Friday, May 14, 2021

दिनांक. १४/०५/२०२१. सद्य:स्थितीतील निर्बंध 1 जून पर्यंत वाढविलेजिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांचे आदेश / माहे मे व जून चे अन्नधान्य वितरण, ई पॉसद्वारे होणार वितरण...

            $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏

माहे मे व जून चे अन्नधान्य वितरण, ई पॉसद्वारे होणार वितरण

            सातारा दि. 14 (जिमाका) : राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम 2013 तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना माहे मे व जुन 2021 मध्ये वितरीत करण्यात येणारे अन्नधान्य पुढील प्रमाणे.

            माहे मे  2021 मध्ये अंत्योदय अन्न योजना  (प्रती कार्ड 25 कि. गहू व 10 कि. तांदुळ )  व प्राधान्य कुटुंब लाभर्थी (प्रती माणसी 3 कि. गहू व 2 कि. तांदुळ  मोफत वितरीत करण्यात येणार आहे.

            प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अनुज्ञेय असलेल्या अन्न्धान्याव्यतिरिक्त प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना व अंत्योदय अन्न योजना कुटुंबातील सदस्यांना प्रतिसदस्य 3 कि. गहू व 2 कि. तांदुळ याप्रमाणे   वितरीत करण्यात येणार आहे.

            माहे जून 2021 मध्ये अंत्योदय अन्न योजना (प्रती कार्ड 25 कि. गहू व 10 कि. तांदुळ ) व प्राधान्य कुटुंब लाभार्थी  (प्रती माणसी 3 कि. गहु व 2 कि. तांदुळ गहू रु. 2/- प्रति किलो व तांदुळ रु. 3/- प्रति किलो या दराने वितरीत करण्यात येणार आहे. प्रधनमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्ष  योजनेंतर्गत अनुज्ञेय असलेलया अन्नधान्याव्यतिरिक्त  प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना व अंत्योदय अन्न योजना कुटुंबातील सदस्यांना प्रतिसदस्य  3 कि. गहू व 2 कि. तांदुळ याप्रमाणे   वितरीत करण्यात येणार आहे.

            सातारा जिल्ह्यातील 28210 अंत्योदय कार्डधारकांना व 1676616 प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण रास्त भाव दुकानातून ई पॉस (e pos) द्वारे करण्यात येणार आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी कळविले आहे.

                                                                        00000

 


 

सद्य:स्थितीतील निर्बंध 1 जून पर्यंत वाढविले

जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांचे आदेश

            सातारा दि. 14 (जिमाका) : सातारा जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोख्याण्याच्या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी सातारा जिल्ह्यातील सद्यस्थितीत लागू असलेले निर्बंध दिनांक 1 जून रोजी सकाळी 7.00 वा. पर्यंत वाढविण्यात आले असल्याचे आदेश जारी केले आहेत.

            या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधितांनी टाळाटाळ केल्यास अथवाविरोध दर्शविल्यास संबंधितां विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 अनुसार तसेच भरतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय व कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

                                               

No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...