**सातारा नगरपालिकेच्या बांधकाम विभागात बोगस कागदांचा सुळसुळाट;दुसऱ्याच्या नावाची बोगस कागदपत्रे जमा करून नवीन कॉन्टॅक्टदारांना दिला जात आहे नाहक त्रास...*
सातारा नगरपालिकेच्या बांधकाम विभागात खळबळजनक प्रकार घडला असून एका ठेकेदाराच्या नावाचे बोगस लेटर बनवून बांधकाम विभागात जमा करण्यात आले होते.आठ दिवसांपुर्वी हा प्रकार संबधित ठेकदाराला समजल्यानंतर हे प्रकरण तिथल्या तिथेच मिटवण्यात आल्याने याची वाच्छ्ता कोठेही झाली नाही.
मात्र या संबधित बोगसगिरी झालेल्या प्रकरणाची कागदपत्रे "रॉयल सातारा न्युज"च्या हाती लागल्याने हा गंभीर प्रकार उघडकीस आला.बांधकाम विभागातील या गंभीर प्रकरणाची दखल सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी घेऊन बांधकाम विभागाची झाडा-झडती घेणे आवश्यक झाले आहे. बोगस लेटर देणारे कोण? हे शोधून काढले गेले पाहिजे.त्याच प्रमाणे बांधकाम विभागात आणखी काही बोगसगिरीचा प्रकार घडला आहे का? याची पाळेमुळे खणून काढणे गरजेचे झाले आहे.
सातारा नगरपालिकेचा बांधकाम विभाग या न त्या कारणाने नेहमीच चर्चेत राहिला आहे.चार दिवसांपुर्वीच सर्वसाधारण सभेत बांधकाम विभागात चाललेला भोंगळ कारभार सत्ताधारी नगरसेवक तसेच विरोधी पक्षांनी एकत्र येऊन चव्हाट्यावर आणला होता.सभेत मालशे पुलाच्या प्रकरणावरुन बांधकाम विभागाला धारेवर धरले होते.हे प्रकरण शांत होत नाही तोवर बांधकाम विभागात आणखी एक गंभीर प्रकार घडला आहे.
सातारा शहरातील एका ठेकेदाराने पहिल्यांदाच सातारा नगरपालिकेत बांधकाम विभागातील टेंडर भरले होते.ते टेंडर मंजूर ही झाले. त्याचे काम करत असताना, अज्ञात व्यक्तीने जून २०२१ महिन्यामध्ये संबंधित ठेकेदाराच्या नावाचे लेटर बनवून मिळालेले टेंडर १२ टक्क्यांनी वाढवून मिळावे. अन्यथा ते काम करण्यास असमर्थ आहे. अश्या आशयाचे लेटर बारनशी विभागात दाखल केले. बांधकाम विभागात हे लेटर पोहचल्यानंतर संबधित ठेकेदाराला आठ दिवसांपुर्वी याची विचारणा करण्यात आली.संबंधित कामाचे असे कोणतेही लेटर ठेकेदाराने दिले नसताना देखील नगरपालिकेत हे लेटर कोणी दिले.याची पडताळणी केली असता नगरपालिकेत दिलेले लेटर बोगस असून त्यावरील सही पण बोगस असल्याचे ठेकेदाराच्या निदर्शनात आले.बोगस लेटर देणार्यानी संबधित ठेकेदाराची आणि नगरपालिकेची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला होता.येवढा गंभीर प्रकार वेळीच निदर्शनात आल्या नंतर बांधकाम विभागाने हे प्रकरण वरिष्ठांचा निदर्शनात आणून द्याला हवे होते. परंतु तसे न करता हा सर्व प्रकार तिथल्या तिथेच मिटवण्यात आला. हे बोगस लेटर असल्याचे समजल्यानंतर त्या ठेकेदाराने पहिल्यांदा तक्रार देण्याचा निर्णय घेतला होता.पण हे पाहिलेच काम आहे.पुन्हा काही अडचणी नको म्हणून ठेकेदाराने ही हे प्रकरण ताणले नाही.
मात्र या संबधित बोगसगिरी झालेल्या प्रकरणाची कागदपत्रे "रॉयल सातारा न्युज "च्या हाती लागल्याने हा गंभीर प्रकार उघडकीस आला. बांधकाम विभागात चाललेल्या बोगसगिरिची चौकशी होणे गरजेचे आहे. सातारा नगरपालिकेची आणि ठेकेदाराची फसवणूक करण्याचा प्रयत्न करनार्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेणे आवश्यक असून बांधकाम विभागात आणखी काही बोगसगिरीचा प्रकार घडला किंवा घडत आहे का? याची चौकशी मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी करून या बोगसगिरिचा छडा लावावा.
No comments:
Post a Comment