Friday, July 3, 2020

मारुल ह. ता. पाटण येथील 1 कोरोनाबाधित तर 1 जणांचा मृत्यू;काल मृत्यू पावलेल्या रुग्णाचा अहवाल कोरोनाबाधित.

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
             $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

सातारा दि. 3 (जिमाका) : कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथे उपचार घेत असलेल्या मारुल ह. ता. पाटण येथील 35 वर्षीय पुरुषाचा अहवाल कोरोनाबाधित आला आहे.  तसेच क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयात दाखल असणाऱ्या शिरवळ ता. खंडाळा येथील 83 वर्षीय कोरोनाबाधित वृध्दाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

                तसेच काल दि. 2 जुलै रोजी क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील सातारा तालुक्यातील लिंब येथील 56 वर्षीय पुरुषाचा सारीने मृत्यू झाला होता. त्याच्या घशातील नमुना कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. याचा अहवालही कोरोनाबाधित आला आहे, अशी माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.

मौजे दत्तनगर कोडोली ग्रामपंचायत क्षेत्रात

सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र आदेश जारी

सातारा दि. 3 (जिमाका): सातारा तालुक्यातील मौजे दत्तनगर कोडोली  क्षेत्रात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने. या गावच्या क्षेत्रात  पुढील आदेशाप्रमाणे उपविभागीय दंडाधिकारी तथा इन्सिडंट कमांडर, सातारा उपविभाग, सातारा मिनाज मुल्ला यांनी सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहेत.

सातारा तालुक्यातील विविध सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्राची सीमारेषा खालीलप्रमाणे

त्यानुसार बाधित क्षेत्रातील आपत्कालीन व जीवनावश्यक वस्तूंच्या सेवा व पुरवठा सुरळीत राहण्याकरीता अन्य व्यक्तींना संबंधित प्रतिबंधित क्षेत्रामध्ये प्रवेश करण्यास व परिसरातून बाहेर पडण्यास बंदी करण्यात येत आहे. प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केलेल्या क्षेत्रामध्ये अत्यावश्यक सेवा व वस्तू पुरवठा करण्याकरीताची वेळ ही जिल्हा दंडाधिकारी यांनी यापूर्वीच दिलेल्या आदेशाप्रमाणे राहील.  या परिसरात  जीवनावश्यक वस्तुंचा, अत्यावश्यक सेवा पुरविणारे कार्यालय व  व्यक्तींना, व त्यांच्या वाहनांना यामधून वगळण्यात येत आहे. जीवनावश्यक वस्तु व सेवा (दुध व दुग्धोत्पादन, किराणा माल, फळे व भाजीपाला इ.) यांच्या वाहतूकीसाठी कोणतेही निर्बंध नसून त्यासाठी वाहतूक पास संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे उपलब्ध होतील. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये दुध, भाजीपाला, औषधे, किराणामाल इ. वस्तू घरपोच करण्यात याव्यात. त्याचे नियोजन गावामध्ये संबंधित गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांनी आदेशाप्रमाणे स्वतंत्रपणे करावे व त्यावर संबंधित तहसीलदार यांनी योग्य ते नियंत्रण करावे. तसेच प्रतिबंधित क्षेत्रामधील सर्व नागरिकांनी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा.

No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...