Sunday, May 9, 2021

दिनांक. ०९/०५/२०२१. 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी कोविड लसीकरण सत्राचे आयोजन...

             $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏

18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी कोविड लसीकरण सत्राचे आयोजन

सातारा दि. 9 (जिमाका): 10 मे 2021 पासून सातारा जिल्ह्यातील  खालील ठिकाणी 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी कोविड लसीकरण सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. सदर सत्रे ही फक्त 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठीच असून ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करुन अपॉइनमेन्ट घेणे बंधनकारक आहे. नोंदणीसाठी उद्या दि. 10 मे 2021 पासून रोजी सकाळी 11 वा.www.cowin.gov.in किंवा https://selfregistration.cowin.gov.in या संकेत स्थळावर आपली अपॉइनमेन्ट निश्चित करता येईल. याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.

         सातारा जिल्ह्यातील  खालील प्रमाणे कोविड लसीकरण सत्राची ठिकाणे : कराड येथील उपजिल्हा रुग्णालय, कोरेगांव येथील ग्रामीण रुग्णालय,खटाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र,पाटण येथील ग्रामीण रुग्णालय,फलटण येथील उपजिल्हा रुग्णालय,महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालय, माण येथील ग्रामीण रुग्णालय,दहिवडी. मेढा येथील ग्रामीण रुग्णालय,वाई येथील ग्रामीण रुग्णालय,खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र,शिरवळ. व सातारा येथील जिल्हा रुग्णालय,सातारा.असे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद सातारा यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...