Saturday, July 4, 2020

खा. उदयनराजे भोसले यांच्याकडुनजिल्हा रुग्णालयात पीपीई किट व इन्फ्रारेड थर्मामिटरचे वाटप.

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
             $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

खा. उदयनराजे भोसले यांच्याकडुन

जिल्हा रुग्णालयात पीपीई किट व इन्फ्रारेड थर्मामिटरचे वाटप

सातारा 4 (जिमाका) : क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात कोरोना विषाणू विरोधात अविरत लढा देणाऱ्या योद्ध्यांना खा. उदयनराजे भोसले यांनी पीपीई किट वाटप केले.

कोरोना विषाणूचा वैद्यकीय आधिकारी, नर्सेस, लॅब टेक्नीशियन, चतुर्थश्रेणी कर्मचारी, सुरक्षा रक्षक यांच्या कामाचे कौतुक करत अशा आधिकारी, कर्मचारी यांच्या आरोग्याची काळजी घेणे आद्य कर्तव्य असल्याचे  खा. उदयनराजे भोसले यांनी यावेळी सांगितले.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.आमोद गडीकर, अति.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर धुमाळ, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, डॉ. चंद्रशेखर घोरपडे, ॲड बनकर, सुनिल काटकर व रुग्णालयातील आधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

डॉ. सुधीर बक्षी प्रशासकीय अधिकारी यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. सुहास माने यांनी आभार मानले.

Friday, July 3, 2020

जिल्ह्यातील 56 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित तरदोन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु.

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
             $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

जिल्ह्यातील 56 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित तर

दोन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु.

सातारा दि. 4 (जि. मा. का) : काल रात्री उशीरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटर मध्ये येथे उपचार घेत असलेल्यामध्ये निकट सहवासित 51, प्रवास करुन आलेले 4, आय.एल.आय (श्वसनाचा सौम्य जंतू संसर्ग ) 1  असे एकूण  56 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आले असून यामध्ये 36 पुरुष व 20 महिलांचा समावेश आहे. तसेच खटाव  तालुक्यातील पडळ येथील 55 वर्षीय पुरुष व वाई तालुक्यातील ब्राम्हणशाही येथील 60 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

यामध्ये  महाबळेश्वर तालुक्यातील लाखवड येथील 28 वर्षीय महिला.

कराड तालुक्यातील  उंब्रज येथील 23 वर्षीय पुरुष, मुंढे येथील 41 वर्षीय पुरुष.

फलटण तालुक्यातील अलगुडेवाडी येथील 14 वर्षीय महिला, रविवार पेठ येथील 7,12,16,38,68,42,40,32,20 वर्षीय पुरुष व 14 वर्षीय दोन युवती व 25 वर्षीय महिला मलठण येथील 39 वर्षीय महिला.

खंडाळा तालुक्यातील पळशी रोड शिरवळ येथील 24 वर्षीय पुरुष, न्यू कॉलनी येथील 30 व 23 वर्षीय पुरुष, देशमुख आळी येथील 35 व 45 वर्षीय महिला, लोणंद मधील मऱ्याची  वाडी येथील 34 वर्षीय पुरुष.

सातारा तालुक्यातील जिहे येथील 49,36,20,8,6843,61,81,62 वर्षीय पुरुष व 42,57,4,30,19,3,10,32,70, 55 वर्षीय महिला, श्रीनाथ कॉलनी, फलटण रोड येथील 20 वर्षीय पुरुष. धावली येथील 17 वर्षीय पुरुष, पानमळेवाळी येथील 43 वर्षीय महिला.

 

माण तालुक्यातील कुळकजाई येथील 25 वर्षीय पुरुष, पाटण तालुक्यातील मलवडी येथील 24 वर्षीय पुरुष, मोरगीरी येथील 33 वर्षीय पुरुष, कासरुंड येथील 35 वर्षीय पुरुष, चोपडी येथील 16 व 24 वर्षीय महिला, बेलवडे येथील 36 वर्षीय पुरुष, सूर्यवंशीवाडी येथील 28 वर्षीय पुरुष, गोकूळ येथील 18 वर्षीय युवक, मारुल येथील 35 वर्षीय पुरुष.

वाई तालुक्यातील धर्मपूरी येथील 46 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

 

दोन बाधितांचा मृत्यु

 

        क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे काल खटाव  तालुक्यातील मुंबई वरून प्रवास करून आलेला  पडळ येथील 55 वर्षीय पुरुष व वाई तालुक्यातील ब्राम्हणशाही येथील 60 वर्षीय ( सारीची रुग्ण ) महिला या 2 कोराना बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.


मारुल ह. ता. पाटण येथील 1 कोरोनाबाधित तर 1 जणांचा मृत्यू;काल मृत्यू पावलेल्या रुग्णाचा अहवाल कोरोनाबाधित.

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
             $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

सातारा दि. 3 (जिमाका) : कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथे उपचार घेत असलेल्या मारुल ह. ता. पाटण येथील 35 वर्षीय पुरुषाचा अहवाल कोरोनाबाधित आला आहे.  तसेच क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयात दाखल असणाऱ्या शिरवळ ता. खंडाळा येथील 83 वर्षीय कोरोनाबाधित वृध्दाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

                तसेच काल दि. 2 जुलै रोजी क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील सातारा तालुक्यातील लिंब येथील 56 वर्षीय पुरुषाचा सारीने मृत्यू झाला होता. त्याच्या घशातील नमुना कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. याचा अहवालही कोरोनाबाधित आला आहे, अशी माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.

मौजे दत्तनगर कोडोली ग्रामपंचायत क्षेत्रात

सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र आदेश जारी

सातारा दि. 3 (जिमाका): सातारा तालुक्यातील मौजे दत्तनगर कोडोली  क्षेत्रात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने. या गावच्या क्षेत्रात  पुढील आदेशाप्रमाणे उपविभागीय दंडाधिकारी तथा इन्सिडंट कमांडर, सातारा उपविभाग, सातारा मिनाज मुल्ला यांनी सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहेत.

सातारा तालुक्यातील विविध सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्राची सीमारेषा खालीलप्रमाणे

त्यानुसार बाधित क्षेत्रातील आपत्कालीन व जीवनावश्यक वस्तूंच्या सेवा व पुरवठा सुरळीत राहण्याकरीता अन्य व्यक्तींना संबंधित प्रतिबंधित क्षेत्रामध्ये प्रवेश करण्यास व परिसरातून बाहेर पडण्यास बंदी करण्यात येत आहे. प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केलेल्या क्षेत्रामध्ये अत्यावश्यक सेवा व वस्तू पुरवठा करण्याकरीताची वेळ ही जिल्हा दंडाधिकारी यांनी यापूर्वीच दिलेल्या आदेशाप्रमाणे राहील.  या परिसरात  जीवनावश्यक वस्तुंचा, अत्यावश्यक सेवा पुरविणारे कार्यालय व  व्यक्तींना, व त्यांच्या वाहनांना यामधून वगळण्यात येत आहे. जीवनावश्यक वस्तु व सेवा (दुध व दुग्धोत्पादन, किराणा माल, फळे व भाजीपाला इ.) यांच्या वाहतूकीसाठी कोणतेही निर्बंध नसून त्यासाठी वाहतूक पास संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे उपलब्ध होतील. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये दुध, भाजीपाला, औषधे, किराणामाल इ. वस्तू घरपोच करण्यात याव्यात. त्याचे नियोजन गावामध्ये संबंधित गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांनी आदेशाप्रमाणे स्वतंत्रपणे करावे व त्यावर संबंधित तहसीलदार यांनी योग्य ते नियंत्रण करावे. तसेच प्रतिबंधित क्षेत्रामधील सर्व नागरिकांनी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा.

22 नागरिकांना डिस्चार्ज तर 358 नागरिकांचे घशातील नमुने तपासणीला.

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
             $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

सातारा दि. 3 (जिमाका) :  जिल्ह्यात विविध रुग्णालयात व कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेवून कोरोनातून बऱ्या झालेल्या 22 नागरिकांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

                यामध्ये  कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे येथील 35 वर्षीय पुरुष, नायगाव येथील 40 वर्षीय महिला, वय 14 व 15 वर्षीय युवती, करंजखोप येथील 40 वर्षीय महिला व 21 वर्षीय युवक, कोरेगाव ग्रामीण रुग्णालयातील 39 वर्षीय महिला.,

 

कराड तालुक्यातील वडगांव येथील वय 20 व 44 वर्षीय महिला,  तारुख येथील 24 वर्षीय पुरुष,

 

पाटण तालुक्यातील कोयनानगर येथील 21 वर्षीय महिला. बागलवाडी येथील 60 वर्षीय पुरुष.,

 

फलटण तालुक्यातील शेऱ्याचीवाडी आनंदगाव येथील 38 वर्षीय महिला, शेरेवाडी (हिंगणगाव) येथील वय 61 व 32 वर्षीय पुरुष, 27 वर्षीय महिला, 10 वर्षीय मुलगा, फलटण शहरातील रविवार पेठेतील 3 वर्षीय बालक.,

 

खंडाळा तालुक्यातील झगलवाडी येथील 50 वर्षीय पुरुष.,

 

वाई तालुक्यातील कडेगाव येथील 74  वर्षीय पुरुष.

 

सातारा तालुक्यातील वाढे फाटा येथील 65 वर्षीय पुरुष व 56 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.

 

358 नागरिकांचे घशातील नमुने तपासणीला

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथुन 32, कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथुन 41, उपजिल्हा रुग्णालय कराड येथून 64, ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथून 6,  ग्रामीण रुग्णालय वाई येथून  11,  शिरवळ येथून 39, रायगाव येथे 38, पानमळेवाडी येथून 40, मायणी येथून 11, महाबळेश्वर येथून 3, पाटण येथून 9, दहिवडी येथून 40, खावली येथून 24 अशा एकूण 358 नागरिकांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस.पुणे व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथे तपासणीला पाठविण्यात आले आहेत.


Thursday, July 2, 2020

*जिल्ह्यातील 43 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित तर रामवाडी येथील 58 वर्षीय पुरुषाचा मृत्यु*

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
             $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

सातारा दि. 3 (जि. मा. का) : काल रात्री उशीरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटर मध्ये येथे उपचार घेत असलेल्यामध्ये निकट सहवासित 35, प्रवास करुन आलेले 3, सारी 4, आरोग्य सेवक 1 असे एकूण  43 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आले असून यामध्ये 24 पुरुष व 19 महिलांचा समावेश आहे. जावली तालुक्यातील रामवाडी येथील 58 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

यामध्ये  *कराड तालुक्यातील * तारुख येथील 60 वर्षीय महिला व 40 वर्षीय पुरुष, कोरीवले येथील 8 वर्षीय बालक, नडशी येथील 33 वर्षीय महिला, हजारमाची येथील 35 वर्षीय महिला, गोळेश्वर येथील 12 वर्षीय युवक व 36 वर्षीय महिला, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 32 वर्षीय महिला डॉक्टर, मलकापूर येथील 29 वर्षीय महिला

*पाटण तालुक्यातील* कुंभारगाव येथील 18 वर्षीय युवती

*माण तालुक्यातील* कोलेवाडी दहिवडी येथील 36 वर्षीय पुरुष, खडकी येथील 75,42 वर्षीय महिला व 17,15,22,53 वर्षीय पुरुष.

*फलटण तालुक्यातील* आदंरुड येथील 52 वर्षीय पुरुष

*जावळी तालुक्यातील* करहर येथील 52 वर्षीय्‍ महिला, 7 वर्षीय बालक, रामवाडी येथील 15,19,70,26,23 वर्षीय महिला व 12,48,58,60,27 वर्षीय पुरुष, मुनावळे येथील 42 वर्षीय पुरुष

*कोरेगाव तालुक्यातील* जांब खुर्द येथील 31 वर्षीय पुरुष, जिहे येथील 19, 47 वर्षीय पुरुष व 62, 60 वर्षीय महिला, दुर्गळवाडी येथील 23 वर्षीय पुरुष,

*सातारा* येथील भंडारी प्लाझा, गोडोली येथील 32 वर्षीय पुरुष, रविवार पेठ येथील 58 वर्षीय महिला, यादव गोपाळ पेठ येथील 27 वर्षीय महिला, प्रतापगंज पेठ येथील 46 वर्षीय पुरुष, कोडोली येथील 75 वर्षीय पुरुष

खटाव तालुक्यातील पडळ येथील 55 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

*एका बाधिताचा मृत्यु*

क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील मुंबई येथून प्रवास करुन आलेला जावली तालुक्यातील रामवाडी येथील 58 वर्षीय कोरोना बाधित पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. या रुग्णास मधुमेह व अतिउच्च रक्तदाबाचा त्रास होता अशीही माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

Wednesday, July 1, 2020

जिल्ह्यातील 38 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित तरसातारा येथील दोन बाधितांचा मृत्यु.

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

सातारा दि. 2 (जि. मा. का) : काल रात्री उशीरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटर मध्ये येथे उपचार घेत असलेल्यामध्ये निकट सहवासित 28, प्रवास करुन आलेले 6, सारी 1, आय.एल.आय (श्वसनाचा सौम्य जंतू संसर्ग ) 2, आरोग्य सेवक 1 असे एकूण  38 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आले असून यामध्ये 25 पुरुष व 13 महिलांचा समावेश आहे तसेच सातारा येथील दोन बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

यामध्ये  खंडाळा  तालुक्यातील शिरवळ येथील चव्हाण आळी येथील 20 वर्षीय युवक व 50 वर्षीय महिला, शिरवळ मधील शिंदेवाडी येथील 36, 21 व 30 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 28 वर्षीय पुरुष,

कराड तालुक्यातील तारुख येथील 70 वर्षीय पुरुष,  आगाशिवनगर मलकापूर येथील 24 व 32 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 29 वर्षीय पुरुष, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 26 वर्षीय पुरुष

वाई तालुक्यातील सोनगीरीवाडी धोम कॉलनी येथील 58 वर्षीय पुरुष व 11 वर्षीय युवक, 27 व 55 वर्षीय महिला, ब्राम्हणशाही येथील 72 वर्षीय पुरुष व 4 वर्षीय बालक, 27 वर्षीय महिला व 8 वर्षीय बालिका, सोनजाई विहार बावधन नाका येथील 16,20,40 वर्षीय महिला, खानापूर येथील 27 वर्षीय पुरुष व 49 वर्षीय महिला, शिरगाव येथील 31 वर्षीय पुरुष

सातारा तालुक्यातील शाहूनगर येथील 20 वर्षीय युवक, जैतापूर येथील 30 वर्षीय पुरुष, जरंडेश्वर नाका येथील 48 वषीय् महिला, संगमनगर येथील 14 वर्षीय मुलगी,खावली येथील 46 वर्षीय पुरुष, करंजे येथील40 वर्षीय पुरुष, अपशिंगे येथील 18 वर्षीय युवक

कोरेगाव तालुक्यातील तडवळे येथील 34 वर्षीय महिला व 6 वर्षीय बालिका,

पाटण तालुक्यातील कोयनानगर येथील 55 वर्षीय पुरुष, काजरेवाडी, खाले येथील 35 वर्षीय पुरुष

फलटण तालुक्यातील घाडगेवाडी येथील 58 वर्षीय पुरुष

खटाव  तालुक्यातील कातरखटाव येथील 22 वर्षीय पुरुष यांचा समावश आहे.

सातारा येथील दोन बाधितांचा मृत्यु

 काल रात्री  सातारा येथील  गुरुवार पेठ येथील 54 वर्षीय महिला व रविवार पेठ येथील 49 वर्षीय पुरुष यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची  माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.

         54 वर्षीय महिलेस तीव्र मूत्रपिंडाचा आजार व अतिउच्च रक्तदाबाचा त्रास होता तसेच व 49 वर्षीय पुरुष कोल्हापूर येथून प्रवास करुन आलेले असून त्याला अतिउच्च रक्तदाबाचा त्रास होता.


जिल्ह्यातील 14 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित ;**क्षेत्र माहुली येथील 3 जणांना डिस्चार्ज तर 293 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

सातारा दि. 1 (जि. मा. का):   जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटर मध्ये येथे उपचार घेत असलेल्यामध्ये निकट सहवासित  10 व प्रवास करुन आलेले 2, आय.एल.आय (ILI) 2  असे एकूण 14 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित  आले आहे. तसेच आज 3 जणांना 10 दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

यामध्ये *पाटण* तालुक्यातील बेलवडी येथील 63 वर्षीय पुरुष

*खंडाळा* तालुक्यातील शिरवळ येथील 75 वर्षीय महिला

*माण* तालुक्यातील काळेवाडी येथील 42 वर्षीय पुरुष, म्हसवड येथील 65, 50, 27  वर्षीय पुरुष व 26 वर्षीय महिला, 11 वर्षाची मुलगी

*वाई* तालुक्यातील चिंधवली येथील 28 वर्षीय पुरुष, ओझर्डे येथील 39 वर्षीय महिला, कवठे येथील 45 वर्षीय महिला, 28 वर्षीय महिला, सहयाद्रीनगर येथील 60 वर्षीय पुरुष व 39 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.

*3 जणांना आज डिस्चार्ज*

सातारा तालुक्यातील क्षेत्र माहुली येथील 47 वर्षीय महिला, 16 वर्षीय युवक व 19 वर्षाची युवती यांना आज 10 दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.

*293 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, येथील 50, कृष्णा मेडिकल 61, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 70, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 30, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 2, वाई 5, रायगाव 44, पानमळेवाडी येथील 6, महाबळेश्वर 3, दहिवडी 22 असे एकूण 293 जणांच्या घशातील स्त्रावांचे  नमुने एन.सी.सी.एस, पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...