Wednesday, July 28, 2021

दिनांक. २८/०७/२०२१.आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कोविड कर्मचारी यांना कमी केल्यास आंदोलनाचा इशारा...

             $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
 तिसऱ्या लाटेच्या अनुशंगाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कोविड कर्मचारी यांना कमी केल्यास आंदोलनाचा इशारा  .................!!!!!!!!       


 कोविड मध्ये भरती केलेले कर्मचारी कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून सेवा देत आहेत. अशा परिस्थितीत कोविड सेवा देण्यासाठी कोणीही तयार नव्हते. सध्या भयानक अशी कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. अशा स्थितीत कंत्राटी कोरोना कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पावले उचलली जात आहेत.
            सध्या सातारा जिल्ह्यात कोरोनाची भयावह अशी दुसरी लाट चालु आहे . आरोग्य तज्ञांच्या मते, ही लाट कमी होत नाही. तोवर सप्टेंबरमध्ये कित्येक पटीने कोरोना रुग्ण वाढवणारी भयानक अशी तिसरी लाट येणार आहे. सन २०२०  पासून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कोविड मध्ये भरती केलेले सर्व कर्मचारी सर्व स्तरावर उत्कृष्ट पद्धतीने कोविड सेवा बजावत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कोविड कर्मचाऱ्यांना कायम करावे. किंबहुना कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त कार्यक्षमतेने सातारा जिल्हा कोविडमुक्त करण्यासाठी कोविड मध्ये भरती केलेले कंत्राटी कर्मचारी कोविड योद्धा म्हणून सेवा बजावत आहे.
सातारा जिल्ह्यातील कोविडची दुसरी लाट सुरु असताना आणि सातारा कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर असताना केवळ निधीअभावी आमच्या पैकी  एकालाही कोविड सेवेतून कमी केल्यास  “ कोरोना योद्धा कर्मचारी परिषदेच्यावतीने ”  कोविड योद्धा प्रसंगी रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल  याची जिल्हा प्रशासनाने नोंद घ्यावी. यासाठी मा.जिल्हाधिकारी सातारा. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.सातारा. जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प.सातारा यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.     
            *निवेदन देत असताना “कोरोना योद्धा कर्मचारी परिषदेचे” महाराष्ट्र कार्यकारणीतील सरचिटणीस श्री.श्रीनिक काळे , सहसंयोजक श्री. सोहेल पठाण , औषध निर्माता अधिकारी श्री. विराज शेटे . व जिल्हा कार्यकारणी मधील उमेश गायकवाड, डॉ. विशाल विरकर , सुरज शिंदे, सौ. सुषमा चव्हाण ,कु. गौरी भोसले , कु. प्रज्ञा गायकवाड ,सर्व तालुका अध्यक्ष व पदाधिकारी आणि सातारा जिल्हातील सर्व कोविड योद्धे इत्यादी उपस्थित होते*

1 comment:

  1. कोरोना योद्यांना न्याय हा मिळालाच पाहिजे

    ReplyDelete

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...