Friday, November 27, 2020

दिनांक. 27/11/2020. जिल्ह्यातील 226 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 3 बाधितांचामृत्यु/ पदवीधर व शिक्षकमतदारसंघासाठी 1 डिसेंबर रोजी मतदानमतदानाचा हक्क बजावण्यासाठीविशेष नैमित्तीक रजा...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

 *जिल्ह्यातील 226 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 3 बाधितांचा मृत्यु*

 

 सातारा दि.27 (जिमाका): जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 226 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 3 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये 

        *सातारा तालुक्यातील* सातारा 3, गोडोली 1, अहिरे कॉलनी सातारा 1, खेड 2, शाहुनगर 4, शाहुपुरी 1,   गुरुवार पेठ 1, गुरसाळे 1, सुर्ली 1, संगमनगर सातारा 1, कृष्णानगर 1, कोंडवे 1,  शिवथर 9, देगाव 1, पिंरवाडी 1, पोगरवाडी 1, मानगाव 1, जारेवाडी 2, तरडगाव 1,

*कराड तालुक्यातील* कराड 1 शनिवार पेठ 2,, गोळेश्वर 1, वाठार 1, विंग 1,  किवळ 3, उंब्रज 1,मलकापूर 7, वाखन 1, आगाशिवनगर 1, ओगलेवाडी 1,सैदापूर 1, शेरे 1,कुसुर 1,  

*पाटण तालुक्यातील* मल्हार पेठ 1, मानेगाव 1,  

*फलटण तालुक्यातील* फलटण 1, बुधवार पेठ 1, लक्ष्मीनगर 2, मलटण 1, सगुनामाता नगर 1, साखरवाडी 8, धुळदेव 4, गोखळी 1, वडजल 1, पिंपळवाडी 2, मुरुम 1, ठाकुरकी 1, नांदल 4, पाडेगाव 1, मिरेवाडी 2, तांबवे 2, ब्राम्हण गल्ली फलटण 1, स्वामी विवेकानंदनगर 1, तडवळे 1, मिरगाव 1, मारवाड पेठ फलटण 3, सुरवडी 1,    

*खटाव तालुक्यातील* खटाव 5, निमसोड 1, वडूज 3, विखळे 1,पुसेगाव 1, ललगुण 1, मायणी 2, विखळे 1, शेनवडी1,

            *माण  तालुक्यातील* तोंडले 1,  तुपेवाडी 5, दहिवडी 5, विरळी 1, बिदाल 4, बीजवडी 1,म्हसवड 8, धामणी 3, गोलेवाडी 1, देवापूर 5, वाकी 1, गोंदवले बु 7, पनव 5, महिमानगड 2, राणंद 4, विरकरवाडी 7,        

            *कोरेगाव तालुक्यातील*एकसळ 1, बोधेवाडी 1, कोरेगाव 2,  

        *जावली तालुक्यातील* मेढा 2, गावडी 1, आनेवाडी 1,

*वाई तालुक्यातील* काडेगाव 1, दत्तनगर 1,

*खंडाळा तालुक्यातील* खेड 1, लोणंद 6,  शिरवळ 6, लोणंद 3, शिंदेवाडी 1, भादे 1, खंडाळा 3,  

*इतर* 6, जाखीनवाडी 1, वडगाव 1, पाडळी 2, भादवडे 1, स्वरुपखानवाडी 1,

 बाहेरील जिल्ह्यातील मुंबई 1, कारुंडे जि. सोलापूर 1, माळशिरस 1, कडेगाव 1,

 *3 बाधितांचा मृत्यु*

            जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये पुसेगाव ता. खटाव येथील 82 पुरुष, कंकातरे मायणी ता. खटाव येथील 65 वर्षीय महिला, विखळे ता. खटाव येथील 70 वर्षीय महिला अशा एकूण 3 कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

 

*एकूण नमुने -244404*

*एकूण बाधित -50755*  

*घरी सोडण्यात आलेले -48078*  

*मृत्यू -1706* 

 *उपचारार्थ रुग्ण-971* 

0000


पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी 1 डिसेंबर रोजी मतदान

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष नैमित्तीक रजा

         सातारा दि. 27 (जिमाका):  पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या  निवडणुकीचे मतदान मंगळवार दि. 1 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत होणार आहे. या दिवशी मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी मतदानाच्या दिवशी संबंधितांना विशेष नैमित्तीक रजा देण्यात यावी, असे महाराष्ट्र राज्याचे अवर सचिव व उप मुख्य निवडणूक अधिकारी शुभा बोरकर यांनी कळविले आहे.

                    या संदर्भात राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या दि.23 जून 2011 च्या शासन निर्णयानुसार मतदारांना मतदानाच्या दिवसाची विशेष नैमित्तीक रजा मंजूर करण्यात यावी. ही रजा कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तीक रजे व्यतिरिक्त असणार आहे. शासन निर्णयाच्या अनुषंगाने संबंधितांनी योग्य ती कार्यवाही करावी, असेही अवर सचिव व उप मुख्य निवडणूक अधिकारी शुभा बोरकर यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...