भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. मात्र या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नसल्याचं कळतंय.
शरद पवार आणि अजित पवार हे आज सातारा दौऱ्यावर आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी संदर्भात ते साताऱ्यात आहेत. यावेळी दोन्ही नेत्यांची शिवेंद्रराजे यांनी वेगवेगळ्या ठिकाणी भेट घेतली आहे.
शिवेंद्रराजेंनी मतदारसंघातील प्रलंबित समस्या संदर्भात दोन्ही नेत्यांशी संवाद साधला. जिल्हा बँक, एमआयडीसी, वैद्यकीय महाविद्यालय आणि प्रलंबित समस्या संदर्भात निवेदन दिल्याची माहिती आहे.
सातारा एमआयडीसीतील बजाजचा महाराष्ट्र स्कूटरचा उद्योग सुरु करावा, चाळीस एकर जमीन त्यांच्या ताब्यात आहे. सर्वात जास्त जमीन ही बजाजकडे आहे. लोकांना कारखाने उभे करण्यास जागा नाही. त्यामुळे त्यांनी तिथे काहीतरी करावी नाहीतर जागा एमआडीसीकडे हस्तांतरित करावी, अशी मागणी शिवेंद्रराजेंनी अजित पवारांकडे केली आहे.
No comments:
Post a Comment