https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
$ *रॉयल सातारा न्युज* $
~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
## ‘रिओ’ मुळे जलद गतीने तपास##
सातारा गुन्हे श्वान पथकातील ‘रिओ’ पोहचला संशयिताच्या घरापर्यंत
सातारा: सातारा गुन्हे श्वान पथकातील ‘रिओ’ची उत्कृष्ट कामगिरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात मोलाची ठरली आहे. रहिमतपूर येथील एका पतसंस्थेत अज्ञात चोरट्याने रोख रक्कम लांबवत तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेच्या तपासकामी सातारा गुन्हे श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. या पथकातील ‘रिओ’ ने थेट गुन्हेगाराच्या घरापर्यंत पोलिसांना पोहचविले आणि हा गुन्हा जलद गतीने उघडकीस आणण्यात मोलाची कामगिरी बजावली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, रहिमतपूर पोलीस ठाणे हद्दीत साप (ता.कोरेगाव) येथील छत्रपती संभाजी महाराज पतसंस्थेत दि.19 ऑक्टोबर रोजी 01.15 वाजण्याच्या सुमारास चोरीची घटना घडली होती. या चोरीदरम्यान अज्ञात चोरट्याने टेबल ड्रॉवरमधील रक्कम रुपये 5500/- व इतर कागदपत्रांवर डल्ला मारत पतसंस्थेची तिजोरी फोडण्याचा प्रयत्नही केला होता. या चोरीची माहिती रहिमतपूर पोलिस ठाण्यास देण्यात आल्यानंतर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री:बल्लाळ यांनी पोलीस नियंत्रण कक्षास तात्काळ माहिती देवुन श्वान पथकास पाचारण केले.
सदरची माहिती पोलीस नियंत्रण कक्षामार्फत श्यान पथकास प्राप्त होताच. तेथील पो.हवा. जी.डी.मोरे, पो.कॉ. व्ही.एस.जाधव, चालक पो.कॉ. व्ही.एस.निकम हे श्वानासह घटनास्थळी पोहोचले.
सदर पथकाने श्वानासह पाहणी केली असता. घटनास्थळी संशयीत आरोपीची एक गोधडी मिळून आल्याने सदर गोधडीचा वास श्वान रिओ यास दिला. श्वानाने पतसंस्थेच्या समोरील डांबरी रस्त्याने दक्षिणेस 25 ते 30 मिटर अंतरावर जावुन डांबरी रस्त्यालगत डाव्या बाजुस नाल्यालगत एका झुडपात टाकलेली कटावणी शोधुन काढली. पुन्हा एकदा गोधडीचा वास दिला असता पुढे 80 ते 100 मिटर अंतरावरील साप गावातील एस.टी.स्टॅन्ड चौकापासून पुढे उजव्या बाजूस पश्चिमेस साप ते रहिमतपूर रोड वरील महावीर मारुती कांबळे यांचे घराशेजारी रस्त्याने दक्षिणेस वळुन 20 ते 25 मिटर अंतरावर जावुन एका बंद घराचे दरवाज्या जवळ जावुन थांबला. पुन्हा एकदा श्वानाला गोधडीचा वास दिला असता श्वान बंद घराच्या दरवाज्या जवळच थांबला.
त्यानंतर रहिमतपूर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी तपासाअंती सदरचे घर सचिन जनार्धन वाघमारे यांचे असल्याचे समजले. श्वानाने संशयित गुन्हेगाराच्या घरापर्यंत माग काढुन तपासात मार्गदर्शन करुन गुन्हा उघडकीेस आणणेकामी मोलाची कामगिरी बजावली आहे. सदर गुन्हा उघडकीस आणणेकामी श्वान रिओ व त्याचे हस्तक पोहवा जी.डी.मोरे, पो.कॉ.व्ही.एस.जाधव, चालक पो.कॉ.व्ही.एस:निकम यांनी घटनास्थळी पोहचून उत्कृष्ट कामगिरी केली.
No comments:
Post a Comment