*583 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 1269 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
सातारा दि. 16 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 583 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 1269 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
*1269 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 15,उपजिल्हा रुग्णालय कराड 41, उपजिल्हा रुग्णालय फलटण 53, कोरेगाव 67, वाई 115, खंडाळा 164, रायगांव 75, पानमळेवाडी 291, मायणी 79, महाबळेश्वर 95, पाटण 7, दहिवडी 45, तळमावले 41, व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड 181 असे एकूण 1269 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत,अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
घेतलेले एकूण नमुने – 59521
एकूण बाधित -- 26448
घरी सोडण्यात आलेले -- 17107
मृत्यू -- 752
उपचारार्थ रुग्ण -- 8589
No comments:
Post a Comment