Thursday, June 11, 2020

कुरोशी येथील 55 वर्षीय पुरुषाचा मृत्यूबेल एअर हॉस्पिटलमध्ये झाला नाही...

 *कुरोशी येथील 55 वर्षीय पुरुषाचा मृत्यू

बेल एअर हॉस्पिटलमध्ये झाला नाही* 

सातारा दि. 11 ( जि. मा. का ) : काल संध्याकाळी जिल्हा माहिती कार्यालयाकडून दिलेल्या बातमीत "महाबळेश्वर तालुक्यातील खरोशी येथे मुंबईवरुन प्रवास करुन आलेल्या 55 वर्षीय पुरुषाचा बेल एअर हॉस्पिटल, पाचगणी येथे मृत्यू झाला आहे. या 55 वर्षीय पुरुषाचा नमुनाही तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे" असा मजकूर दिला होता. तथापी महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा पाटील यांच्याकडून आलेल्या माहितीनुसार सदर 55 वर्षीय पुरुष कुरोशी या गावचा असून मंगळवारी रात्री सपत्नीक मुंबईवरुन गावी आला होता. गावात त्याच्या भावाचे छोटे हॉटेल असून या ठिकाणी त्यांना विलगीकरणात ठेवले होते. पहाटे पत्नी झोपेत असताना सदर व्यक्तिने बाहेर जावून झाडाला गळपास घेवून आत्महत्या केल्याचे निर्दशनास आले. मृत्युनंतर महाबळेश्वर येथील कोरोना केअर सेंटरमध्ये नेवून त्याच्या स्त्रावाचे नमुने घेण्यात आले आहेत. त्यामुळे सदर व्यक्तिचा मृत्यू बेल एअर हॉस्पिटलमध्ये झाला नाही. असा खुलासा जिल्हा माहिती कार्यालयाकडून करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

सातारा नगरपरिषद निवडणूक अपडेट्स...

                 रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ * सातारा नगरपरिषद निवडणूक अपडेट्स * * विजयी उमेदवा...