पी.एम.पी.एल. बसेस पुणे मध्ये माजी सैनिकांना
वाहन चालक पदावर नोकरीची संधी
सातारा दि. 27(जिमाका) : पी.एम.पी.एल. बसेस पुणे मध्ये वाहन चालक पदासाठी जिल्ह्यातील ज्या माजी सैनिकांकडे बस चाविण्याचा ग्राह्य परवाना व बिल्ला आहे अशा माजी सैनिकांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क साधून नोंद करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सातारा कमांडर विजयकुमार पाटील (निवृत्त) यांनी कळविले आहे.
या पदासाठी रु. 18000/- प्रतिमहा वेतन व रु. 5000/- प्रोत्साहन भत्ता देण्याची तरतूद केलेली आहे. तसेच वाहनचालकांना मोफत राहण्याची सोय करण्यात येईल. तरी या संधीचा जिल्ह्यातील माजी सैनिक वाहन चालकांनी लाभ घ्यावा असेही कमांडर पाटील यांनी आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी (फोन नं. 02162-29293 ) संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment