रॉयल सातारा न्युज* $
~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे ती म्हणजे नविन कामगार नियमानुसार आठवड्यातुन तीन दिवस सुट्टी मिळणार आहे . म्हणजेच आठवड्यातुन केवळ चार दिवस काम करावे लागणार आहे . यामुळे वेतनात कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येणार नाहीत , परंतु या नविन लेबर कोडचे काही नियम स्पष्ट करण्यात आले आहेत .
मिडीया रिपोर्ट नुसार नविन कामगार नियमामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना आठवड्यातुन तीन दिवस सुट्टी मिळणार , परंतु चार दिवसामधील कामाच तास वाढविण्यात येणार आहे . म्हणजेच जुन्या लेबर कोडनुसार दिवसाला कामाचे तास 8 होते ,तर नविन कामगार नियमानुसार कामाचे 10 तास करण्यात येणार आहे .ज्यामुळे आठवड्यातुन तीन दिवस सुट्टी शक्य आहे .शिवाय सरकारी कार्यालयामध्ये , शिफ्ट पद्धतीने काम केले जाणार आहे .त्याचबरोबर खाजगी कंपनी सारखे अतिरिक्त कामाचा मोबदला देखिल सरकारी कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे .
मिडीया वृत्तानुसार सरकारकडुन 44 केंद्रीय श्रम कायद्याचे एकत्रिकरण करुन नविन 4 कामगार संहिता तयार करण्यात येणार आहे .सदर नियमांची अंमलबजावणी खाजगी कंपनींना देखिल लागु होण्याची शक्यता आहे .