Tuesday, October 27, 2020

दिनांक.27/10/2020. 525 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 409 जणांचे नमुने पाठविले तपासणीला...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

*525 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 409 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*

सातारा दि. 27 (जिमाका):  जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 525 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 409 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

409 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 22, कराड येथील 14, फलटण येथील 20, कोरेगाव येथील 35, वाई येथील 25, खंडाळा येथील 41, रायगाव येथील 50, पानमळेवाडी येथील 29, महाबळेश्वर येथील 18, दहिवडी 16, खावली 47, म्हसवड 20 व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथील 66 असे एकूण 409 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

घेतलेले एकूण नमुने – 181990

एकूण बाधित -- 45560

घरी सोडण्यात आलेले -40217

मृत्यू -- 1509

उपचारार्थ रुग्ण -- 3834.

No comments:

Post a Comment

सातारा नगरपरिषद निवडणूक अपडेट्स...

                 रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ * सातारा नगरपरिषद निवडणूक अपडेट्स * * विजयी उमेदवा...