सातारा दि. 17 ( जि. मा. का ) : आज आलेल्या रिपोर्टनुसार एन. सी. सी. एस. पुणे येथे तपासणी करण्यात आलेल्या 7 नागरिकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून यापैकी तीघांचा रिपोर्ट मृत्यू पश्चात पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
यामध्ये कोरेगाव तालुक्यातील चोरगेवाडी येथील 27 वर्षीय पुरुष.
रविवार पेठ सातारा येथील 14 वर्षाची मुलगी.
सातारा तालुक्यातील पिंपळवाडी येथील 56 वर्षीय महिला.
वाई तालुक्यातील सह्याद्री नगर येथील 9 वर्षाची बालीका.
पाटण तालुक्यातील
मूळ गोवारे येथील 14 जून रोजी मुंबई येथून आलेला 50 वर्षीय पुरुष गावच्या शाळेतील विलगीकरणात असताना 16 जुन रोजी अचानक मृत पावला होता,
हावळेवाडी ( बहुले ) येथे 14 जून रोजी 45 वर्षीय महिला मानखुर्द मुंबई येथून आली होती आणि घरातच विलगीकरणात मृत्यू पावली होती.
जावली तालुक्यातील शिंदेवाडी येथील 50 वर्षीय पुरुष, 12 जून रोजी मुंबईवरून आला होता 16 जून रोजी मृत्यू श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे हॉस्पिटल आणत असताना रस्त्यात मृत्यू झाला.
असे एकूण तीघांचा रिपोर्ट मृत्यू पश्चात पॉझिटीव्ह आला असल्याचे डॉ. गडीकर यांनी सांगितले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
सातारा नगरपरिषद निवडणूक अपडेट्स...
रॉयल सातारा न्युज* $ ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ * सातारा नगरपरिषद निवडणूक अपडेट्स * * विजयी उमेदवा...
-
रॉयल सातारा न्युज* $ ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ * सातारा नगरपरिषद निवडणूक अपडेट्स * * विजयी उमेदवा...
-
$ *रॉयल सातारा न्युज* $ ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏 कोरोनाच्या काळात थेट चित्रातून ' पॉझिटिव्ह ' ...
-
https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg $ *रॉयल सातारा न्युज* $ ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ ...
No comments:
Post a Comment