*कारवाईचा ससेमिरा टाळण्यासाठी नंदि" कडून जिल्ह्यातील आमदार व मंत्र्याच्या दारात साकडे?*
*वाई हरिहरेश्वर बँक प्रकरणात ठेवीदारांवर दबाव टाकण्याचे प्रयत्न;सभासदांचा आरोप*
वाई हरिहरेश्वर सहकारी बँकेत तब्बल ३७ कोटींचा आर्थिक घोटाळा? झाल्याची तक्रार सभासदांनी पुरव्यासह जिल्हा उपनिबंधक कार्यालयात केल्यानंतर जिल्हा उपनिबंधक कार्यालयातूनही संबधित घोटाळेबाजी करणार्यांवर व बँकेच्या विरोधात कारवाई करण्याचे संकेत मिळू लागल्याने वाई तालुक्यात खळबळ माजली आहे.दरम्यान कारवाईचा ससेमिरा टाळण्यासाठी व तक्रारदार सभासदांवर दबाव टाकण्याचे प्रयत्न सुरु झाले असून वाई तालुक्यातील एक नंदि" जिल्ह्यातील आमदार व मंत्र्याच्या दाराचे उंबरठे" झिजवत साकडे घालत असल्याची चर्चा वाई तालुक्यात सुरु झाली आहे.
वाई तालुक्यातील अल्पावधीतच लोकप्रिय झालेली वाई हरिहरेश्वर सहकारी बँकेने सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी शाखा सुरू करुन नागरिकांना ठेवीवर जादा व्याजदर देण्याचे कबूल करत लाखो रुपयांचा ठेवी जमा करवून घेतल्या नागरिकांनीही बँकेतील प्रतिष्ठित संचालक मंडळावर विश्वास ठेऊन बँकेत गुंतवणुक केली.काही वर्ष बँकेचे सर्व व्यवहार सुरळीत सुरु असताना बँकेतील काही संचालकानी पदाचा दुरूपयोग करुन नातेवाईकांच्या नावे करोडो रुपयांचे कर्ज प्रकरणे चुकीच्या पद्धतीने मंजुर करुन घेतले. या कर्ज प्रकरणामुळे बँक आर्थिकदृष्ट्या कमकुवत होवू लागली.
त्याचा परिणाम ठेवीदारांच्या ठेवीवर होवू लागला. मुदत संपूनही ठेवी परत मिळत नसल्याने ठेवीदार बँक प्रशासनाकडे ठेवी परत मिळवण्यासाठी तगादा लावू लागल्याने बँक प्रशासनाने व संचालक मंडळाने अचानक बँकेच्या सर्व शाखेचे व्यवहार बंद करुन बँकेला टाळे लावले. सभासदानी मुळाशी जाऊन बँकेची माहिती घेतली असता बँकेत तब्बल ३७ कोटींचा आर्थिक घोटाळा? झाल्याचं निदर्शनास आले. संबंधित बँक व घोटाळेबाजाविरोधात पुरावे गोळा करून सभासदांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात तक्रारी केल्या. जिल्हा उपनिबंधक कार्यालयातूनही तक्रारीची दखल घेतल्याने बँकेतील प्रतिष्ठित संचालक मंडळ व बँक प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. बँकेला आर्थिक डबघाईत टाकणार्यांकडून कारवाईचा ससेमिरा टाळण्यासाठी व तक्रारदार सभासदांवर दबाव टाकण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. त्यासाठी वाई तालुक्यातील एक नंदि" जिल्ह्यातील आमदार व मंत्र्याच्या दाराचे उंबरठे" झिजवत साकडे घालत असल्याची चर्चा वाई तालुक्यात सुरु झाली आहे.
*बँकेचे संचालक मंडळ मूग गिळून गप्प का?*
बँकेवर ३७ कोटींचा घोटाळा? झाल्याचा आरोप पुरव्यासह सभासदांच्या वतीने करण्यात आला तरी संचालक मंडळ संबंधित घोटाळेबाजी करणार्यांच्या विरोधात कारवाई करत नसल्याचा आरोप ही सभासदांकडून होवू लागला आहे. घोटाळ्यात सामील असलेला हा या बँकेचाच भाग असणारा व वाई येथील प्रतिष्ठित माजी लोकप्रतिनिधी असल्याने तसेच त्याची सहकार क्षेत्रातील एका मोठ्या नेत्या बरोबर उठबस असल्याने संचालक मंडळ संबंधित व्यक्ति विरोधात "मूग" गिळून गप्प बसले असल्याची चर्चा वाई तालुक्यात सुरु झाली आहे.
*काही हजार रूपये टेकवून सभासदांची बोळवण..*
वाई हरिहरेश्वर सहकारी बँकेच्या जिल्ह्यातील सर्व शाखा बंद आहेत. बँकेवर तब्बल ३७ कोटींचा घोटाळा? झाल्याचा आरोप सभासदांकडून झाल्यानंतर व जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून कारवाईचे संकेत मिळाल्याने बँक प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
बँकेचे व्यवहार सुरळीत सुरु आहे असे भासवुन काही तक्रारदार सभासदांना परस्पर घरी बोलवून काही हजार रूपये हातात टेकवून तक्रार करु नका अशी बोळवण बँक प्रशासनाकडून सुरु झाली आहे.मात्र ज्यांचे लाखो रुपयांचा ठेवी अजुनही मिळल्या नाहीत त्या सभासदांचे काय? असा सवाल सभासदांकडून उपस्थीत होत आहे.
No comments:
Post a Comment