$ *रॉयल सातारा न्युज* $
~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏
उपविभागीय दंडाधिकारी ( प्रांत ) यांचा दणका : 06 वर्षानंतरची पहीलीच कारवाई
सातारा :- शाहुपुरी पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार नामे दत्ता उत्तम घाडगे वय ३० वर्ष रा.शिवशंभो कॉलनी , दौलतनगर करंजे सातारा हा वारंवार गुन्हे करण्यास सरसावलेला असल्याने व त्याचा उपद्रव वाढतच असल्याने त्याला सातारा जिल्ह्यातुन तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव शाहुपुरी पोलीसांनी मा.पोलीस अधीक्षक सो सातारा यांचे मार्फतीने मा.उपविभागीय दंडाधिकारी सो ( प्रांत ) सातारा विभाग यांचेकडे पाठविणेत आला होता . सदर प्रस्तावाची सुनावणी पुर्ण होवुन श्री मिनाज मुल्ला , उपविभागीय दंडाधिकारी सातारा यांनी दत्ता उत्तम घाडगे वय ३० वर्ष रा.शिवशंभो कॉलनी , दौलतनगर करंजे सातारा यास सातारा जिल्हयातुन दोन वर्षाकरीता तडीपार करण्याचे आदेश निर्गमीत केले आहेत . सदरचे आदेश दि .०४ फेब्रुवारी २०२१ रोजी काढणेत आले आहेत परंतु सदरचा आरोपी खंडणीचे गुन्हयात सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहात असल्याने व सदरचा आरोपी नुकताच खंडणीचे गुन्हयातुन दि .२ ९ / ०४ / २०२१ रोजी जामीनावर बाहेर येताच शाहपुरी पोलीसांनी त्यास सदर तडीपारी आदेशाची बजावणी केली आहे . रेकॉर्डवरील गुन्हेगार दत्ता उत्तम घाडगे याचेविरुद्ध शाहुपुरी पोलीस ठाणेस मारहाण करुन जबरी चोरी , खंडणी , अपहरण , घरफोडी , धारदार शस्त्राने गंभीर दुखापत करणे , मारहाण करुन शिवीगाळ , दमदाटी , धमकी देवुन दहशत माजविणे , विनयभंग करणे , दारु पिऊन सार्वजनिक शांततेचा भंग करणे अशा प्रकारचे ११ दखलपात्र गंभीर गुन्हे दाखल आहेत . पोलीसांनी त्याचेवर प्रतिबंधात्मक कारवाई करुनही व वारंवार सुधारणेची संधी देवुनही त्याचे वर्तनात कोणताही बदल होत नव्हता व तो वारंवार अधिक गुन्हे करत होता . त्याचे गुन्हेगारी प्रवृत्तीवरुन व त्याचे गुन्हेगारी वर्तनावरुन तसेच त्याचे उपस्थिती व कृतीमुळे लोकांचे जिवीतास व मालमत्तेस धोका निर्माण झाला होता . तो समाजास घातक होवुन त्याचेमुळे सामाजिक शांततेस बाधा निर्माण झाली होती . त्यामुळे शाहुपुरी पोलीस ठाणेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक श्री किशोर धुमाळ यांनी त्याचेविरुद्ध तडीपारीचा प्रस्ताव सादर केला होता . सदर प्रकरणाचे सुनावणी दरम्यान पोलीस निरीक्षक श्री संजय पतंगे , स.पो.नि. विशाल वायकर, स.पो.नि. संदिप शितोळे व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी पाठपुरावा करुन सदर इसमास सातारा जिल्हयातुन दोन वर्षाकरीता तडीपार करण्यात यश प्राप्त केले आहे . दत्ता उत्तम घाडगे हा सातारा शहरातील कुख्यात गुंड असुन त्याची भुविकास चौक , दौलतनगर , करंजे भागात मोठी दहशत होती . सदर गुंडाकडुन हॉटेल , हातगाडीधारक , फळवाले , इतर व्यवसायिक व नागरिकांना दहशत दाखवुन त्रास दिला जात होता . त्याबाबत वारंवार तक्रारी प्राप्त होत असल्याने त्याचेविरुद्ध सदरची कारवाई करणेत आली आहे . सदर कारवाईचे नमुद परिसरातील व्यवसायिक व नागरिकांनी स्वागत केले असुन शाहुपुरी पोलीसांचे व मा.उपविभागीय दंडाधिकारी यांचे आभार मानले आहेत . सदरचा इसम तडीपार कालावधीत सातारा जिल्हयात मिळुन आलेस त्याबाबत पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहान पोलीसांकडुन करणेत आले आहे .
.
No comments:
Post a Comment