https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
$ *रॉयल सातारा न्युज* $
~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून जप्त ...
माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांनी शाहुपुरी पोलिस ठाण्याचे माननीय सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री विशाल वायकर व गुन्हे प्रकटीकरण शाखेस अवैद्य गुटखा माल विक्री करणाऱ्या इसमाचेवर कारवाई करणे बाबत सूचना देऊन मार्गदर्शन केले होते.
त्याचप्रमाणे दिनांक 20 नोव्हेंबर 2020
रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री विशाल वायकर यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की २७७ सोमवार पेठ सातारा
येथील घरामध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेला पानमसाला व सुगंधी तंबाखू असा गुटखा सदृश्य माल आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथकास बोलावून घेऊन त्यांना कारवाई बाबत मार्गदर्शन करून सूचना दिल्या. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री विशाल वायकर व त्यांचे गुन्हे पथकाने मिळालेली बातमी च्या ठिकाणी सायंकाळी 4.30 वाजता चे सुमारास छापा टाकून तपासणी केली असता सदर ठिकाणी महाराष्ट्र राज्य प्रतिबंध असलेला पानमसाला व सुगंधी तंबाखू असा १,३२,२५४/- रुपये किमतीचा गुटख्याचा माल मिळून आलेने सदरचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलेले आहे. सदरचा मुद्देमाल व संशयित इसम ताब्यात घेऊन पुढील कारवाईकामी अन्न व औषध प्रशासन विभाग,सातारा यांचे ताब्यात देण्यात आला आहे. सदर प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभाग, सातारा यांच्याकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. अशाप्रकारे शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला पानमसाला व सुगंधी तंबाखू असा गुटख्याचा मोठा साठा पकडून धडक कारवाई केली आहे.
सदरची कारवाई माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.विशाल वायकर श्री.संदीप शितोळे, पो.ना. लैलेश फडतरे, अमित माने, पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील कुंभार, ओमकार यादव, मोहन पवार, चालक मनोहर वाघमारे व अन्न व औषध प्रशासनाचे इम्रान हवालदार व अस्मिता गायकवाड यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment