Saturday, December 19, 2020

दिनांक. १९/१२/२०२०. स्त्री सहायक परिचारीका प्रसाविका (एएनएम) व सामान्य परिचारीका व प्रसाविका (जीएनएम) प्रशिक्षण २०२० साठी अर्ज करण्याचे आवाहन...

               $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏

स्त्री सहायक परिचारीका प्रसाविका (एएनएम) व सामान्य परिचारीका व प्रसाविका (जीएनएम) प्रशिक्षण २०२० साठी अर्ज करण्याचे आवाहन

सातारा दि.19 (जिमाका): आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान,आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई यांच्या अधिपत्याखालील राज्यातील जिल्हा रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय यांच्या अधिनस्थ असलेले परिचर्या प्रशिक्षण केंद्रामध्ये स्त्री सहायक परिचारीका प्रसाविका ( एएनएम २ वर्ष कालावधी) व सामान्य परिचारीका व प्रसाविका (जीएनएम ३ वर्ष कालावधी ) या प्रशिक्षणाकरीता दि.18 ते 28डिसेंबर 2020 या कालावधीमध्ये ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.हे अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरावयाची सुविधा https://maharecruitment.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

या प्रशिक्षणाची विस्तृत जाहिरात,वेळापत्रक व प्रवेश नियम पुस्तिका संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रवेश नियम पुस्तिकेमध्ये दिलेल्या सर्व सुचना काळजीपुर्वक वाचून अर्जदाराने अर्ज सादर करावेत.असे जिल्हा शल्यचिकित्सक,सातारा यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...