Tuesday, April 20, 2021

दिनांक २०.०४/२०२१. किराणा माल, मेडिकल दुकान व खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी जिल्हादंडाधिकारी यांचे सुधारित आदेश जारी/महाविर जयंती साधेपणाने साजरा करा जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश/हनुमान जयंती साधेपणाने साजरा करा जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश/श्रीरामनवमी उत्सव साधेपणाने साजरा करा जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश...

            $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏
किराणा माल, मेडिकल दुकान व खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी
जिल्हादंडाधिकारी यांचे सुधारित आदेश जारी

सातारा दि. 20 (जिमाका) : सातारा जिल्हयात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखणेच्या अनुषंगाने दि. 30 एप्रिल पर्यंत कलम 144 लागु केला आहे. जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार प्राप्त अधिकारान्वये, खालीलप्रमाणे सुधारित आदेश जारी केले आहेत.
  सर्व किराणा माल, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई इत्यादी सर्व प्रकारची खाद्य पदार्थ दुकाने (कोंबडी, मटण, पोल्ट्री, मासे आणि अंडी यांसह), रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांची दुकाने/स्टॉल, कृषी अवजारे व शेतातील उत्पादनांशी संबंधित दुकाने, पाळीव प्राण्यांच्या खादयपदार्थांची दुकाने, पावसाळ्याच्या हंगामात व्यक्तींसाठी तसेच संस्थांसाठी संबंधित असणार्या  साहित्याच्या उत्पादनाशी निगडीत दुकाने फक्त सकाळी 7.00 ते सकाळी 11.00 या कालावधीतच चालू राहतील.  तथापि, सदर दुकानांची घरपोच सेवा सकाळी 7.00 ते सायंकाळी 5.00 या कालावधीतच चालू ठेवणेस परवानगी राहील.
  मेडिकल दुकाने ही सकाळी 7.00 ते रात्री 08.00 पर्यंत चालू राहतील व हॉस्पीटल मधील मेडिकल दुकाने पुर्णवेळ चालू राहतील.
  वृत्तपत्रे/मासिके/नियतकालिके याची घरपोच सेवा सकाळी 5.00 ते सकाळी 11.00 व  स्टॉल वरील विक्री सकाळी 7.00 ते 11.00 या कालावधीत चालू राहील.
या आदेशांची अंमलबजावणी दिनांक 20 एप्रिल, 2021 चे रात्री 8.00 वाजल्यापासून ते दिनांक 01 मे, 2021 चे सकाळी 07.00 वाजेपर्यत लागू राहील
या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधीतांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60, व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय / कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही आदेशात नमुद केले आहे.
0000
महाविर जयंती साधेपणाने साजरा करा
जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश

सातारा दि. 20(जिमाका) : सध्या कोविड-19 च्या दुस-या लाटेमुळे उदभवलेल्या अतिसंसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता सातारा जिल्हयात महावीर जयंती हा सण अत्यंत साधेपणाने व शासनाने वेळोवेळी दिलेल्या नियमांचे तसेच सामाजिक अंतराचे पालन करुन साजरा करणे आवश्यक  आहे.
  जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार प्राप्त असलेल्या अधिकारान्वये  दिनांक 27/04/2021 रोजीचे 0.00 वाजले पासून ते 24.00 वाजेपर्यंत पुढीलप्रमाणे आदेश जारी करीत आहे.
  महावीर जयंती लोक मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊन साजरी करतात. परंतु यावर्षी कोविड 19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोकांनी एकत्र न येता साधेपणाने आपआपल्या घरी महावीर जयंती सण/उत्सव साजरा करावा. कोविड- 19 चा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली असल्याने मंदिरात पूजा अर्चा व दर्शनासाठी जाता येणार नाही. मंदिरामधील व्यवस्थापक/विश्वस्त यांनी शक्य असल्यास दर्शनाची ऑनलाईन सुविधा, केवल नेटवर्क, वेव साइट व फेसबुक इत्यादी द्वारे उपलब्ध करुन द्यावी. महावीर जयंती सण/उत्सवानिमित्त कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. कोविड -19 च्या विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोरपणे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या आदेशानंतर व प्रत्यक्ष महावीर जयंती सण/उत्सव सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत शासनस्तरावरुन व या कार्यालयाकडून तसेच स्थानिक प्रशासनाकडून काही नवीन सूचना प्रसिध्द झाल्यास त्याचे देखील अनुपालन करणे बंधनकारक राहील.
  या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधीतांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास त्यांचे विरुध्द यथास्थिती आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51, भारतीय साथरोग अधिनियम 1897 व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार दंडनीय / कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही आदेशात नमुद केले आहे.
0000
हनुमान जयंती साधेपणाने साजरा करा
जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश

सातारा दि. 20 (जिमाका) :  सातारा जिल्हयात हनुमान जयंती हा सण अत्यंत साधेपणाने व शासनाने वेळोवेळी दिलेल्या नियमांचे तसेच सामाजिक अंतराचे पालन करुन साजरा करणे आवश्यक  आहे.
 जिल्हादंडाधिकारी मी शेखर सिंह यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार प्राप्त असलेल्या अधिकारान्वये,   दिनांक 27/04/2021 रोजीचे 0.00 वाजले पासून ते 24.00 वाजेपर्यंत पुढीलप्रमाणे आदेश जारी करीत आहे.
  हनुमान जयंती लोक मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊन साजरी करतात. परंतु यावर्षी कोविड 19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोकांनी एकत्र न येता साधेपणाने आपआपल्या घरी हनुमान जयंती सण/उत्सव साजरा करावा. दरवर्षी हनुमान जयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु कोविड- 19 चा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली असल्याने मंदिरात पूजा अर्चा व दर्शनासाठी जाता येणार नाही. तसेच यावर्षी मंदिरात भजन, किर्तन, पठण इत्यादींचे किंवा कोणत्याही प्रकारे धार्मिक, सांस्कृतिक अथवा सामाजिक कार्यक्रमांचे सार्वजनिक आयोजन करण्यात येऊ नये. मंदिरामधील व्यवस्थापक/विश्वस्त यांनी शक्य असल्यास दर्शनाची ऑनलाईन सुविधा, केवल नेटवर्क, वेव साइट व फेसबुक इत्यादी द्वारे उपलब्ध करुन द्यावी. हनुमान जयंती सण/उत्सवानिमित्त कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. कोविड -19 च्या विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोरपणे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या आदेशानंतर व प्रत्यक्ष हनुमान जयंती सण/उत्सव सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत शासनस्तरावरुन व या कार्यालयाकडून तसेच स्थानिक प्रशासनाकडून काही नवीन सूचना प्रसिध्द झाल्यास त्याचे देखील अनुपालन करणे बंधनकारक राहील.
या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधीतांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास त्यांचे विरुध्द यथास्थिती आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51, भारतीय साथरोग अधिनियम 1897 व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार दंडनीय / कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही आदेशात नमुद केले आहे.
  0000
श्रीरामनवमी उत्सव साधेपणाने साजरा करा
जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश
सातारा दि. 20 (जिमाका) : दिनांक 21 एप्रिल 2021 रोजी श्रीरामनवमी उत्सव साजरा करण्यांत येणार आहे. सध्या कोविड-19 च्या दुस-या लाटेमुळे उदभवलेल्या अतिसंसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता सातारा जिल्हयात श्रीरामनवमी हा सण अत्यंत साधेपणाने व शासनाने वेळोवेळी दिलेल्या नियमांचे तसेच सामाजिक अंतराचे पालन करुन साजरा करणे आवश्यक  आहे.
 जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार, प्राप्त असलेल्या अधिकारान्वये  दिनांक 21/04/2021 रोजीचे 0.00 वाजले पासून ते 24.00 वाजेपर्यंत पुढीलप्रमाणे आदेश जारी करीत आहे.
  श्रीरामनवमी लोक मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊन साजरी करतात. परंतु यावर्षी कोविड 19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोकांनी एकत्र न येता साधेपणाने आपआपल्या घरी श्रीरामनवमी सण/उत्सव साजरा करावा.  श्रीरामनवमी साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु कोविड- 19 चा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली असल्याने मंदिरात पूजा अर्चा व दर्शनासाठी जाता येणार नाही. तसेच यावर्षी मंदिरात भजन, किर्तन, पठण इत्यादींचे किंवा कोणत्याही प्रकारे धार्मिक, सांस्कृतिक अथवा सामाजिक कार्यक्रमांचे सार्वजनिक आयोजन करण्यात येऊ नये.  मंदिरामधील व्यवस्थापक/विश्वस्त यांनी शक्य असल्यास दर्शनाची ऑनलाईन सुविधा, केवल नेटवर्क, वेव साइट व फेसबुक इत्यादी द्वारे उपलब्ध करुन द्यावी.   श्रीरामनवमीच्या उत्सवानिमित्त कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. कोविड -19 च्या विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोरपणे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या आदेशानंतर व प्रत्यक्ष श्रीरामनवमी सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत शासनस्तरावरुन व या कार्यालयाकडून तसेच स्थानिक प्रशासनाकडून काही नवीन सूचना प्रसिध्द झाल्यास त्याचे देखील अनुपालन करणे बंधनकारक राहील.
या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधीतांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास त्यांचे विरुध्द यथास्थिती आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51, भारतीय साथरोग अधिनियम 1897 व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार दंडनीय / कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही आदेशात नमुद केले आहे.

No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...