$ *रॉयल सातारा न्युज* $
~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
मेढा पोलीस ठाणे येथे तारीख 6/07/2019 रोजी दाखल गुन्ह्याचा तपास मेढा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री अमोल माने यांनी माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल यांचे मार्गदर्शन व सूचनांनुसार गुप्त माहितीदारा मार्फत बातमी मिळवून माननीय अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील व माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती डॉक्टर शितल जानवे-खराडे यांचे अधिपत्याखाली मेढा पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण तपास पथक तयार करून त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक श्री विकास शिंदे, पोलीस हवालदार 1323 नितीन जाधव, पोलीस हवलदार 300 संजय ओव्हाळ, चालक पोलीस हवलदार 318 जितेंद्र कांबळे, पोलीस ना 45 इम्रान मेटकरी, पोलीस ना 2180 अमोल पवार, पोलीस कॉन्स्टेबल 2526 सनी काळे, पोलीस कॉन्स्टेबल 235 पद्मसेन घोरपडे, पोलीस कॉन्स्टेबल 48 अभिजीत वाघमळे, पोलीस कॉन्स्टेबल २३६२ रमेश बरकडे, यांना योग्य त्या सूचना देऊन मयत बैलाचे आरोपीचा शोध घेऊन त्यात अटक करणे बाबत आदेश दिल्याने सदर पथक वरिष्ठांच्या सूचना आणि मार्गदर्शनानुसार मौजे किकवी, तालुका-भोर,जिल्हा -पुणे गावच्या हद्दीत भरणाऱ्या आठवडी बैल बाजारात दाखल झाले तेथे त्यांनी अत्यंत चतुराईने सदर बैलाचे मारेकऱ्यांचा यांचा शोध घेऊन माहिती प्राप्त करून आरोपी नामे कुमार प्रकाश पडवळ वय 28 वर्ष राहणार कुंभारवाडी पोस्ट-आसले, तालुका-वाई, जिल्हा-सातारा यास ज्या पिकअप जीप मधून त्याने बैलास आणले व क्रूर वागणूक देऊन मेढा पोलीस ठाणे हद्दीत सरताळे कॅनॉल लगत असले शेताच्या बांधावर मारून टाकले त्या पिकअप क्रमांक एम एच 11 सी एच 2329 सह ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने सदर बैलाला मारून टाकले बाबतची कबुली दिलेने त्यास सदर गुन्ह्याचे तपास कामी अटक केली आहे सदर गुन्ह्यात आणखी आरोपी असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याने मेढा पोलीस ठाण्याचे नमूद गुन्हे प्रकटीकरण तपास पथक आरोपीत्यांचे शोध कामी रवाना झाले.
सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांचे मार्गदर्शन व सूचनांनुसार आणि माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री धीरज पाटील व माननीय उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीमती डॉक्टर शितल जानवे-खराडे यांचे अधिपत्याखाली मेढा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री अमोल माने पोलीस उपनिरीक्षक श्री विकास शिंदे,,पोलीस हवालदार 1323 नितीन जाधव, पोलीस हवलदार 300 संजय ओव्हाळ, चालक पोलीस हवलदार 318 जितेंद्र कांबळे, पोलीस ना 45 इम्रान मेटकरी, पोलीस ना 2180 अमोल पवार, पोलीस कॉन्स्टेबल 2526 सनी काळे, पोलीस कॉन्स्टेबल 235 पद्मसेन घोरपडे, पोलीस कॉन्स्टेबल 48 अभिजीत वाघमळे, पोलीस कॉन्स्टेबल २३६२ रमेश बरकडे,
No comments:
Post a Comment