$ *रॉयल सातारा न्युज* $
~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏
उद्यापासून सातारा जिल्ह्यात कडक लाॅकडाऊन जाहीर ः पालकमंत्री बाळासाहेब पाटील...
लाॅडाऊनची नियमावली सायंकाळी जाहीर होणार
सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित रूग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मागील २४ तासात जिल्ह्यात कोरोनाचे नवे 2 हजार 502 रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात पाॅझिटीव्हचा दर वाढलेला असताना त्याचबरोबर मृत्यदरही वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेवरील वाढणारा ताण कमी करण्यासाठी सातारा येथे जिल्ह्यातील पदाधिकारी व अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीत उद्यापासून (दि.4 मे) जिल्ह्यात कडक लाॅकडाऊन लावण्यात येणार असल्याचा निर्णय झाला आहे. याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी माहिती दिली आहे.
सातारा येथे शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि जिल्हाप्रशासनाची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीस पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री व आ. पृथ्वीराज चव्हाण, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आ. शशिकांत शिंदे, प्रभारी जिल्हादंडाधिकारी रामचंद्र शिंदे, पोलिस अधीक्षक अजयकुमार बंन्सल, अंचल दलाल यांच्यासह अधिकारी वर्ग उपस्थित आहे.
लाॅडाऊनची नियमावली सायंकाळी जाहीर होणार....
No comments:
Post a Comment