Monday, September 28, 2020

दिनांक. 28/09/2020.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) योजनेसाठी  अर्ज करण्याचे आवाहन

 

सातारा दि.28 (जिमाका):   बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्टप्रकल्पांतर्गत समुदाय आधारीत संस्था आणि संस्थात्मक खरेदीदार यांचेकडून अर्ज मागविणेत येत आहे हे अर्ज   शेतमालशेळ्या आणि परसबागेतील कुक्कुटपालन यांच्या मुल्यसाखळी विकासाच्या उपप्रकल्पांसाठी आहेतउत्पादक भागीदारी उपप्रकल्प आणि बाजार संपर्क वाढ उपप्रकल्पासाठी   अर्ज मागविणेत येत आहेत. तरी इच्छुकांनी 15 डिसेंबरपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी व प्रकल्प संचालक आत्मा या कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

 

उत्पादक भागीदारी उपप्रकल्प  (Productive Partnership-PP):-

               उत्पादक भागीदारी उपप्रकल्पामध्ये दोन मुख्य भागीदारांचा समावेश आहे. यात प्रामुख्याने समुदाय आधारित संस्था किंवा त्यांचा समूहएक किंवा अधिक खरेदीदार यांचा समावेश आहे.  वरील दोन्ही भागधारक हे व्यवसाय प्रस्तावाद्वारे किंवा व्यवसाय आराखडयाच्या माध्यमातून एकमेकांशी जोडले जाणार आहेत. व्यवसाय आराखडयामध्ये समुदाय आधारीत संस्थांना नवीन संस्थात्मक खरेदीदारासमवेत संबंध दृढ करण्यासाठी, पर्यायी बाजारपेठेत प्रवेश मिळण्यासाठी आवश्यक घटकांचापायाभूत सुविधांचा समावेश करण्यात येईल. याव्दारे उत्पादक व खरेदीदाराध्ये दीर्घकाळ टिकाऊशाश्वत आणि व्यावसायीक संबंध विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे. याव्दारे सहभागी भागीदारांना स्पर्धात्मक किंमत/दरउत्पादकतागुणवत्ता व विक्रीचे प्रमाण सुधारण्यास मदत होईल. उपप्रकल्पाच्या व्यवसाय आराखड्याची अंमलबजावणी करताना उत्पादक गुंतवणूक (काढणीपश्चातप्रक्रिया आणि विपणन बाबीसाठी मुलभूत सुविधा)तांत्रिक सहाय्य (क्षमता बांधणी आणि मूल्यसाखळी विकास शाळा-व्हीसीडीएस) या घटकांना अर्थसहाय्य मिळणार आहे.

ब ) बाजार संपर्कवाढ उपप्रकल्प (MAP):-

              या प्रकारच्या उपप्रकल्पात समुदाय आधारीत संस्था निश्चित असेल तथापी खरेदीदार निश्चित केलेला नसेलपरंतु समुदाय आधारीत संस्थेने उत्पादीत केलेला शेतमाल कोणत्या नवीन बाजारात विक्री करावयचा तो बाजार निश्चित केलेला असेल. समुदाय आधारीत संस्था नवीन बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी प्राधान्याने महाराष्ट्रा बाहेर किंवा परदेशात निर्यातीसाठी बाजाराच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी बाजार संपर्कवाढ उपप्रकल्प विकसित करू शकतात.

 

अर्ज कोणी व कसा करावा -

                अर्ज सादर करण्यासाठी पात्र समुदाय आधारीत संस्था मध्ये आत्मा नोंदणीकृत शेतकरी गटशेतकरी उत्पादक कंपनी आणि त्यांचे फेडरेशन्समहाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातर्गत प्रभाग संघमहिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे स्थापीत लोकसंचलीत साधन केंद्र यांचा समावेश आहेतसेच अर्ज सादर करण्यासाठी पात्र खरेदीदारांमध्ये कॉपोरेट्स / प्रक्रियादार / निर्यातदार / लघु-मध्यम उद्योजक / स्टार्टअप्स / कोणताही खरेदीदार इचा समावेश आहेप्राप्त होणाऱ्या पैकी पात्र स्पर्धात्मक व उत्कृष्ट प्रकल्पाचे 60% पर्यंत अनुदान उपलब्ध होईलअर्जं सादर करण्यासाठी पात्रतेचे निकषअर्जाचा नमुना इhttp://www.smart-mh.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहेइच्छुकांनी दिनांक १५ डिसेंबर 2020 सायंकाळी 5.00 पर्यंत स्मार्टच्या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करावेत. असे आवाहन प्रकल्प संचालक आत्मा व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा यांचे मार्फत करणेत येत आहे. सविस्तर महितीसाठी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...