Wednesday, January 13, 2021

दिनांक. १३/०१/२०२१. अजिंक्यताऱयाचा लवकरच कायापालट होणार...

               
               $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी ~~🙏
किल्ले अजिंक्यतारा सुशोभिकरण करणे या विषयाला सातारा पालिकेच्या इतिहासातील पहिली किल्ले अजिंक्यताऱयावरील वेशेष सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजूरी देण्यात आली. ही सभा नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली राजसदरेवर पार पडली. ऍड. दत्ता बनकर यांनी अजिंक्यताऱयाच्या सुशोभिकरणाचा विषयाची माहिती दिली. शेखर मोरे-पाटील यांनी गडाच्या वाटेवरील स्ट्रीट लाईट, ओपन जीम सुरु करण्यात यावी, अशी मागणी केली.  
ऐतिहासिक अशा सभेला सातारा विकास आघाडी, नगरविकास आघाडी, भाजपाचे नगरसेवक उपस्थित होते. या सभेत सभा सचिव हिमाली कुलकर्णी यांनी विषय वाचन केले. त्यानंतर शेखर मोरे-पाटील म्हणाले, किल्ले अजिंक्यताऱयावर येणाऱया रस्त्यावर स्ट्रीट लाईट सुरु करावी तसेच किल्यावर ओपन जीमही सुरु करण्यात यावी, अशी मागणी केली. ऍड. दत्ता बनकर म्हणाले, अत्यंत चांगला असा दिवस आहे. विशेष सभेच्या नियोजनाची बैठक महाराजसाहेबांच्यासोबत झाली तेव्हा त्यांनी लगेच अनुमती दिली. अन् अजिंक्यतारा सुशोभित करण्याचा विषय घेण्यात आला. महाराष्ट्रातील नामांकित आर्किटेक्ट यांच्याकडून डीपीआर तयार करण्यात येणार आहे. गडावरील तलावांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. गडावरील राजसदर असेल, मंदिरे असतील त्यांचेही नुतनीकरण करण्याच्या अनुषंगाने त्यात समावेश करण्यात येणार आहे. साउंड इफेक्ट देवून प्रयत्न केले जातील, मी उपनगरध्यक्ष असताना व नगराध्यक्ष डॉ. अच्युत गोडबोले यांच्या कार्यकाळात शासनाने 10 कोट रुपयांची तरतूद केली होती. तो निधी त्यावेळी मिळाला नव्हता. पालिकेच्या चालू बजेटमध्ये अजिंक्यताऱयासाठी तरतूद करू, असे सांगत, दक्षिण दरवाजातून आम्ही येतो, त्यामुळे अजिंक्यताऱयाबाबत मला माहिती आहे. आमच्या काळात नगरपालिकेने 10 लाख खर्च करून काम केले होते. आता हद्दवाढ झाल्यामुळे जबाबदारी आहे. सर्वांची जबाबदारी आहे. संपूर्ण अजिंक्यतारा डेव्हलपमेंट प्लॅन तयार करू, आपल्या ताब्यात असलेली गार्डन आहे. तेथे काही लोक झाड तोडतात. फॉरेस्ट आणि आर्कोलॉजी विभागाला सहभागी करून घेऊ, डीपीआर तयार करू, अजिंक्यताऱयाच्या विकासासाठी सुरुवात आपण करु असे त्यांनी सांगितले. बाळासाहेब ढेकणे म्हणाले, किल्याच्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. तो रस्ता अगोदर तयार करुन घेवू यात, अशी मागणी केली.  

निशांत पाटील म्हणाले, आजचा ऐतिहासिक क्षण आहे. बऱयाच सूचना झाल्या आहेत. सगळ्या सातरकरांची इच्छा आहे की अंजिक्यताऱयाच संवर्धन व्हाव ही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मी फोटोच पुस्तकं पाहिलं होतं. त्यात अजिंक्यताऱयाचा चांगला फोटो त्यांनी काढलेला आहे. चांगल प्रेझेंटेशन त्यांच्यापुढे केलं तर निधी मिळेल. राजकारण न करता सर्वांनी एकत्र येवून फाटे न फोडता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर चांगले प्रेझेंटेशन केले तर निश्चित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अजिंक्यताऱयासाठी निधी देतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.  

नगराध्यक्षा माधवी कदम म्हणाल्या, आज मला सभेविषयी सांगावं वाटत. ही ऐतिहासिक सभा घेतोय. सगळेजण नशीबवान आहेत. चार वर्षांपासून मी या उत्सवाला येतेय. येथे सभा घेण्याविषयी आम्हाला इच्छा होते. तांत्रिक अडचणी होत्या. आज विशेष सभा किल्यावर होत असून हा मोठा महाराष्ट्राचा गौरव आहे. ह्या वर्षीच्या बजेटमध्ये 60 लाखाची तरतूद केली होती पुढे वाढविण्यात येणार आहे, असेही त्यांनी आश्वासन दिले.  

बाळासाहेब ढेकणे यांनी सादर केला पोवाडा
खासदार उदयनराजे यांचे कट्टर समर्थक व खंदे मावळे म्हणून बाळासाहेब ढेकणे यांना ओळखले जाते. त्यांच्या अनेक लखबी सातारकरांना ज्ञात आहेत. त्यातील एक म्हणजे जेव्हा इंदिरा गांधी या साताऱयात आल्या होत्या. तेव्हा शाहीर फरांदे यांनी एक पोवाडा गायला होता. तोच पोवाडा आज राजसदरेवर बाळासाहेब ढेकणे यांनी सादर केला. गडावर गड अजिंक्य गड असा तो पोवाडा आहे.  




छत्रपती शाहु महाराजांचे मातृसंस्थेत स्मारक असावे  
इतिहासकार अजय जाधवराव यांनी केली भावना व्यक्त  
12एसएटीए14
ततततत : तत

प्रतिनिधी
सातारा  
भारताच्या इतिहासात प्रथमच मातृसंस्था असलेल्या सातारा पालिकेची सभा होण्याचा मान गडावर मिळतोय हे अनन्य साधारण महत्व आहे. या किल्याला आमच्यासाठी काशी विश्वेश्वराइतकच महत्व आहे. या किल्यावर छत्रपती शहाजीराजे यांच्यापासून ते शाहू महाराजांच्यापर्यंत पदस्पर्श लागलेले आहेत, असे सातारा शहराचे आणि किल्ले अजिंक्यताऱयाचे महत्व विषद करत इतिहासकार अजय जाधवराव यांनी मातृसंस्थेत छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक व्हावे, अशी भावना व्यक्त केली.  
स्वाभिमान दिनाच्या निमित्ताने ते किल्ले अजिंक्यताऱयावर ते बोलत होते. अजय जाधवराव म्हणाले, या किल्याचे महत्व वाढवलं ते छत्रपती शाहू महाराजांनी. महान असा राजा होवून गेला, त्यांनी शहराची निर्मिती केली. शहराला ग्रामदैवत नाही कारण सातारा हे खेड नव्हतं. सातारा शहराबाबतचा उल्लेख 1720 मध्ये पेशवे बाजीराव यांच्या पत्रात आढळतो. शाहू महाराजांच्या दर्शनासाठी आलो आहे, असे म्हणतो आहे. शहराचे संस्थापक म्हणून आपण सातारकर त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेले आहे. बेंगलोर या शहराचे संस्थापक छत्रपती शहाजी महाराज आहेत, असे सांगत छत्रपती शाहु महाराज यांनी सातारा शहराची निर्मिती केली. त्यांनी 1707 पासून सतत दहा वर्षे हिंदुस्थानवर राज्य केले. शाहू महाराजांनी उत्तर हिंदूस्थान खेचून आणले. सातारा शहराचे वर्चस्व रामेश्वर येथे पहायला मिळते. इस्लामी राजवटीत मंदिरे बंद केली होती. परकीय राजवटीतून ती मुक्त केली. गोव्याला शांता दुर्गाच मंदिर छत्रपती शाहू महाराजांनी उभं केले. आजही तेथे सोन्याची पालखी निघते.  साताऱयाचे देणं आहे. त्याच छत्रपती शाहू महाराजांची समाधी माहुलीला आहे. तिच्या जीर्णोद्धाराचा पहिला नारळ याच कार्यक्रमात तीन वर्षापूर्वी फुटला. राजू शेठ भारावले अन् त्या समाधीचा मुहूर्त रचला. नदी पत्रात समाधीचा जीर्णोद्धार करण्यात आल्याचे त्यांनी सांगत सातारा पालिकेच्या नव्या वास्तूत छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक असावे अशी भावना व्यक्त केली.  
राजू शेठ म्हणाले, शाहु महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार क्करत असताना खोद काम करताना 20 फूट खोल होती, ज्यांना बांधली ती खूप दूरदृष्टीतून बांधली होती. त्यापाठीमागे भावना होती. आम्ही काम सुरु केल्यानंतर पुन्हा आराखडा बदलला अन् अष्ट कोन समाधी केली. कमानीचे काम होत असताना धरणाचे पाणी सोडले अन् समाधीला वेढा पाण्याचा पडला. समाधीच्या कमानीमध्ये लॉकिंग दगड त्या पाण्यात मोबाईलच्या लाईटमध्ये बसवला. ड्रोनमध्ये व्हिडीओ काढला तर बुडबुडे दिसत होते. ती समाधी नाही तर आमच्यासाठी मंदिर आहे, असे त्यांनी सांगितले. पुढे त्यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या खंडय़ा नावाच्या कुत्र्याच्या समाधीची माहितीही त्यांनी दिली.  
स्वाभिमान दिन साताऱयाची यात्रा होणार..
आधी बारा वर्षे गडावर काम केलं आणि मग प्रत्यक्ष उत्सवाला सुरुवात केली. अशी बावीस वर्ष या स्वाभिमान दिनामागे इतिहास आहे. यंदा बातमी नाही पोस्ट नाही बॅनर नाही, स्वाभिमान दिनाचा उत्सव होत आहे. योगायोगाने हद्दवाढ झाली अन ज्या अजिंक्यताऱयाने दिल्ली राखली, अटक राखली तेथेच सभा पालिकेने घेतली. किल्यावर सभा घेणारी नगरपालिका प्रथमच आहे. छत्रपती शाहू महाराज राज्यभिषेक दिन शासनाच्या कागदावर आणायचा होता. तो आणला गेला आहे. स्वाभिमान दिनाचे हे अकरावं वर्ष आहे. पालिकेची विशेष सभा झाली. साताऱयाचा 12 जानेवारी हा यात्रा दिवस होईल. पुढे महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळांची बैठक होईल, असे त्यांनी सांगितले.  
 हस्ते सत्कार अन् दानशुरपणाचा प्रत्यय
छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीचा जीणोध्दार करणाऱया अजय जाधवराव, राजू शेठ राजपुरे यांचा सत्कार सवयभान चळवळीचे राजेंद्र चोरगे यांच्या हस्ते करण्यात आला. त्याचवेळी दानशुर म्हणून ओळखले जाणारे राजेंद्र चोरगे यांनी या अजिंक्यताऱयाच्या विकासासाठी 1 लाख रुपयांच्या घोषणा केली. व्यक्तीशः चोरगेच पहिले सातारकर वैयक्तिक अजिंक्यताऱयाच्या संवर्धनासाठी निधी देणारे ठरले असून त्यांच्या दानशुरपणाचा प्रत्यय आला आहे.  




राजधानी किल्ले अजिंक्यताऱयावर स्वाभिमान दिन उत्सव शाही पद्धतीने साजरा
सातारा भूषण पुरस्काराने अजय जाधवराव, राजूशेठ राजपुरोहित यांचा सन्मान
जगात प्रथमच किल्यावर पालिकेची झाली विशेष सभा
सनई चौघडय़ांच्या मंजूळ स्वरात, तुतारींच्या निनादात भगव्या वातारवणात उत्सवाची वाढली शान
12एसएटीए15
ततत : तत
प्रतिनिधी
सातारा  
झेंडूच्या फुलांनी सजवलेला किल्ले अजिंक्यतारा, राजसदरेवर काढलेल्या रांगोळय़ा, सनईचा मंजूळ स्वर, तुताऱयांचा निनाद, अशा शिवमय वातावरणात किल्ले अजिंक्याताऱयावर छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती शाहु महाराज यांचा स्वराज्यभिषेक व सातारा शहराचा स्थापना दिन तथा स्वाभिमान दिन शाही पद्धतीने उत्साहात पार पडला. जगात प्रथमच किल्ले अजिंक्यताऱयावर नगरपालिकेची विशेष सभा पार पडली. या सभेत अजिंक्यताऱयांच्या विकासाचा ठराव सर्वानुमते घेण्यात आला. छत्रपती शाहु महाराजांच्या समाधींचा जीर्णोद्धार करणारे अजय जाधवराव, राजुशेठ राजपुरे यांचा सातारा भुषण पुरस्कार देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
किल्ले अजिंक्यताऱयावर 300 वा स्वाभिमान दिन व शिवराज्यभिषेक उत्सव समितीच्यावतीने 11 व्या वर्षी स्वाभिमान दिन उत्साहात शाही पद्धतीने साजरा करण्यात आला. या उत्सवासाठी नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, बांधकाम सभापती सिद्धी पवार, पाणी पुरवठा सभापती सीता हादगे, महिला व बालकल्याण सभापती रजनी जेधे, नियोजन सभापती स्नेहा नलावडे, सुजाता राजेशिर्के, स्मिता घोडके, किशोर शिंदे, श्रीकांत आंबेकर, ऍड. दत्ता बनकर, शेखर मोरे-पाटील, निशांत पाटील, बाळासाहेब ढेकणे, मुख्याधिकारी अभिजीत बापट, बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे, शिवराज्यभिषेक उत्सव समितीचे मार्गदर्शक दीपक प्रभावळकर, संस्थापक अध्यक्ष सुदामदादा गायकवाड, कन्हैय्यालाल राजपुरोहित, सामाजिक कार्यकर्ते रवी पवार, शिवसेनेचे सातारा शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे, मनसेचे सातारा शहरप्रमुख राहुल पवार, भाजपाच्या दीपा झाड, दीपक भुजबळ, शिवभक्त अभि सुर्वे, मंगेश काशिद, सातारा सायकल ग्रुपचे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
किल्ले राजधानी अजिंक्यताऱयाचे प्रवेशद्वार स्वाभिमान दिनानिमित्ताने सजवण्यात आले होते. स्वाभिमान दिनानिमित्ताने येणारे शिवभक्तांचे स्वागत गडावर सनईच्या मंजूळ अशा स्वरांनी केले जात होते. गडाला माथा टेकून शिवभक्त गडावर उत्सवाच्या ठिकाणी पोहचत होते. कार्यक्रमाची उंची संदीप मंहिद गुरुजी, दीपक प्रभावळकर यांच्या शब्दांनी वाढत होती. इतिहासकार अजय जाधवराव यांनी छत्रपत शाहू महाराज आणि अजिंक्यतारा व शाहू महाराजांची समाधीबाबत माहिती सांगून स्फुरण चेतवले. राजू शेठ यांनी राजपुरोहित यांनी कार्याची महती सांगितली असा उत्सव उंचीवर नेताना इतिहासात प्रथमच सातारा पालिकेची विशेष सभा गडावर पार पडली. त्या सभेत किल्ले अजिंक्यताऱयाच्या सुशोभिकरणाचा विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने 1 लाख रुपयांची मदत
किल्ले अजिंक्यताऱयाला उर्जिंत अवस्था आणण्यासाठी पालिकेने घेतलेल्या ठरावानंतर बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे राजेंद्र चोरगे येंनी 1 लाख रुपये देण्याची घोषणा केली. ते म्हणाले, 11 वा हा स्वाभिमान दिन साजरा होत असून इतिहासातल्या स्वाभिमान दिवसाला 300 वर्ष झालीं आहेत. मात्र, आजचा दिवस हा इतिहासात पूर्ण भारतात लिहला जाईल. बनकर साहेबानी जो महत्वाचे विषय मांडला अजिंक्यताऱयाच्या संर्वर्धनाचा तो खूप महत्वाचा आहे. किल्ले अजिंक्यताऱयाच्या संवर्धनासाठी 1 लाख रुपयांचा निधी जाहीर करतो. सर्व तोपरी सहकार्य बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून करू, असे आश्वासन त्यांनी दिले.  
सातारा भुषण पुरस्काराने अजय जाधवराव, राजु शेठ राजपूरे यांचा सन्मान
सातारा शहर वसवणाऱया छत्रपती शाहु महाराजांच्या समाधीचा जीर्णोध्दार करणारे अजय जाधवराव, राजू शेठ राजपूरे यांचा सन्मान तलवार देवून राजेंद्र चोरगे, नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, ऍड. दत्ता बनकर, मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. शंकरराव पुंभार, शरद पवार यांनी उपस्थितांचे स्वागत केले.  

No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...