Wednesday, December 2, 2020

दिनांक०२/१२/२०२०. *वन स्टॉप क्रेसीस सेंटर चालविण्यासाठी इच्छुक संस्थांनी 16डिसेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन*...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

*वन स्टॉप क्रेसीस सेंटर चालविण्यासाठी इच्छुक संस्थांनी 16 डिसेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन*

सातारा दि.2 (जिमाका): केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाकडून   तात्पुरत्या स्वरुपात शासकीय पुरुष भिक्षेकरीगृह सातारा- लोणंद रोड, सातारा या ठिकाणी 1 जुलै 2017 पासून जिल्हयातील संकटग्रस्त महिलांना वैदयकीय सुविधा, पोलीस मदत, समुपदेशन व कायदेशीर मदत तातडीने उपलब्ध होईल या करीता केंद्र सुरु केलेले आहे. या केंद्राचे दैनंदिनन कामकाज प्रभावीपणे चालण्यासाठी केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या One Stop Crises Centre च्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे, पात्रताधारक एजन्सीची निवड करावयाची आहे, त्यासाठी इच्छुक संस्थांनी 16 डिसेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे यांनी केले आहे.

मार्गदर्शक सुचनेमध्ये नमुद केल्यानुसार केंद्र व राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाकडून मान्यता देण्यात आलेल्या, महिलांवर होणाऱ्या हिंसाचाराच्या विरोधात कार्यरत असणारी सातारा जिल्हयातील आरोग्य सोसायटी संस्था बाहयस्त्रोत एजन्सी महिला समुपदेशन केंद्रे, नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृहे. हिंसाग्रस्त पिडीत महिलांच्या समस्या निवारणाकरीता काम करणारी राज्य शासनाने घोषित केलेली बाहय स्त्रोत यंत्रणा संस्था म्हणून असावी किंवा कौटुंबीक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा २००५ अंतर्गत महिलांचे संरक्षणासाठी राज्य शासनाने मान्यता दिलेली सेवा पुरविणारी संस्था ,अल्पमुदत निवासस्थान, स्वाधारगृह इ. स्वयंसेवी संस्थांमधून एजन्सीची निवड करावयाची आहे. इच्छुक मान्यताप्राप्त स्वयंसेवी संस्थांनी विहीत नमुन्यातील अर्ज मिळविण्यासाठी 9 डिसेंबर  पर्यंत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत २ रा मजला एस.टी.स्टैंड जवळ, सातारा येथे संपर्क साधावा. तसेच  मान्यताप्राप्त स्वयंसेवी संस्थांनी प्रस्ताव  १६ डिसेंबर 2020 पर्यंत कार्यालयास सादर करण्यात यावे, असेही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती ढवळे यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...