Thursday, September 9, 2021

दिनांक.०९/०९/२०२१. गणेश मुर्तींचे केवळ ऑन लाईन दर्शन देण्याच्या सूचना गणेश मंडळांनी सहकार्य करण्याचे आवाहन...

            $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
गणेश मुर्तींचे केवळ ऑन लाईन दर्शन देण्याच्या सूचना
गणेश मंडळांनी सहकार्य करण्याचे आवाहन

सातारा दि.9 (जिमाका): दि. 10 ते 19 सप्टेंबर 2021 या कालावधीत गणेशोत्सव साजरा होत आहे. कोरानामुळे निर्माण झालेल्या संसर्गजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याबाबत निर्णय घेण्यात आला असून या गणेशोत्सव संबंधाने गृह विभाग, मंत्रालय मुंबई यांच्याकडील परिपत्रकानुसार मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या परिपत्रकामधील मुद्दा क्र. 10 मधील "प्रत्यक्ष येवून दर्शन घेवू इच्छीणाऱ्या भाविकांसाठी शारिरीक अंतराचे (फिजीकल डिस्टन्ससींग) तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इ.) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे." या ऐवजी "गणेश मुर्तींचे मुखदर्शन अथवा प्रत्यक्ष मंडपात येऊन दर्शन घेण्यास प्रतिबंध करण्यात येत असून दर्शन केवळ ऑनलाईन अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे उपलब्ध करुन देण्यात यावे." वरील सूचनांचे सर्व गणेश उत्सव मंडळांनी तंतोतंत पालन करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी केले आहे.
या वर्षीचा गणेशोत्सव हा शांततेत, सुरळीत व सौहार्दपुर्णे वातावरणात पार पडेल तसेच सदरवेळी कोणताही अनुचीत प्रकार होणार नाही व सर्व गणेशोत्सव मंडळांचे शासनास योग्य प्रकारे सहकार्य राहील अशी अपेक्षा व्यक्त करुन पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सर्व गणेश उत्सव मंडळांना गणेशोत्सवानिमित्ताने शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...