Friday, October 9, 2020

दिनांक. 09/10/2020. *557 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 475 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

*557 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 475 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*

 

            सातारा दि. 9 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 557 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 475 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

*475 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*

            स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 27, कराड 15, उपजिल्हा रुग्णालय फलटण 27, कोरेगाव 37, वाई 30, खंडाळा 69, रायगांव 37, पानमळेवाडी 39, मायणी 9, महाबळेश्वर 12, दहिवडी 33, खावली 14, तळमावले 33, म्हसवड 19,  पिंपोडा 8 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड 66 असे एकूण 475 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

घेतलेले एकूण नमुने -- 158771

एकूण बाधित -- 40981

घरी सोडण्यात आलेले --- 32752

मृत्यू -- 1332

उपचारार्थ रुग्ण -- 6897.

No comments:

Post a Comment

सातारा नगरपरिषद निवडणूक अपडेट्स...

                 रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ * सातारा नगरपरिषद निवडणूक अपडेट्स * * विजयी उमेदवा...