बँकांची वेळासाठी सुधारित आदेश जारी ;
सकाळी 11 ते 2 या वेळात फक्त अत्यावश्यक सेवेतील क्षेत्रासाठी बँका सुरु राहतील
सातारा दि. 1 (जिमाका): कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, सातारा जिल्हयात जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार दि .31 मे च्या आदेशानुसार दिनांक 8 जून पर्यंत सुधारित आदेश जारी केले आहेत. या आदेशात पुढील प्रमाणे दुरुस्ती करण्यात येत आहे. “ सहकारी, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSU व खाजगी बँका व सहकारी बँका यांच्याशी संबंधित फक्त शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या अनुषंगाने पीक कर्जाचे, खते, बी-बियाणे, शेती औजारे यांची दुकाने, गॅस एजन्सीज, पेट्रोल पंप, मेडीकल यांचे रोख व्यवहार इ. कामकाज, एटीएम मध्ये पैसे भरणे, चेक क्लिअरन्स, डाटा सेंट ही कामे कार्यालयीन कामकाजादिवशी सकाळी 11 ते दुपारी 2 या कालावधीत चालू राहील. तसेच या बँकांचे उर्वरित सर्व कामकाज पूर्णपणे बंद राहील. या ठिकाणी गर्दी होणार नाही. तसेच कारोनाचे अनुषंगाने सोशल डिस्टन्सींगचे काटेकोरपणे पालन केले जाईल. याची जबाबदारी संबंधित बँक व्यवस्थापक यांची राहील. ”
परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
सातारा दि.1 (जिमाका) : परदेशामाध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजने अंतर्गत अनुसूचित जाती व नवबोध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाकरिता विद्यार्थ्यांकडून परदेश शिष्यवृत्तीसाठी दि. 14 जून 2021 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांने विहीत नमुन्यातील अर्ज शासनाच्या www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरील रोजगार या लिंकवरुन डाऊनलोड करुन घ्यावा. हा परिपूर्ण अर्ज swf.applications.2122@gmail.
No comments:
Post a Comment