Monday, May 24, 2021

दिनांक. २५/०५/२०२१. *बँकांचे कामकाज 11 ते 1 यावेळेत सुरु**जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी केले आदेश जारी*...

             $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏

*बँकांचे कामकाज 11 ते 1 यावेळेत सुरु*

*जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी केले आदेश जारी*

सातारा दि. 24 (जिमाका): सहकारी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम व खासगी बँका, सहकारी बँका दि. 22 मे 2021 रोजीच्या आदेशान्वये 1 जून 2021 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. तथापी जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी दि. 25 मे 2021 रोजीपासून 1 जून रोजीच्या सकाळी 7 पर्यंत या कालावधीत फक्त एटीएममध्ये पैसे भरणे, चेक क्लिअरन्स, डाटा सेंटरशी संबंधित बँकांचे कामकाज कार्यालयीन कामकाजादिवशी सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत चालू ठेवण्यास परवानगी दिली आहे. तसेच बँकांचे सर्व उर्वरित कामकाज पूर्णपणे बंद राहील याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी आज जारी केले आहेत.


No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...