Friday, December 11, 2020

दिनांक. ११/१२/२०२०. जिल्ह्यातील 122 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 4 बाधितांचा मृत्यु...

               $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏
जिल्ह्यातील 122 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 4 बाधितांचा मृत्यु
 
 सातारा दि.11 (जिमाका): जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 122 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर  4  कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 5, सदर बझार 1, शनिवार पेठ 1, शाहुपूरी 1, सैदापूर 3, भक्ताली 1, जाखणगाव 1, कारंडवाडी 1, मल्हार पेठ 2, पाठखळ माथा 1, करंजे 1, रविवार पेठ 1, संभाजीनगर 1.
कराड तालुक्यातील विद्यानगर 1, मलकापूर 1, हजारमाची 1, विंग 5, सुपणे 4.
          फलटण तालुक्यातील फलटण 3, कुंभार गल्ली 2,  शुक्रवार पेठ 1, सुरवडी 1, विढणी 6, जाधववाडी 1,  राजाळे 2, हिंगणे 1, बुधवार पेठ 1, फरांदवाडी 3, मठाचीवाडी 4, धुळदेव 2, पिंप्रद 1, खामगाव 1, मुरुम 1, खुंटे 1, टाकुबाईचीवाडी 1.
          खटाव तालुक्यातील सिंहगडवाडी 1, वडूज 2, सिध्देश्वरकुरोली 2,  पुसेगाव 1.
          माण  तालुक्यातील म्हसवड 4, मलवडी 4, रांजणी 1, बनगरवाडी 2, ढाकणी 1, वडजल 2, खडकी 1.
           कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 2, रहिमतपूर 2, जायगाव 1,  न्हावी बु 2, पाडळी 1, सातारा रोड 1, देऊर 1, शिरढोण 1, एकसळ 1.
पाटण तालुक्यातील पाटण 1, , पापद्रे 2.
          जावली तालुक्यातील म्हसवे 4,  कुडाळ 1, बामणोली 3.  
वाई तालुक्यातील रविवार पेठ 1, धोम कॉलनी 2, बावधन 1, करंजे 1.
महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 1,
खंडाळा तालुक्यातील शिरवळ 1, बावडा 2, अहिेर 1, म्हावशी 1.
बाहेरील जिल्ह्यातील कोल्हापूर 1.
  * 4 बाधितांचा मृत्यु*
 जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये दिवड ता. माण येथील 70 वर्षीय पुरुष, भाडळे ता. कोरेगाव येथील 86 वर्षीय पुरुष, दौलतनगर ता. सातारा येथील 72 वर्षीय पुरुष तसेच उशिरा कळविलेले कर्डी ता. कराड येथील 55 वर्षीय पुरुष अशा एकूण 4 जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

 एकूण नमुने -263596
एकूण बाधित -53319  
घरी सोडण्यात आलेले -50174  
मृत्यू -1760
उपचारार्थ रुग्ण-1385.

Thursday, December 10, 2020

दिनांक. १०/१२/२०२०. सातव्या आर्थिक गणनेच्या कामासाठी येणाऱ्या प्रगणकास खरी व वस्तुनिष्ठ माहिती द्यावी- जिल्हाधिकारी शेखर सिंह / सातारा जिल्ह्यात शस्त्र व जमावबंदीचे आदेश जारी : जिल्हाधिकारी शेखर सिंह...

               $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏
सातव्या आर्थिक गणनेच्या कामासाठी येणाऱ्या प्रगणकास खरी व वस्तुनिष्ठ माहिती द्यावी- जिल्हाधिकारी शेखर सिंह
सातारा दि. 10 (जि.मा.का): सातव्या आर्थिक गणनेचे जिल्हास्तरीय समितीच्या नियंत्रणाखाली सातव्या आर्थिक गणनेचे काम 1 डिसेंबर 2020 पासून नगरपालिका क्षेत्रात सुरु झालेले आहे. सातव्या आर्थिक गणनेद्वारे गाळा करण्यात येणारी माहिती ही गोपनीय राहणार आहे. सातव्या आर्थिक गणनेच्या राष्ट्रीय कामासाठी आपणाकडे येणाऱ्या गणनेच्या प्रगणकास खरी व वस्तुनिष्ठ माहिती देवून नगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
 केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार राज्यात सातवी आर्थिक गणना सन 2019-20 मध्ये घेण्यात येणार आहे. आर्थिक गणनेद्वारे उपलब्ध होणारी माहिती राष्ट्रीय उत्पन्न / राज्य उत्पन्न यांचे अंदाज अधिक अचूकपणा तयार करण्यासाठी उपयुक्त होणार आहे. तद्वतच सदर माहिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्तरावर प्रशासकीय व्यवस्थापन तसेच नियोजनासाठी उपयोगी पडणार आहे. तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांच्या सहभागाची आकडेवारी प्राप्त करण्याच्या दृष्टीने घेण्यात येणाऱ्या पश्चात सर्वेक्षणाची फ्रेम तयार करण्यासाठी ही केला जातो. विशेषत: अनोंदणीकृत/असंघटीत उद्योगातील रोजगार विषयक आकडेवारीचा हा एकमेव स्त्रोत आहे. या बाबी विचारात घेवून राष्ट्रव्यापी सातव्या आर्थिक गणनेचे क्षेत्रीय काम गुणवत्तापुर्वक होणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातील सर्व जणगणना गावे, जनगणना शहरे व नगरपालिका यांतील जनगणना 2011 च्या चार्ज रजिस्टर मधील सर्व प्रगणन गटांमध्ये समाविष्ट कुटुंबे व उद्योग यांची गणना केली जाणार आहे. या गणनेमध्ये हंगामी व बारामाही पिके, शासकीय कार्यालये, आंतरराष्ट्रीय संस्था, न्यायालये, कर कार्यालय, संरक्षण मंत्रालय, पोलिस, भ.नि.नि. कार्यालय, आंतरराष्ट्रीय संस्था-राष्ट्रसंघ, परदेशी वकीलाती, सरकारने अनाधिकृत घोषित केलेल्या आस्थापना-जुगार, पैजा इ. सोडून उर्वरित सर्व आर्थिक कार्याची माहिती गोळा केली जाणार आहे. तसेच शासकीय शाळा, संस्था, कॉलेज, रुग्णालये, वसतीगृह, सदनिका, विश्रामगृह, अतिथीगृह, राष्ट्रीयकृत बँका, सर्व सार्वजनिक उपक्रम, महामंडळे यांचा गणनेत समावेश केला जाणार आहे.
सातव्या आर्थिक गणनेचे जिल्हास्तरावरुन क्षेत्रकाम Common Service Centre (CSC) E-Goverance, यांच्याकडून करण्यात येणार असल्याने त्यांच्याकडून सातारा जिल्ह्यासाठी  1537 पर्यवेक्षक व 1967 प्रगणक नेमण्यात येणार आहेत. प्रगणकांनी केलेल्या शंभर टक्के कामाची छाननी, वैधतीकरण व व्याप्ती ही Common Service Centre (CSC) E-Goverance यांनी नेमलेल्या पर्यवेक्षकांद्वारे केले जाणार आहे. एकूण प्रगणकांपैकी 10 टक्के प्रगणकांच्या कामाचे दुसऱ्या स्तराचे पर्यवेक्षण उपमहासंचालक, क्षेत्रिय कार्य विभाग, राष्ट्रीय नमुना पाहणी संघटना व अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील नेमलेल्या पर्यवेक्षकांद्वारे केले जाणार आहे.
सातव्या आर्थिक गणनेचे राज्यस्तरावरील क्षेत्रकाम Common Service Centre (CSC) E-Goverance यांच्याकडून नेमण्यात आलेल्या प्रगणकांकडून करण्यात येणार आहे. आर्थिक गणनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी, सनिंयत्रण व समन्वयासाठी राज्य स्तर व जिल्हा स्तर अशा स्तरावर विविध समितय स्थापन करण्यात आल्या आहेत. जिल्हास्तरीय समितीच्या नियंत्रणाखाली सातव्या आर्थिक गणनेचे काम 1 डिसेंबर 2020 पासून नगरपालिका क्षेत्रात सुरु झालेले आहे. सातव्या आर्थिक गणनेद्वारे गोळा करण्यात येणारी माहिती ही गोपनीय राहणार आहे. सातव्या आर्थिक गणनेच्या राष्ट्रीय कामासाठी आपणाकडे येणाऱ्या गणनेच्या प्रगणकास खरी व वस्तुनिष्ठ माहिती देवून नगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
0 0 0  0

सातारा जिल्ह्यात शस्त्र व जमावबंदीचे आदेश जारी : जिल्हाधिकारी शेखर सिंह

सातारा दि. 10 (जिमाका) :  कोरोना  या संसर्गजन्य विषाणूचा वाढता प्रादुर्भाव प्रतिबंधीत करण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस दलाकडुन विविध उपाय योजना अंमलात आणल्या जात आहेत. या संबंधाने अंमलात असलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांची अंमल बजावणी करण्यात येणारी प्रतिबंधक कारवाई अशा वेळी तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सातारा जिल्हयातील विविध ठिकाणी कोरोना या संसर्गजन्य विषाणूच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या संबंधाने बंदोबस्त कर्तव्य पार पाडीत असलेल्या पोलीस तसेच गृहरक्षक यांच्यावर हल्ला झाल्याच्या आत्तापर्यंत 09 घटना घडलेल्या आहेत. तसेच अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती झाल्यारात्यातुन देखील कायदा व सुव्यवस्था प्रश्न अथवा तणावग्रस्त परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारतायेत नाही.

सातारा जिल्हयात म्हसवड पोलीस स्टेशन हददीत मौजे म्हसवड ता. माण याठिकाणी सालाबाद प्रमाणे श्री. सिध्दनाथ व आई जोगेश्वरी माता वार्षिक यात्रा 13 ते 18 डिसेंबर 2020 कालावधीत साजरा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच 21 डिसेंबर 2020 रोजी शासनाच्या वतीने कोविड 19 च्या अनुषंगाने योग्य त्या सूचनांचे पालन करुन महाबळेश्वर पोलीस ठाणे हददीत किल्ले प्रतापगड येथे शिवप्रतापदिन साजरा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर दिवशी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने वाई पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाई व मेढा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुडाळ येथे शिवप्रतापदिन उत्सवाचे निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सदर सण वउत्सव कालवधीत कोणताही कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होण्याचीशक्यता नाकारता येत नाही.

मराठा आरक्षण संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाज व मराठा क्रांती ठोक मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या भावना तिव्र झालेल्या असून यासंदर्भात राज्यात विविध ठिकाणी तिव्र स्वरुपाची आंदोलने झालेली आहेत. याच्या प्रतिक्रिया सातारा जिल्ह्यात उमटल्यास अथवा अशा प्रकारची आंदोलने सातारा जिल्ह्यात झाल्यास कायदा वसुव्यवस्था प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

केंद्र शासनाने मंजूर केलेली 3 कृषि विषयक विधेयकांना विविध शेतकरी संघटना तसेच राजकीय पक्ष/संघटना यांच्याकडून विरोध होत असून सदरची विधयेके रद्द होणे संबंधाने आक्रमक पवित्रा घेण्यात आलेले असून ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. तसेच शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांचे नेतृत्त्वात ऊस एफआरपी व शेतकऱ्यांची वीज बिले माफ करावी या मागण्यांसंदर्भात देखील कोणत्याही वेळी आंदोलनात्मक प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.सदर कालावधीत एखाद्या घटनेवरुन अथवा प्रकारावरुन कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण शक्यता नाकारता येत नाही.

परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील झालेले नुकसान पाहता त्यांच्या भावना तिव्र झाल्या असून शासनाकडून त्वरीत मदत मिळावी म्हणून शेतकऱ्यांची आग्रही भूमिका घेतलेली असून त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास त्यांच्याकडून देखील कोणत्याही वेळी आदोलनात्मक प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अद्यापी देखील राज्यात विविध ठिकाणी वाढीव विज बिलाच्या संदर्भात महावितरण कार्यालयाचे अथवा अन्य ठिकाणी मोठया प्रमाणात आंदोलने होत असून त्यास विविध वृत्तमाध्यमातून मोठया प्रमाणात प्रसिध्दी मिळत आहे. तसेच भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच आम आदमी पक्ष व बहुजन वंचित आघाडी यांचे वतीने उग्र स्वरुपाचे विविध प्रकारचे आंदोलनात्मक कार्यक्रम करण्यात येणार असल्याचे समजून येत आहे. अशा प्रकारची आंदोलने सातार जिल्ह्यात झाल्यास त्यावरुन देखील कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लहुजी शक्ती सेना संस्थापक विष्णू कसबे यांच्या वतीने लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा याकरीता 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर रोजी पर्यंत महाराष्ट्रातील सर्व आमदार, खासदार यांचे निवासस्थानासमोर धरणे आंदोलन करणार असलेबाबत इशारा दिलेला आहे. कालावधीत कोणताही कायदा व सुव्यवस्था परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सातारा जिल्हयातील एकूण 15 विविध परीक्षा केंद्रावर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर यांचे मार्फत 10 वी व 12 वी परीक्षा 20 नाव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत घेण्यात येणार आहे. तसेच धनंजय गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स, सातारा व कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, सातारा या कॉलेजवर 21 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर या कालावधीत चार्टर्ड अकाउंटन्स परीक्षा घेण्यात येणार आहेत. सदर परीक्षाकालावधीत कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 सातारा जिल्ह्यात नागरिक विविध मागण्यासाठी विकास कामांसाठी तसेच इतर कारणासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा व इतर शासकीय कार्यालय या ठिकाणी उपोषण, आत्मदहन, धरणे आंदोलन करणार असलेबाबत इशारा देत असतात त्यांना पोलीस व प्रशासनाच्या वतीने वारंवार परावृत्त करण्याचा प्रयत्न केला जातो. तरी उपोषण व आत्मदहन कालावधीमध्ये कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार अगर कायदा सुव्यवस्था प्रश्न जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी संपूर्ण सातारा जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1) अन्वयेचे शस्त्रबंदी आदेश व कलम 37 (3) अन्वये 11 डिसेंबर राजी 00.00 वा पासून ते 24 डिसेंबर रोजी 24.00 वा. पर्यत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केले आहे. या कालावधीत शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, बंदूका, सुऱ्या, काठया किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापराता येईल अशी कोणतीही वस्तु बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा अस्त्र, सोडावयाची अस्त्र, फेकावयाची हत्यार किंवा साधणे बरोबर घेणे, जमा किंवा तयार करणे, व्यक्तीची अगर प्रेते किंवा त्यांचे प्रतिमेचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक रीतीने घोषणा करणे, गाणी म्हणणे किंवा वाद्य वाजवणे, सभ्यता अगर निती या विरुध्द असतील अशी किंवा राज्याची असतील अशी किंवा राज्याची शांतता धोक्यात येईल असे प्राधिकाऱ्यास वाटेल अशी भाषणे करणे हावभाव करणे सोंग आणाणे अशी मनाईचे उल्लंघन करुन जर कोणताही इसम अशी कोणतीही वस्तु बरोबर घेवून जाईल किंवा कोणत्याही जिन्नस किंवा वस्तु तयार करणे किंवा त्यांचा लोकांत प्रसार करणे. अशा मनाईचे उल्लंघन करुन जर कोणताही इसम अशी कोणतीही वस्तु बरोबर घेवून जाईल किंवा कोणताही जिन्नस दाहक पदार्थ किंवा अस्त्र जवळ बाळगतील तर तो कोणत्याही पोलीस अधिका-याकडून निशस्त्र केले जाणेस किंवा दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ क्षेपणास्त्र त्यांच्याकडून जप्त केले जाण्यास पात्र असेल आणि अशा त-हेने जप्त केलेली वस्तु दाहकपदार्थ, स्फोटक पदार्थ किंवा क्षेपणास्त्र हे सरकार जमा होईल. पोटकलम (3) अन्वये असलेल्याअधिकारान्वये सार्वजनिक सुव्यवस्था राखणेसाठी कोणत्याही जमवास किंवा मिरवणूकीस वरील कालावधीत व कार्यक्षेत्रात या आदेशान्वये मनाई करीत आहे.

मुंबई पोलीस अधिनियम 1951 (सुधारणा अध्यादेश) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 2014 चे कलम 37(1)(3) मधील या हुकुमाच्या तरतुदी खालील नमुद केलेल्या इसमाना लागू होणार नाही.  शासनाची सेवा करणारे किंवा नोकरी करणेच्या कामी ज्यांच्या वरीष्ठांनी निर्दीष्ट केलेवरून अगर त्यांना कर्तव्याच्या स्वरुपामुळे अशी खंड 1 मध्ये उल्लेखलेल्या पैकी वस्तु धारण करणे किंवा देणे आवश्यक आहे, ज्यांना ज्यांना शारिरीक दुर्बलतेच्या कारणावरुन जिल्हादंडाधिकारी अगर त्यांना प्राधिकृत केलेले अधिकाऱ्यांना, लाठी किंवा काठी वापरणेस परवानगी दिली असेल अशी व्यक्ती, सदरचा आदेश यात्रा, धार्मिक कार्य, लग्न विधी कार्य तसेच अत्यविधी कार्यास लागू होणार नाही, ज्या लोकांना शांततेचा मार्गाने एकत्र जमून कोणताही कार्यक्रम साजरा करावयाचा असेल त्याचवेळी पोलीस अधिक्षक, संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी, तसेच संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरिक्षक यांची आगावू परवानगी घेतली असेल तर त्यांना सदरचा आदेश लागू होणार नाही.

दिनांक. १०/१२/२०२०. जिल्ह्यातील 114 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 3 बाधितांचा मृत्यु...

               $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏
जिल्ह्यातील 114 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 3 बाधितांचा मृत्यु
 
 सातारा दि.10 (जिमाका): जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 114 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर  3  कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 11, शनिवार पेठ 1, बुधवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, मल्हार पेठ 1, सदरबझार 2, गोडोली 2, कोडोली 1, अनपटवाडी 1, देगाव 1, चिंधवली 1, भरतगावाडी 1, वळसे 1, जरेवाडी 1, भोगावली 1, शिवथर 1, गावठाण पिंगळी 1, सोनगाव माहुली 1,
कराड तालुक्यातील कराड 1, शनिवार पेठ 1, गजानन हौसिंग सोसायटी 1, तांबवे 1, उंब्रज 2, शेरे 1, पाडळी 1, अटके 1, औंड 1,
           पाटण तालुक्यातील ढेबेवाडी 1.
          फलटण तालुक्यातील कोळकी 5, साखरवाडी 2, वाखरी 2, डोंबाळवाडी 1, होळ 1, राजाळे 1, असू 1, कांबळेश्वर 1, चौधरवाडी 1, वडजल 1, निंबळक 1, विढणी 1,जाधववाडी 1,
          खटाव तालुक्यातील पुसेगाव 1, निढळ 1, बोंबाळे 1, औंध 1, वडूज 2.
          माण  तालुक्यातील बोडके 1, म्हसवड 9, बनगरवाडी 2, रांजणी 1, कुळकजाई 1.
           कोरेगाव तालुक्यातील जांब बु 1, एकसळ 2, रहिमतपूर 1, नाळेवाडी 1, शिरंबे 1, जळगाव 1,
          जावली तालुक्यातील कुडाळ 3, कारंडी 1,
वाई तालुक्यातील वाई 2, गणपती आळी 1, कानूर 1, सोनगिरवाडी 1
खंडाळा तालुक्यातील लोणंद 9, सुखेड 1, बावडा 1,
इतर 4, पिंपरी 1,
बाहेरील जिल्ह्यातील वाळवा 1, विरार.
  * 3 बाधितांचा मृत्यु*
 क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयात उपचार घेत असलेल्यांमध्ये शेरे शिंदेवाडी, ता. फलटण येथील 60 वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये कोंडवे, ता. सातारा येथील 71 वर्षीय पुरुष, पिंपराड ता. फलटण येथील 70 वर्षीय पुरुष  अशा एकूण 3 जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

 एकूण नमुने -262234
एकूण बाधित -53193  
घरी सोडण्यात आलेले -50089  
मृत्यू -1756
उपचारार्थ रुग्ण-1348.

Wednesday, December 9, 2020

दिनांक. ०९/१२/२०२०. जिल्ह्यातील 133 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 5 बाधितांचा मृत्यु...

              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏
जिल्ह्यातील 133 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 5 बाधितांचा मृत्यु
 
 सातारा दि.9 (जिमाका): जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 133 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 5  कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 3, शनिवार पेठ 2, सदरबझार 2, प्रतापगंज पेठ 1, पिरवाडी 1, शाहुनगर 2, जळगाव 1,  कोडोली 5, साबळेवाडी 1, आरळे 1, सांबरवाडी 3.
कराड तालुक्यातील मलकापूर 2, किवळ 1.
           पाटण तालुक्यातील विहे 1, रासती 1, गरवडे 1, बहुले 2.
          फलटण तालुक्यातील फलटण 3, वाठार निंबाळकर 2, धुळदेव 2, आदर्की बु 1, नांदल 1, पिंपळवाडी 2,  , साखरवाडी 1, आदर्की 1, तरडगाव 1, मुरुम 1, तावडी 1.
          खटाव तालुक्यातील वादुस 1, मोरवे 1, गणेशवाडी 1,खटाव 1.  
          माण  तालुक्यातील बिदाल 2, नरवणे 1, दहिवडी 2, मोही 1, म्हसवड 2, राजणी 1, कुळकजाई 1, झाशी 1, मलवडी 1, पिंपरी 1.
           कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली 1.
          वाई तालुक्यातील देगाव 1, कळंबे 1, उडतारे 1, बोपेगाव 1.
खंडाळा तालुक्यातील शिवळ 1, लोणंद 4, अहिरे 1, सुखेड 1.  
इतर 1, वाठार 2, जुलेवाडी 1.
  क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय सातारा येथील 46 व आघारकर येथील 8 असे एकूण 54 रुग्णांची माहिती तांत्रिक कारणांमुळे उपलब्‌ध न झाल्याने यामध्ये  समावेश करण्यात आलेला नाही
 5 बाधितांचा मृत्यु
 लिंब, ता. सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, बोंबाळे ता. खटाव येथील 82 वर्षीय पुरुष,  गडकर आळी सातारा येथील 32 वर्षीय पुरुष, सुरुर ता. वाई येथील 71 वर्षीय पुरुष, म्हसवड ता. माण येथील 75 वर्षीय पुरुष अशा एकूण 5 जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

Monday, December 7, 2020

दिनांक. ०८/१२/२०२०. जिल्ह्यातील 64 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 4 बाधितांचा मृत्यु...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
जिल्ह्यातील 64 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 4 बाधितांचा मृत्यु

  सातारा दि.8 (जिमाका): जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 64 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 4  कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 2, सैदापूर 1, शनिवार पेठ 1, करंजे 1, शाहुनगर 1, चिमणपुरा पेठ 1, मर्ढे 1, देगाव 1, कोडोली 1, वर्ये 1, पळसवाडे 1, चिंचणी 1.
कराड तालुक्यातील कराड 1, ओगलेवाडी 1, सुपणे 1, विरवाडे 1, विंग 1.
फलटण तालुक्यातील पिंपळवाडी 3, सुरवडी 4, खामगाव 1, निंबळक 1, भुजबळमळा 1, निंभोरे 1, पिंप्रद 1,
खटाव तालुक्यातील खटाव 1, निढळ 3, सुर्याचीवाडी 1, मायणी 1, डिस्कळ 1.
माण  तालुक्यातील  म्हसवड 6, दहिवडी 1, ढाकणी 1, दिडवाघवाडी 1.
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 1, वाठार स्टेशन 1, पिंपरी 1.
जावली तालुक्यातील जावळवाडी 1.
खंडाळा तालुक्यातील  लोणंद 3.
पाटण तालुक्यातील निसरे 1.
महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 1,भिलार 1, अहिरे वानवली 3.
 इतर वाठार 2, शिंदे वस्ती 1.
इतर जिल्ह्यातील पलुस 1.
* 4 बाधितांचा मृत्यु*
जिल्ह्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्यांमध्ये कुडाळ, ता. जावली येथील 95 वर्षीय पुरुष, कानकत्रे ता. खटाव येथील 85 वर्षीय पुरुष, गोटेवाडी ता. कराड येथील 63 वर्षीय पुरुष, म्हसवड ता. माण येथील 68 वर्षीय पुरुष अशा एकूण अशा एकूण 4  जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

एकूण नमुने -259114
एकूण बाधित -52950  
घरी सोडण्यात आलेले -49809  
मृत्यू -1748
उपचारार्थ रुग्ण-1393.

दिनांक.०७/१२/२०२०. जिल्ह्यातील 116 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 3 बाधितांचा मृत्यु...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
जिल्ह्यातील 116 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 3 बाधितांचा मृत्यु

  सातारा दि.7 (जिमाका): जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 116 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर  3 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 1,  शनिवार पेठ 1, करंजे पेठ 3, गडकर आळी 1, दौलतनगर 1, तामजाईनगर 1,
शाहूनगर 1,  शिवथर 1,  शाहुपुरी 1, अंबदरे 1, परळी 1, नागठाणे 4, चिंचणेर वंदन 6, पाडळी 1, साबळेवाडी 1, सांभरवाडी 1, मोहितेमळा 1, माडवी 1, हमदाबाज 3.
फलटण तालुक्यातील लक्ष्मीनगर 1, रविवार पेठ 1, ब्राम्हण गल्ली कसबा पेठ 1,  तरडगाव 1, तडवळे काळज 1,  पिंपळवाडी 2, साखरवाडी 1, सुरवडी 1, मुरुम 1, विढणी 1, शेरेचीवाडी 1.
खटाव तालुक्यातील खटाव 7,    पळशी 1,  राजाचे कुर्ले 11, त्रिमली 1, जायगाव 1, गिरीजाशंकरवाडी 1, तडवळे 1, पांढरवाडी 3, पुसेगाव 1.
माण  तालुक्यातील  देवापूर 1, म्हसवड 5, गोंदवले बु 1, वलाई 1.
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 3,  सातारा रोड 1, किन्हई 2.
जावली तालुक्यातील सोनगाव 1, जावळवाडी 6, सावली 1, टेटली 1.
वाई तालुक्यातील गणपती आळी 1, सिध्दनाथवाडी 1.
खंडाळा तालुक्यातील  खंडाळा 2, लोणंद 3, म्हावशी 5, अहिरे 1.
महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 4.
 इतर 1, पाडळी 2.
इतर जिल्ह्यातील पिंपरे (ता. पुरंदर), इस्मालपूर सांगली).
* 3 बाधितांचा मृत्यु*
जिल्ह्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्यांमध्ये गोळेश्वर ता. कराड येथील 58 वर्षीय पुरुष, सोनवडी ता. फलटण येथील 78 वर्षीय पुरुष, शिवथर ता. सातारा येथील 80 वर्षीय पुरुष अशा एकूण 3  जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
एकूण नमुने -257138
एकूण बाधित -52063  
घरी सोडण्यात आलेले -49579  
मृत्यू -1744
उपचारार्थ रुग्ण-740.

Saturday, December 5, 2020

दिनांक.०५/१२/२०२०. जिल्ह्यातील 115 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

 *जिल्ह्यातील 115 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 6 बाधितांचा मृत्यु*

  सातारा दि.5 (जिमाका): जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 115 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर  6 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये 

*सातारा तालुक्यातील*  सातारा 1, शहरातील केसरकर पेठ 2, माची पेठ 1, सातारा रोड 3, लिंब 1, सदरबझार 2,  सेंट पॉल स्कूल 1,पिरवाडी 1, आरळे 1, गोजेगाव 3, शाहूनगर 1, पिंपळवाडी 2, रामाचा गोट 1, नेले 1, शिवथर 1, जांब बु 1, कोडोली 1, वनवासवाडी 1, किडगाव 1, चिंचणेर वंदन 1, जोतिबाचीवाडी 1, निनाम पाडळी 1, देगाव 1, करंडी 1, वेणेगाव 1,

 

*कराड तालुक्यातील*  कराड शहरातील कोष्टी गल्ली 1, शनिवार पेठ 2, मानेगाव 1, शेवाळेवाडी 1,

 

*पाटण तालुक्यातील*  ब्राम्हणपूरी पाटण 1, चाफळ 1, मराठवाडी 1,

 

*फलटण तालुक्यातील* फलटण 5, फलटण शहरातील रविवार पेठ 1,   साठे 1, वाठार निंबाळकर 1, जावळी 1, होळ 3,  रावडी 1 खामगाव 1 सुरवडी 1,  संगवी 1, साखरवाडी 1, पिंप्रद 1, जाधववाडी 1,

 

*खटाव तालुक्यातील*   भूरकवाडी 1, खटाव 3, वर्धनखेड 1, कुरोली 2, विखळे 2, औंध 1, तरसवाडी 2, निमसोड 1,भाकरवाडी 1,वडूज 1, दातेवाडी 1, शिंगणवाडी 1,

 

*माण  तालुक्यातील*  नरवणे 1, गोंदावले 1, गोंदावले बु 1, दहिवडी 1, पिंगळी खुर्द 2, पळशी 2, कुळकजाई 1, दिवड 1, म्हसवड 3,बांगरवाडी 2,  

 

*कोरेगाव तालुक्यातील*   कोरेगाव 2, पिंपोडे बु. 1, एकसळ 1, वेलंग 1,

 

*जावली तालुक्यातील*  बहुले 1, सर्जापूर 1, रुईघर 1,

 

*वाई तालुक्यातील*  वाई शहरातील रविवार पेठ 1, सुरुर 1, सह्याद्रीनगर 1, गरवारे कॉलनी एमआयडीसी 1, वहागाव 1,

 

*खंडाळा तालुक्यातील*  म्हावशी 1, पिसाळवाडी 1, संभाजी चौक खंडाळा 1, भादे 1, शिरवळ 1,

 

*महाबळेश्वर तालुक्यातील* बेल एअर हॉस्पीटल पाचगणी 1, महाबळेश्वर 1,

 

*6 बाधितांचा मृत्यु*

 क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयात कोरेगाव येथील 80 वर्षीय पुरुष, विविध खाजगी हॉस्पीटल मध्ये पुसेगाव ता. खटाव येथील 71 वर्षीय पुरुष, कोळेवाडी ता. कराड येथील 60 वर्षीय महिला, रेठरे बुद्रुक ता. कराड येथील 65 वर्षीय पुरुष, तसेच उशीरा कळविलेले पिंपरी ता. खटाव येथील 71 वर्षीय पुरुष, गोंदावले ता. माण येथील 70 वर्षीय पुरुष अशा एकूण 6 जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

 

*एकूण नमुने -254476*

*एकूण बाधित -51774*  

*घरी सोडण्यात आलेले -49334*  

*मृत्यू -1732* 

*उपचारार्थ रुग्ण-708* 

सातारा नगरपरिषद निवडणूक अपडेट्स...

                 रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ * सातारा नगरपरिषद निवडणूक अपडेट्स * * विजयी उमेदवा...