. 
किकली येथे ग्रामदैवत भैरवनाथाचे दर्शन, मुख्य चौकातील शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले याप्रसंगी कुमार बाबर धनंजय बाबर बबन बाबर सुरेश बाबर शिवाजी बाबर किशोर बाबर सूर्यकांत वाघमारे भानुदास बाबर रामदास बाबर राजेंद्र बाबर वीरसिंग बाबर अनिल बाबर अनिकेत बाबर धनंजय बाबर निलेश बाबर अक्षय बाबर पंकज बाबर यश बाबर धनंजय गायकवाड उपस्थित होते. 
जांब येथील भैरवनाथ व हनुमान मंदिरात दर्शन प्रसंगी पैलवान मधुकर शिंदे अक्षय शिंदे सरपंच अभिजीत शिंदे उपस्थित होते. उडतरे येथे ग्रामदैवत श्री काळेश्वर महाराजांचे दर्शन घेतले. या ठिकाणी युवकांचा उत्साह मोठ्या प्रमाणावर जाणवला. याप्रसंगी उपसरपंच चंद्रकांत बाबर, नरेंद्र बाबर प्रवीण पवार प्रकाश पवार दत्तात्रय पवार अवधूत पवार आदी उपस्थित होते
असले येथील भवानी मातेच्या दर्शनप्रसंगी ईशान भोसले विजय वाघ शहाजी वाघ मदन पिसाळ प्रवीण निकम प्रमोद निगडे अमर वाघ स्वप्निल वाघ शशिकला वाघ  उपस्थित होते. व्याजवाडी यात्रेनिमित्त श्री बाळ सिद्धनाथ देवस्थान येथे दर्शन घेतले. याप्रसंगी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रोहिदास पिसाळ गणेश पिसाळ तालुकाध्यक्ष दीपक ननावरे किशोर पिसाळ दत्तात्रय कुदळे उपस्थित होते. पाचवड येथे झालेल्या कार्यक्रमात निरव पाटोळे आदित्य इथापे अर्चना इथापे वर्षा जंगम सुनील जंगम धनंजय गायकवाड अमरसिंह गायकवाड रेश्मा गायकवाड दिनेश मोरे संदीप पवार चंद्रकांत भोसले उपस्थित होते. अमृतवाडी येथे सुयोग पाटील सरपंच सचिन रत्नपारखे, अक्षय साळुंखे आदींच्या उपस्थितीत उदयनराजे यानी मार्गदर्शन केले. खडकी येथे सरपंच प्रीतम शिंगटे दीपक जाधव सुनील जाधव संभाजी शिंगटे श्रीकांत शिंगटे सुरज जाधव नामदेव जाधव रमेश शिंगटे प्रशांत शिंगटे योगेश शिंगटे सागर जाधव यांच्या उपस्थितीत मेळावा झाला. 
विरमाडे येथे बाळ सिद्धनाथ देवस्थान येथे दर्शन घेतले. यावेळी सरपंच स्वाती कचरे उपसरपंच जयवंत सोनवणे तुषार सोनवणे सविता सोनवणे आत्माराम सोनवणे संगीता सोनवणे उपस्थित होते. कळंबे येथे मानाई देवी चे दर्शन घेतले याप्रसंगी हनुमंत गायकवाड जितेंद्र गायकवाड अभिजीत जाधव संभाजी गायकवाड सुरेश गायकवाड तानाजी शिवथरे संजय शिंदे आदी उपस्थित होते.

वाई तालुका गर्जे उदयनराजे... उदयनराजे 
वाई तालुक्यातील गावागावात उदयनराजेंचे अत्यंत उत्साहात स्वागत केले. उदयनराजेंच्या स्वागतासाठी जागोजागी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. भुईंज येथे खुल्या जीपमधून उदयनराजेंची मिरवणूक काढण्यात आली. बाईक रॅली काढून युवकांनी उत्साह वाढवला. ठिकठिकाणी पाठिंब्याचे पत्र देण्यात आले. त्यामुळे वाई तालुका गर्जे उदयनराजे... उदयनराजे असेच चित्र पाहायला मिळाले.

फोटो
भुईंज : येथील महालक्ष्मी मंदिरात आयोजित बैठकीत बोलताना खासदार उदयनराजे भोसले समवेत माजी.आमदार मदन भोसले. 
भुईंज : खासदार उदयनराजेंची खुल्या जी मधून काढलेली मिरवणूक. यावेळी उपस्थित माजी आमदार मदन भोसले सुरभी भोसले ईशान भोसले.

महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते साताऱ्यात भ्रष्टाचाराचं रोपटे लावतात उदयनराजे यांची खरमरीत टीका; जिल्ह्यात एकही भ्रष्टाचार न करणारा उमेदवार त्यांना मिळाला नाही....

                  रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते साताऱ्यात भ्रष्टाचाराचं रोपटे लावतात 
उदयनराजे यांची खरमरीत टीका; जिल्ह्यात एकही भ्रष्टाचार न करणारा उमेदवार त्यांना मिळाला नाही
सातारा : महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्याचे माझ्यावर खूपच प्रेम आहे. मला विरोध करण्यासाठी ते जिल्ह्यात चार चार सभा घेणार आहेत. माझ्या विरोधात त्यांना इतक्या मोठ्या जिल्ह्यामध्ये एकही चारित्र्यसंपन्न उमेदवार मिळाला नाही, आता ते घोटाळ्याचे रोपट जिल्ह्यात लावण्याचा प्रयत्न करत आहेत अशी खरमरीत टीका लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. 
सातारा येथील लेक व्ह्यू हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या आजी-माजी नगरसेवकांच्या बैठकीत ते बोलत होते. उदयनराजे म्हणाले, काँग्रेस पुरस्कृत महाविकास आघाडीला लोकांसमोर जाऊन मते मागण्याची नैतिकता राहिली नाही. या पक्षाला जनतेने पाठिंबा दिला त्या पाठिंबाच्या बळावर देशाला 50 वर्ष मागे खेचण्याचं पाप या पक्षाने केले आहे. देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी नरेंद्र मोदी प्रयत्न करत असताना नैतिकता नसलेले लोक विरोधाला विरोध करत लोकांमध्ये गैरसमज पसरवत आहेत. विकासाच्या मुद्द्यावर कायमस्वरूपी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. 21व्या शतकात मोठी स्पर्धा जास्तीत जास्त विकास कामे झाली पाहिजेत त्यासाठी एकी महत्त्वाची आहे वेळ गेली की पुन्हा ती येऊ शकत नाही त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात कामे मार्गी लागायचे असतील तर स्थिरता अत्यंत गरजेचे आहे. राज्यात केंद्रात स्थिर सरकार असेल तर विकास कामे झपाट्याने होतील. स्वार्थापोटी सरकारमध्ये एकत्र आलेले लोक लोकांचा विकास कधीच साधू शकत नाहीत त्यामुळे आपण अत्यंत सावधगिरीने पुढची पाऊले टाकली पाहिजेत. 

माझ्या हातात घड्याळ, गळ्यात कमळ आणि खांद्यावर धनुष्य
जिल्ह्याला गतवैभव प्राप्त करून द्यायचे. चुटकीसरशी सगळे प्रश्न सोडवण्याची हिंमत माझ्यात आहे माझ्या गळ्यात कमळ आहे हातात घड्याळ तर खांद्यावर धनुष्यबाण आहे. त्यामुळे या सर्व महायुतीच्या ताकतीच्या जोरावर भविष्यात सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे आमदार निवडून येतील असा विश्वास उदयनराजेंनी व्यक्त केला.
फोटो ओळ 
सातारा येथे आयोजित केलेल्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना खासदार उदयनराजे भोसले.

Friday, August 11, 2023

*ग्रंथालय व्यवस्थापन आणि ग्रामीण पत्रकारिता परीक्षेच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण*


                  रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

*पत्रकारितेच्या क्षेत्रात नवोदितांना भरपूर संधी संधीचा लाभ उठवा*
- *किशोर बेडकीहाळ*
*ग्रंथालय व्यवस्थापन आणि ग्रामीण पत्रकारिता परीक्षेच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण*
सातारा दि. ५ - पत्रकारितेच्या क्षेत्रात नव्याने येणाऱ्यांना भरपूर संधी या क्षेत्रात आहे मात्र आपण ती कशा पद्धतीने त्या संधीचा उपयोग करून घेतो यावरच सगळे अवलंबून आहे त्यामुळे विकासात्मक व समाजाभिमुख पत्रकारिता करून नावलौकिक संपादन करा असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकीहाळ यांनी सातारा येथे बोलताना केले.
             शिवाजी विद्यापीठाच्या दुरशिक्षण केंद्राच्या ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या ग्रंथालय व्यवस्थापन आणि ग्रामीण पत्रकारिता व  जनसंवाद प्रमाणपत्र कोर्स चा निकाल लागला असून त्यात उत्तीर्ण झालेल्या दूरशिक्षण केंद्राच्या सातारा जिल्हा विभागीय केंद्राच्या वतीने प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम किशोर बेडकीहाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी प्राचार्य अण्णासाहेब होवाळे , ज्येष्ठ पत्रकार सर्वश्री दिनकर झिंबरे  , शिवाजी राऊत ,  विजय मांडके व जिल्हा समन्वयक डॉ.  सूर्यकांत गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना प्रमाणपत्रांचे वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
      आपण लिहिलेल्या बातमीत किती उपस्थित त्यांची नावे आपण दिली यापेक्षा आपण अन्याय झालेल्या किती घटनांना वाचा फोडली हे महत्त्वाचे आहे असे विचार शिवाजी राऊत यांनी व्यक्त केले. तर दिनकर झिंबरे यांनी समाजातील तळाच्या घटकाला आपल्या बातमीत स्थान द्यावे असे मत व्यक्त केले.
यावेळी बोलताना विजय मांडके यांनी आपल्या सभोवताली ज्या घटना घडतात त्याचे दिग्दर्शन आपल्या बातमी रूपे लेखनातून आले पाहिजे व त्या गोष्टींना न्याय दिला पाहिजे असे सांगितले.
      प्रास्ताविक जिल्हा समन्वयक डॉ सूर्यकांत गायकवाड यांनी केले. आभार प्रशिक्षणार्थी प्रा सुनील गायकवाड यांनी मानले.







Friday, July 28, 2023

२० साह्यक पोलीस निरीक्षकांच्या सातारा जिल्हाअंतर्गत बदल्या...

                रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~


२० साह्यक पोलीस निरीक्षकांच्या
सातारा जिल्हाअंतर्गत बदल्या 

सातारा ता,२९(प्रतिनिधी) सातारा जिल्हा अंतर्गत पोलीस अधिकारी यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित करण्यात आले असून बदली ठिकाणी तात्काळ हजर राहून पूर्व अहवाल देण्याच्या सूचना सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिले आहेत.  महाराष्ट्र पोलीस अधिनियम १ ९ ५१ चे कलम २२ न पोटकलम ( २ ) अन्वये , जिल्हा स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळास प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून , जिल्हा स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळाचे मान्यतेने व शिफारशीनुसार एकूण 20 साह्यक पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या जिल्हया अंतर्गत प्रशासकीय कारणास्तव व विनंतीवरून करण्यात आल्या आहेत .  सध्याच्या नेमणुकीच्या ठिकाणावरून नव्याने नियुक्ती बदली करण्यात आलेल्या पोलीस ठाण्याचा तपशील पुढील प्रमाणे

१ सपोनि प्रशांत दतात्रय बधे (प्रभारी उंब्रज)

 २ सपोनि सुशिल भास्कर भोसले (प्रभारी लोणंद )  

३ सपोनि शिवाजी बबन भोसले (प्रभारी वाठार ) 

४ सपोनि अशिष दिलीप कांबळे (प्रभारी पुसेगाव)

५  सपोनि विजय भागवत गोडसे  (प्रभारी कोयनानगर)

६ सपोनि चेतन मनोज मछले (प्रभारी कराड वाहतुकशाखा)

७ सपोनि अजय लक्ष्मण गोरड (कराड शहर )

८ सपोनि विशाल किसनराव वायकर (खंडाळा)

९ सपोनि  संजय सजन बोंबले (वाचक पोलीस अधीक्षक)

१० मसपोनि सरोजिनी विलास पाटील(कराड शहर)

११सपोनि संदीप निवृत्ती सूर्यवंशी (कराड शहर)

१२ सपोनि सुधीर सुर्यकांत पाटील (स्थानिक गुन्हे शाखा)

१३ सपोनि रोहित रमेश फार्णे (सातारा शहर)

१४ सपोनि किरण रविद्र भोसले (सातारा शहर)

१५ सपोनि अविनाश ज्ञानेश्वर माने (सातारा शहर)

१६ सपोनि अशोक हनुमंत हुलगे (फलटण ग्रामीण)

१७ सपोनि नवनाथ विभीषण रानगट (फलटण ग्रामीण)

१८ सपोनि चिमाणी वैजिनाथ केंद्रे  (शिरवळ) 

१ ९ सपोनि संदीप आनंद कामत (पाटण)

२० मसपोनि  शैलेजा सर्जराव पाटील (कराड तालुका)

 वरील सर्व नमूद पोलीस अधिकारी  यांनी तात्काळ नविन नेमणूकीचे ठिकाणी हजर होवून त्याबाबतचा पूर्तता अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Friday, July 14, 2023

राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर...

                रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर

राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले  विभाग 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन हे खाते राहील.

इतर २६ मंत्र्यांची खाती  पुढीलप्रमाणे:

छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील – सहकार
राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास
सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
हसन मियाँलाल मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य
चंद्रकांतदादा बच्चू पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
विजयकुमार कृष्णराव गावित- आदिवासी विकास
गिरीष दत्तात्रय महाजन- ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन
गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता
दादाजी दगडू भुसे- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) 
संजय दुलिचंद राठोड- मृद व जलसंधारण
धनंजय पंडितराव मुंडे - कृषि
सुरेशभाऊ दगडू खाडे- कामगार
संदीपान आसाराम भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन
उदय रविंद्र सामंत- उद्योग
प्रा.तानाजी जयवंत सावंत- सार्वजनिक आरोग्य व  कुटुंब कल्याण
रवींद्र दत्तात्रय चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), 
अब्दुल सत्तार- अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन
दीपक वसंतराव केसरकर- शालेय शिक्षण व  मराठी भाषा
धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम – अन्न व औषध प्रशासन
अतुल मोरेश्वर सावे – गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण
शंभूराज शिवाजीराव देसाई- राज्य उत्पादन शुल्क
कु. अदिती सुनिल तटकरे – महिला व बालविकास
संजय बाबुराव बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे
मंगलप्रभात लोढा- कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता
अनिल पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन.

Thursday, June 29, 2023

क्रीडा क्षेत्र विकास महामंडळ स्थापन करावे,प्रत्येक विभागातून एक क्रीडा क्षेत्रातील आमदार निवडवा : भा ज पा शहराध्यक्ष विकास गोसावी...

               रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
क्रीडा क्षेत्र विकास महामंडळ स्थापन करावे,प्रत्येक विभागातून एक क्रीडा क्षेत्रातील आमदार निवडवा : भा ज पा शहराध्यक्ष विकास गोसावी

 महाराष्ट्रात क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी आणि खेळाडूंना सोयीसुविधा मिळून ते सक्षम होण्यासाठी, क्रीडा क्षेत्र विकास महामंडळ स्थापन करावे आणि पदवीधर तसेच शिक्षक मतदार संघाप्रमाणे  प्रत्येक विभागात क्रीडा मतदार संघ तयार करून त्यातून प्रत्येकी एक क्रीडा क्षेत्रातील आमदार निवडवा अशी मागणी भा ज पा सातारा शहराध्यक्ष आणि  गुणवंत क्रीडा संघटक पुरस्कार  (सातारा जिल्हा ) विजेते , विकास गोसावी यांनी जिल्हाध्यक्ष आमदार श्री जयकुमार गोरे आणि आमदार श्री छ  शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली 

 महाराष्ट्र राज्यातील क्रीडाक्षेत्र आणि खेळाडू यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तसेच क्रीडा क्षेत्र आणि खेळाडू यांच्या समस्या कमी करण्यासाठी आणि खेळाडू सक्षम करण्यासाठी, महाराष्ट्र राज्य  क्रीडा क्षेत्र विकास महामंडळ स्थापन करावे तसेच पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाप्रमाणे क्रीडा मतदारसंघ तयार करून  प्रत्येक विभागातून एक क्रीडा  आमदार निवडावा अशी मागणी करत या साठीचे निवेदन आणि लेखी प्रस्ताव विकास गोसावी यांनी उपमुख्यमंत्री महोदयांना सादर केला 
 
क्रीडा क्षेत्रात अनेक समस्या आहेत, स्टेडियम, क्रीडांगणे, खेळाडू, शाळा कॉलेज यांचा क्रीडा विभाग यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो,
अनेक ग्रामीण खेळ हे परदेशात जातात आणि त्या ठिकाणाहून नवीन नावाने त्या देशाचे नाव घेऊन हे खेळ भारतात येतात आणि नंतर त्यांना मान्यता मिळते.
 
महाराष्ट्र ऑलम्पिक संघटना जी नवीन खेळांना मान्यता देते ती एक  सोसायटी अंतर्गत रजिस्ट्रेशन झालेली संघटना आहे , त्यांच्यावर शासनाचे नियंत्रण काहीच नाही , त्या मुळे नवीन खेळांना लवकर मान्यता दिली जात नाही,क्रीडा परिषद आणि क्रीडा, युवक संचालनालय हे महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत विषय असून ज्या संघटनांना महाराष्ट्र ऑलम्पिक संघटना मान्यता देते त्यांच्या स्पर्धा भरवण्याचे काम हे विभाग करतात , या मध्ये सर्व शासकीय अधिकारी असल्याने ते त्यांच्या नियमाप्रमाणे काम करतात 
 
 या सर्व बाबींमुळे ग्रामीण खेळांकडे, ज्यांचा उगम महाराष्ट्रात, भारतात झाला आहे अशा खेळांकडे  दुर्लक्ष होत आहे,अनेक क्रीडांगणे, स्टेडियम चे स्थानिक धनदांडग्यांच्या फायद्यासाठी व्यापारीकरण करण्यात आले आहे 

क्रीडा क्षेत्र विकास महामंडळ स्थापन  करून त्या मार्फत क्रीडा विश्वाच्या समस्या जाणून घ्याव्यात आणि त्यांचा अभ्यास करून त्यांचे कायमस्वरूपी निराकरण करावे
त्याच प्रमाणे ज्या नोंदणीकृत संघटना आहेत त्यांच्या सदस्यांची, नोंदणी केलेल्या अठरा वर्षे  पूर्ण झालेल्या खेळाडूंची मतदार यादी बनवून  प्रत्येक विभागातून क्रीडा क्षेत्रातील एक आमदार निवडून क्रीडा क्षेत्राचा विकास करावा

क्रीडा क्षेत्र हे खूप मोठे आहे , प्रत्येक घरातील एक तरी मुलगा, मुलगी, किंवा मोठी व्यक्ती या क्षेत्राशी निगडित आहे , या महाराष्ट्र राज्य क्रीडाक्षेत्र विकास महामंडळाची स्थापना करून, प्रत्येक विभागातून एक आमदार निवडून , आपण या क्षेत्रातील समस्या हाताळण्यास सुरुवात केली तर त्या मुळे क्रीडा संघटना, ग्रामीण खेळ आणि खेळाडू यांना न्याय मिळेल आणि आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सांगितलेले ध्येय
 " खेलेगा इंडिया तो बढेगा इंडिया"  अभियान यशस्वी होण्यासाठी मदत होईल, असे निवेदनात नमूद केले आहे 
                 
क्रीडा क्षेत्र विकास महामंडळ स्थापन करून क्रीडा क्षेत्रातील सर्व संघटनाचे प्रतिनिधी त्यात घेतले तर, ग्रामीण भागातील खेळांना प्रोत्साहन मिळेल 
 
 क्रीडा क्षेत्राचा विकास म्हणजे तरुणांना त्यांच्या क्रीडा क्षमता/सहभागासह प्रगती करण्यासाठी दुवे आणि संधी प्रदान करणे . आपल्याकडे अत्यंत कमी सुविधा, मैदानांची वानवा, खेळाडुंना पुरवल्या जाणाऱ्या सोयी उपलब्ध आहेत , खेळाडूंना दजेदार साधने मिळाली पाहिजेत ,या क्रीडा क्षेत्र विकास महामंडळाचा फायदा यासाठी होईल. ज्या खेळांच्या संघटना आहेत त्यांनाही स्वतःचे मैदानच नाही अशी अवस्था आहे त्यातुन त्या खेळाला किती लाभ होणार आणि त्यातून महाराष्ट्राला किती खेळाडू  मिळणार, यासाठी   क्रीडा क्षेत्र विकास महामंडळ स्थापन करून   त्या मार्फत येत्या काळात भरीव योजनांच्या अंमलबजावणीवर भर दिला , तर आणि तरच क्रीडा क्षेत्रातही ‘अच्छे दिन’ येतील. 
नवी धोरणे, नवे उपक्रम, गणवत्तावाढ करण्याची तीव्र इच्छा, परिवर्तनच्या दिशेने उचललेली पावले, गतिमानता व लोकसहभाग हे साध्य करण्यासाठी प्रभावी योजनांच्या कार्यवाहीचे प्रयत्नही या महामंडळा मार्फत करण्यात यावेत ,या महामंडळात कर्मचारी नेमताना ते राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय खेळाडूंमधूनच नेमले जावेत 
 
प्रत्येक तालुक्यातील सर्व खेळाडु  मग ते कोणत्याही खेळाशी संबंधित असुदे  त्या खेळला महाराष्ट्र ऑलम्पिक संघटनेची मान्यता नसली तरीही त्या खेळाडूंची, प्रशिक्षकांची आणि पंचपरीक्षकांची नोंदणी ही महामंडळाकडे करण्यात यावी, या साठी एक अँप विकसित करावे  ज्या मध्ये खेळाडू, खेळ, प्रशिक्षक, संघटना याची पूर्ण माहिती घेऊन हि माहिती सदर संघटनेकडून तपासून घ्यावी , प्रत्येक खेळाडू, प्रशिक्षक आणि पंच परीक्षकांना एक कायम स्वरूपी आयकार्ड आणि नोंदणी क्रमांक द्यावा,एखाद्या शासकीय किंवा संघटनेच्या स्पर्धेत खेळताना, खेळाडूंना, प्रशिक्षकांना किंवा पंच परीक्षकांना इजा झाल्यास त्यांच्या औषधोपचाराचा खर्च महामंडळाने करावा, त्या ठीकाणी एखादा अवयव बसवावा लागला, ऑपरेशन करावे लागले तरी त्या बाबत महामंडळाने मदत करावी,महामंडळाकडे नोंदणी झालेल्या सर्व खेळाडूंचा, प्रशिक्षकांचा आणि पंच परीक्षकांचा अपघाती विमा महामंडळाने काढावा . प्रत्येक जिल्ह्यात  ज्या शाळा कॉलेज चे खेळाडू जास्त प्रमाणात आणि जास्त खेळात सहभागी होतील त्या मधील पहिल्या पाच शाळांचा सन्मान सुद्धा महामंडळा मार्फत प्रत्येक वर्षी केला जावा 
 
विविध खेळांच्या असोसिएशन मार्फत प्रत्येक वर्षी तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय स्पर्धा घेतल्या जातात, याचसाठी काही असोसिएशन कडून स्पर्धेसाठी खेळाडूंच्याकडून  शुल्क आकारले जाते, पण काही खेळाडूंकडे यासाठी पैसे नसल्याने त्यांच्याकडे क्षमता असताना सद्धा ते खेळु  शकत नाहीत म्हणून  या घेतल्या जाणाऱ्या तालूकास्तरीय, जिल्हास्तरीय स्पर्धाचे नियोजन या महामंडळाच्या जिल्हास्तरीय समितीमार्फत व्हावे खेळाडूंच्याकडून कोणतेही शुल्क आकारले जाऊ नये.
महामंडळाने या साठी संघटनांना मदत करावी आणि ती रोख स्वरूपात न देता त्या स्पर्धेसाठी लागणारे साहित्य, खेळाडूंना जेवण, नाश्ता, पंचपरीक्षक मानधन, या स्वरूपात द्यावे. खेळाडू महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन च्या गाडीने किंवा रेल्वेने आले तर त्यांचा प्रवास खर्चही यातूनच केला जावा ,जेणेकरून प्रवास खर्चासाठी पैसे नसल्याने गुणी खेळाडू मागे राहणार नाही   जे खेळाडू खाजगी वाहनाने स्पर्धेसाठी जात असतील किंवा परत येत असतील तर त्यांच्या गाडयांना  सर्व ठिकाणी  टोल माफ करावा. 

 ग्रामीण आणि पूर्वापार खेळल्या जाणाऱ्या खेळांना महामंडळाने सहकार्य करून शासकीय मान्यता मिळवून द्यावी 
 
प्रत्येक खेळाडूला शासकीय नोकरी देणे शक्य नाही, या साठी स्टार्टअप इंडिया मधून क्रीडासाहित्य तयार करणे, विकसित करणे यासाठी खेळाडूनच प्रोत्साहन देऊन व्यवसायाकडे वळवणे आणि आर्थिक मदतीसाठी, कर्जपुरवठा होण्यासाठी  बँकांना हमीपत्र देणे. तसेच साई प्रशिक्षण केंद्र , राज्यातले क्रीडा कार्यालये बालेवाडी , छ संभाजीनगर आणि इतर विभागीय क्रीडा संकुले, स्पर्धा यांना लागणारे क्रीडा साहित्य खेळाडूंच्या आस्थापना कडून खरेदी करून महामंडळा मार्फत दिले जावे आणि खेळाडूंना आर्थिक सक्षम बनवावे 
 असे या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे

या प्रस्तावाची प्रत माहिती साठी भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष आ चंद्रशेखरजी बावनकुळे आणि
क्रीडा व युवक कल्याण,मंत्री 
महाराष्ट्र राज्य ना श्री गिरीशजी महाजन  यांच्याकडे पाठवण्यात आल्या आहेत 

 या वेळी भा ज पा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर , जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, शहर सरचिटणीस प्रवीण शहाणे, विक्रांत भोसले, सोशल मीडिया आघाडी अध्यक्ष कृणाल मोरे उपस्थित होते.

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...