Tuesday, June 30, 2020

जिल्ह्यातील 48 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित.

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
             $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
सातारा दि. 1 (जि. मा. का): काल रात्री उशीरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटर मध्ये येथे उपचार घेत असलेल्यामध्ये निकट सहवासित 37, प्रवास करुन आलेले 5, सारी 5, आय.एल.आय (ILI) 1 असे एकूण  48 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित  आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
            यामध्ये कराड तालुक्यातील महारुगडेवाडी येथील 21 व 46 वर्षीय पुरुष, 75 वर्षीय महिला, रुक्मिणी नगर येथील 39 वर्षीय पुरुष, तारुख येथील 22,54,32,40,35 वर्षीय महिला व 11 वर्षीय युवक व 60,44 वर्षीय पुरुष, तुळसन येथील 3 वर्षाची बालिका, शनिवार पेठ येथील 22 व 26 वर्षीय पुरुष, 23,45,70 वर्षीय महिला, ओंड येथील 36 वर्षीय पुरुष. मलकापूर येथील 36, 34  वर्षीय पुरुष व 18 वर्षीय युवती.
पाटण तालुक्यातील नवसरी येथील 15 व 17 वर्षीय युवक तसेच 36 वर्षीय महिला, पालेकर वाडी येथील 50 वर्षीय पुरुष, सदा दाढोली येथील 11 व 29 वर्षीय महिला व 4 वर्षाची बालिका.  
सातारा तालुक्यातील नागठाणे येथील 45 वर्षीय महिला, रविवार पेठ येथील 39 वर्षीय पुरुष.
माण तालुक्यातील खडकी पाटोळे येथील 62 वर्षीय पुरुष.
खटाव तालुक्यातील निमसोड येथील 68 वर्षीय महिला, कन्नवडी मायणी येथील 75 वर्षीय् पुरुष, राजाचे कुर्ले येथील 33 वर्षीय पुरुष.
कोरेगाव तालुक्यातील करंजखोप येथील 8 वर्षीय बालिका.
खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 22,24,32,25 वर्षीय पुरुष व 19 व 49 वर्षीय महिला.
फलटण  तालुक्यातील कुरवली येथील 4 वर्षीय बालक, कोरेगाव येथील 5 वर्षीय बालक, जाधववाडी येथील 43 वर्षीय पुरुष,  आंदरुड येथील 35 वर्षीय पुरुष, गुणवरे येथील 51 वर्षीय पुरुष.
जावळी तालुक्यातील मार्ली येथील 82 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

सातारा तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दितील मौजे जिहे,क्षेत्रमाहुली व शाहुपूरी क्षेत्रातसुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र आदेश जारी.

सातारा  (जिमाका): सातारा  तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीतील मौजे मौजे जिहे,क्षेत्रमाहुली व शाहुपूरी क्षेत्रात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने. सातारा तालुक्यातील या तीन  गावाच्या क्षेत्रात  पुढील आदेशाप्रमाणे उपविभागीय दंडाधिकारी तथा इन्सिडंट कमांडर, सातारा उपविभाग, सातारा मिनाज मुल्ला यांनी सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहेत.

सातारा तालुक्यातील  ग्रामपंचायत हद्दीतील जिहे गावातील नाना चौक परिसर क्षेत्राची सीमारेषा खालीलप्रमाणे

त्यानुसार बाधित क्षेत्रातील आपत्कालीन व जीवनावश्यक वस्तूंच्या सेवा व पुरवठा सुरळीत राहण्याकरीता अन्य व्यक्तींना संबंधित प्रतिबंधित क्षेत्रामध्ये प्रवेश करण्यास व परिसरातून बाहेर पडण्यास बंदी करण्यात येत आहे. प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केलेल्या क्षेत्रामध्ये अत्यावश्यक सेवा व वस्तू पुरवठा करण्याकरीताची वेळ ही जिल्हा दंडाधिकारी यांनी यापूर्वीच दिलेल्या आदेशाप्रमाणे राहील.  या परिसरात  जीवनावश्यक वस्तुंचा, अत्यावश्यक सेवा पुरविणारे कार्यालय व  व्यक्तींना, व त्यांच्या वाहनांना यामधून वगळण्यात येत आहे. जीवनावश्यक वस्तु व सेवा (दुध व दुग्धोत्पादन, किराणा माल, फळे व भाजीपाला इ.) यांच्या वाहतूकीसाठी कोणतेही निर्बंध नसून त्यासाठी वाहतूक पास उपविभागीय पोलीस अधिकारी, सातारा यांच्याकडे उपलब्ध होतील. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये दुध, भाजीपला, औषधे, किराणामाल इ. वस्तू घरपोच करण्यात याव्यात. त्याचे नियोजन गावामध्ये गट विकास अधिकारी, पंचायत समिती, सातारा यांनी आदेशाप्रमाणे स्वतंत्रपणे करावे व त्यावर तहसिलदार सातारा यांनी योग्य ते नियंत्रण करावे. तसेच प्रतिबंधित क्षेत्रामधील सर्व नागरिकांनी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा.

            या आदेशान्वये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी, कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काम करणारे तसेच ग्रामपंचायतीचे अत्यावश्यक सेवेसाठी कार्यरत असलेले सर्व कर्मचारी व त्यांची वाहने तसेच शासकीय व अन्य अत्यावश्यक सेवा देण्यात येणाऱ्या वाहनांना या आदेशानुसार वगळण्यात येत आहे.

सातारा जिल्ह्यात 31 जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागूकोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जारी केले आदेश.

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
             $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

सातारा दि. 30 (जिमाका) : कोरोना विषाणूचा संसर्ग आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात  लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला असून 31 जुलै 2020 पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.  याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी खालीलप्रमाणे जारी केले आहेत.

ज्या ठिकाणी कोरोना रुग्ण सापडतो त्या ठिकाणी कंटेन्मेंट झेन जाहिर करण्याचे अधिकार इन्सिडंट कमांडर म्हणून संबंधित उपविभगीय अधिकारी यांना देण्यात आलेले आहेत. संबंधित कंटेन्मेंट झोन बाबत उपविभागीय अधिकारी हे वेगळा आदेश काढून त्या झोनमध्ये कोणत्या बाबी चालु राहतील  व कोणत्या बाबी प्रतिबंधित राहतील याबाबत सर्वांना सूचित करतील. हा आदेश कंटेन्मेंट झोन वगळता  सातारा जिल्ह्यातील इतर क्षेत्राला हे आदेश लागू राहतील. तसेच कंटेन्मेंट झोन बाबत त्या त्या क्षेत्रातील इन्सिडंट कमांडर यांचे अस्तित्वात असलेले आदेश हे संबंधित क्षेत्रात लागू राहतील. तसेच कंटेन्मेंट झेन इनॲक्टीव्ह झल्यानंतर या क्षेत्रात हे आदेश  लागू राहतील. तसेच भविष्यामध्ये जर सातारा जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळतील त्या ठिकाणी संबंधित इन्सिडंट कमांडर तथा उपविभागीय अधिकारी हे त्या ठिकाणी नव्याने कंटेन्मेंट झोन जाहिर करुन वेगळा आदेश काढून त्या झोनमध्ये कोणत्या बाबी चालु राहतील व कोणत्या बाबती प्रतिबंधित राहतील याबाबत सर्वांना सुचित करतील.

खालील गोष्टींना सातारा जिल्ह्यामध्ये प्रतिबंध राहील

सातारा जिल्ह्यातील सर्व व्यक्तींच्या हालचाली अत्यावश्यक  सेवा व वैद्यकीय सेवा या कारणाशिवाय रात्री 9 ते सकाळी 5 या कालावधीत प्रतिबंधीत करण्यात येत आहे. वय वर्ष 65 वरील व्यक्ती, persons with co morbidities, गर्भवती महिला, 10 वर्षाखालील मुले यांनी अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय सेवा वगळता घरामध्येच रहावे. त्यांना बाहेर पडण्यास प्रतिबंध राहील. सर्व शाळा कॉलेज, शैक्षणिक संस्थ, प्रशिक्षण संस्था, कोचिंग इंन्स्टिट्युट या बंद राहतील. तथापि, शैक्षणिक संस्थांची कार्यालये (विद्यापीठ, महाविद्यालय, शाळा) कर्मचारी यांना शिक्षकेत्तर कामाकरीता परवनागी देण्यात येत आहे. त्यामध्ये ई सामग्रीच्या विकासासह उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन व निकालाची घोषणा याचा समावेश राहील.  सर्व चित्रपट गृहे, जिम, व्यायमशाळा, सर्व मॉल व बाजारपेठ संकुल, स्विमींग पुल, एंटरटेनमेंट पार्क, थिएटर यासारख्या इतर सर्व जागा बंद राहतील. तथापि, सातारा जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर क्षेत्रात खुले लॉन, विना वातानुकूलीत मंगल कार्यालय, हॉल, सभागृह, घर व घराच्या परिसरात 50 लोकांच्या मर्यादेत लग्नाशी संबधित मेळावे, समारंभ संबंधित तहसिलदार तथा कार्यकारी दडाधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक राहील. रेल्वे व विमान प्रवासी वाहतूक काही ठराविक आदेशाने मान्यता दिली असल्यास किंवा Standard Operating Procedure नुसार चालू राहील. सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा, मानेरंजन शैक्षणिक, सांस्कृतिक,धार्मिक कार्यक्रम व इतर मेळावे तसेच मोठ्या संख्येने लोक जमा होणारे कार्यक्रम, परिषदा बंद राहतील. सर्व धर्मीक स्थळे व प्रार्थना स्थळे सर्वसामान्यांसाठी बंद राहतील. शॅापिंग मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट आणि हॉस्पिटॅलीटी सर्व्हिसेस बंद राहतील. तथापि, सातारा जिल्ह्यातील रेस्टॉरंट यांना जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याकडील 18 मे रोजीच्या आदेशातील अटी व शर्तीनुसार खद्यपदार्थांची होम डिलिव्हरी करण्यासाठी परवानगी असेल.

खाली बाबी जिल्ह्यामध्ये चालु राहतील

                वर प्रतिबंधीत केलेल्या (शासनाकडील दि. 31 मे च्या आदेशातील क्लॉज क्र. 8 ) सर्व बाबी  सोडून आणि whichare not explicitly prohibited or banned या सोडून इतर सर्व दुकाने, शॉप, औद्योगिक व खाजगी आस्थापना चालु ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे. प्रतिबंधित नसलेल्या कृती करण्यास कोणत्याही परवानगीची गरज नाही. क्रीडांगण, स्टेडियम  व इतर सार्वजनिक खुल्या जागेमध्ये प्रेक्षकांच्या उपस्थितीशिवाय व समुह विरहीत सामाजिक अंतर ठेवून शारीरिक व्यायाम व इतर क्रिया  करण्यास परवानगी देण्यात येत आहे. Indoor stadium किंवा Indoor portion  मध्ये कोणत्याही गोष्टीस परवानगी नाही. सर्व वैयक्तीक व सार्वजनिक वाहतुकीस पुढीलप्रमाणे परवानगी राहील. दोन चाकी (फक्त चालक), तीन चाकी व चार चाकी (1+2 व्यक्ती). सुरक्षित शारिरीक अंतर व सफाई व्यवस्थेची खबरदारी घेऊन , विहीत केलेल्या  प्रावासी क्षमतेच्या  50 टक्के क्षमतेने जिल्ह्यांतर्गत बस सेवा सुरु करण्यास परवानगी देण्यात येत आहे. सर्व मार्केट, दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेमध्ये चालु राहतील. जर गर्दी अथवा सामाजिक अंतराचे पालन न केल्यास तात्काळ बंद  करावीत.

व्यक्ती व वस्तुंच्या हालचालीबाबत विशेष सुचना

                सर्व प्राधिकारी यांनी मेडिकल प्रोफेशनल्स, नर्सेस आणि पॅरा मेडिकल स्टाफ, सॅनिटायझेशन पर्सनल आणि ॲम्ब्युलन्स यांना कोणत्याही प्रतिबंधाशिवाय राज्याअंतर्गत व राज्या बाहेर प्रवास करण्यास मान्यता द्यावी.  अंतर राज्य अंतर जिल्हा व्यक्तीच्या वाहतुकीस निर्बंध राहतील. 

                जिल्ह्यातील सर्व नागरिकांना शासकीय कार्यालयात आरोग्य सेतू या ॲपचा वापर करणे बंधनकारक राहील. तसेच हे ॲप व त्यावरील माहिती प्रत्येकाने वेळोवेळी अद्ययावत करणे बंधनकारक राहील..

राष्ट्रीय व राज्य पातळीवर खालीलप्रमाणे कोरोना प्रतिबंध अपाययोजन करणे सर्वांसाठी बंधनकार राहील

                मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्तींवर 500/- रं. दंड आकारावा. सार्वजनिक ठिकाणी, घराबाहेर व घरामध्ये जेथे लोकांचा वावर आहे तेथे असताना चेहऱ्याचे तोंडावर व नाकावर मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्तींवर 500/- रु. दंड आकारावा. सातारा जिल्ह्यातील कोणत्याही सार्वजनिक अथवा खाजगी जागेच्या ठिकाणी थुकण्यास मनाई असून, थुंकल्यास 1000/- रु. दंडा आकारावा. जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी, लोकांचा वावर असणाऱ्या खाजगी ठिकाणी तसेच वाहतुकीच्या साधमानध्ये समसाजिक अंतरपाळणे बंधनकारक आहे. कोणत्याही करणासाठी मोठ्या सेख्येने लोकांनी एकत्र येणे  यावर प्रतिबंध राहील. लग्नाशी संबंधित मेळाव्यांमध्ये 50 पर्यंत व्यक्तींना सामाजिक अंतर ठेऊन कार्यक्रम करण्यास परवानगी राहील. सातारा जिल्ह्यातील प्रतिबंधितक्षेत्र वगळून इतर क्षेत्रात खुले लॉन, विना वातानुकूलीत मंगलकार्यालय, हॉल, सभगृह, घर व घराच्या परसरात 50 लोकांच्या मर्यादेत लग्नाशी  संबंधित मेळावे, समारंभ पवानगीबाबत शासनाकडी दि. 23 जूनचे पत्र व जिल्हाधिकारी यांच्या दि. 26 जूनच्या आदेशान्वये कार्यवाही करावी. तथापि, लोकांनी गर्दी होऊ नये म्हणून  संयोजकांनी काळजी घेणे गरजेचे राहील. अंत्यविधी यासारख्या कार्यक्रमास 50 पर्यंत व्यक्तींना सामाजिक अंतर ठेऊन कार्यक्रम करण्यास परवानगी राहील. सार्वजनिक ठिकाणी दारु, पानर, तंबाखु इत्यादी सेवन करण्यास मनाई करण्यात येत आहे. दुकानामध्ये प्रत्येक ग्राहकामध्ये किमान 6 फुट अंतर राहील याची खात्री करावी तसेच दुकानामध्ये एकावेळी 5 पेक्षा जास्त व्यक्तींना घेणेस मनाई करण्यात येत आहे. या आदेशाचे ग्रामीण भागात प्रथम उल्लंघन झाल्यास रु. 500/- दंड आकरावा दुसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास रु. 1000/- दंड आकारावा तिसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास दुकानाचा परवाना तीन दिवसांसाठी निलंबित करुन सदर दुकान तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात यावे. वृत्तपत्र छपाई आणि वाटप करण्यास परवानगी देण्याता येत आहे (घरपोच वितरणासह). केश कर्तनालय, स्पा, सलून, ब्युटी पार्लर हे शासनाने दिलेलया अटी व शर्ती तसेच जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याकडील दि. 27 जून मधील अटी व शर्तीन्वये चालू ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यातील सर्व सेतू केंद्र व महा ई सेवा केंद्रे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारण यांच्याकडील दि. 11 जून मधील आदेशानुसार अटी व शर्तीन्वये चालू ठेवण्यास परवानगी राहील. सातारा जिल्ह्यातील  इंधन पंप रात्री 9 ते पहाटे 5 या कालावधीतही चालु ठेवण्यास परवानगी आहे. तथापि, रात्री मालवाहतूकीची वाहने यांना इंधनपुरवठा करणे बंधनकारक राहील. शासनाने किंवा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांनी अन्य कोणत्याही विशिष्ट, सामान्य आदेशाद्वारे परवानगी देण्यात आलेली कृती करण्यास परवानगी राहील.

                या आदेशाचे शहरी भागात प्रथम उल्लंघन झाल्यास रु. 1000/- दंड, दुसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास रु. 2000/- दंड आकारावा व तिसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास दुकानाचा परवाना तीन दिवसांसाठी निलंबित करुन सदर दुकान तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात यावे. ग्रामीण व शहरी दोन्ही भागात या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावी.

                शक्य असेल त्या ठिकाणी घरातून काम करण्यास प्राधान्य द्यावे. कामाच्या आणि व्यवसायाच्या वेळा या कार्यालयामध्ये, कामाच्या ठिकाणी मार्केटमध्ये, थर्मल स्कॅनिंग, हँडवॉश, सॅनिटायझर, याची एंन्ट्री पाँईंट व एक्झिट पॉईंट वर व्यवस्था करावी.  कामाच्याठिकाणी, सार्वजनिक उपयोगाच्या जागा व सामान्य माणसाच्या वापरात येणाऱ्या सर्व जागा व वस्तू यांचे वेळोवेळी सॅनिटायझेशन करण्यात यावे. सर्व औद्योगिक व व्यावसायिक आस्थापना यांनी त्यांचे कामगारामध्ये, कामाची पाळी बदलण्याचे वेळी, जेवणाच्या व इतर सुट्टीच्या वेळी, कामावर येतांना व कामावरुन सुटताना सामाजिक अंतर पाठणे बंधनकारक आहे.

                कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेला या आदेशात कोणत्याही प्रकारचा बदल करुन किंवा नवीन आदेश पारीत करुन या  आदेशाच्या विसंगत कोणताही आदेश, जिल्हाधिकारी सातारा यांच्या पूर्व परवानगीशिवाय पारीत करता येणार नाही.

Fw: 20 जणांना आज डिस्चार्ज ; 240 जणांचे नमुने पाठविले तपासणीला तर दोन कोरोना बाधितांचा आज मृत्यु.

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
सातारा दि. 30 (जि. मा. का): विविध रुग्णालयांत व कोरोना केअर सेंअर मध्ये उपचार घेत असलेल्या जिल्ह्यातील 20 नागरिकांचा आज 10 दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच शेजवलवाडी ता. पाटण येथील 58 वर्षीय पुरुष व वडगाव उंब्रज ता. कराड येथील 59 वर्षीय पुरुष या दोन कोरोना बाधितांचा आज उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती  जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
यामध्ये कराड तालुक्यातील सैदापूर येथील 29 वर्षीय पुरुष, सुपने येथील 37 वर्षीय महिला, तुळसण येथील 54 वर्षीय पुरुष, 1 वर्षीय बालक, चचेगाव येथील 30 वर्षीय महिला
जावली तालुक्यातील शिंदेवाडी येथील 39 वर्षीय महिला, म्हाते येथील 54 वर्षीय महिला व 62 वर्षीय पुरुष, केडांबे येथील 65 वर्षीय पुरुष
खटाव तालुक्यातील वाकळवाडी येथील 35 वर्षीय महिला व 27 वर्षीय पुरुष, म्हासुर्णे येथील 18 वर्षीय महिला, शिरसवाडी येथील 50 वर्षीय महिला, 40, 56 वर्षीय पुरुष, 2 वर्षीय बालक
माण तालुक्यातील खोकडे येथील 34 वर्षीय महिला
सातारा तालुक्यातील सावली येथील 22 वर्षीय पुरुष, राजापुरी येथील 31 वर्षीय महिला व 5 वर्षीय बालिका  यांचा समावेश आहे.
240 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
    क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 40, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 52, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 26, ग्रामीण रुग्णालय, वाई येथील 25, शिरवळ येथील 32, रायगाव येथील 25, पानमळेवाडी येथील 19, मायणी येथील 15, महाबळेश्वर येथील 2 व पाटण येथील 4 असे एकूण 240 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने  एन.सी.सी.एस, पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
दोन बाधितांचा मृत्यु
काल रात्री उशिरा कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असलेल्या शेजवलवाडी ता. पाटण येथील 58 वर्षीय पुरुष व वडगाव उंब्रज ता. कराड येथील 59 वर्षीय पुरुष या दोन कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. या दोघांना 10 दिवसापूर्वी श्वसन संस्थेच्या तीव्र जंतुसंसर्गामुळे दाखल करण्यात आले होते.
▪️घेतलेले एकुण नमुने    13240
▪️एकूण बाधित    1044
▪️घरी सोडण्यात आलेले    740
▪️मृत्यु    45
▪️उपचारार्थ रुग्ण    259.

Monday, June 29, 2020

दिनांक 29 जून 2020 *जिल्ह्याची कोरोना बाधीत रुग्ण संख्या 1031**दिवसभरात एकूण 58 नागरिक कोरोनाबाधीत

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~


*जिल्ह्याची कोरोना बाधीत रुग्ण संख्या 1031*

*दिवसभरात एकूण 58 नागरिक कोरोनाबाधीत*

*सायंकाळी 19 कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह*

सातारा दि. 29 (जि. मा. का): विविध रुग्णालयांत व कोरोना केअर सेंअर मध्ये उपचार घेत असलेल्या जिल्ह्यातील 19 नागरिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती  जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये 12 पुरुष व 7 महिलांचा समावेश असून त्यातील 4 प्रवासी, 10 निकटसहवासित आणि 5 सारीचे रुग्ण आहेत.

*जावली तालुक्यातील* रामवाडी येथील 48 वर्षीय पुरुष व 22 वर्षीय युवक, वय 42, 48, 43 व 55 वर्षीय महिला, बामणोली तर्फे कुडाळ येथील 46 वर्षीय पुरुष, आखेगणी येथील 16 वर्षीय युवक.,

*खंडाळा तालुक्यातील* शिरवळ येथील 83 वर्षीय वृध्द, व 31 वर्षीय महिला.,

*सातारा तालुक्यातील* दौलतनगर येथील 39 वर्षीय पुरुष, रेल्वेस्टेशन कॉर्टर 39 वर्षीय पुरुष, जिहे येथील 68 वर्षीय पुरुष, लिंब येथील 40 वर्षीय 2 पुरुष, क्षेत्र माहूली येथील 50 वर्षीय पुरुष.,

*वाई तालुक्यातील* धरमपुरी येथील 35 वर्षीय पुरुष व ब्राम्हणशाई  येथील 68 वर्षीय महिला.,

*माण तालुक्यातील* खडकी (पाटोळे) येथील 54 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

अनलॉक काळात शहरापेक्षा ग्रामीण क्षेत्रात बाधित वाढत आहेत ; जिल्हा प्रशासनाने संस्थात्मक विलगीकरणावर भर द्यावा.गृहमंत्री अनिल देशमुख

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
            $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
सातारा दि. 29 (जि. मा. का): कोरोनाचे संक्रमण वाढू नये यासाठी केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊन जाहीर केला होता. आता या लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिल्यामुळे शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाचे संक्रमण वाढत आहे, हे संक्रमण रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागाकडे लक्ष केंद्रीत करुन बाहेरुन येणाऱ्या नागरिकांचे संस्थात्मक विलगीकरण करुन टेस्टींगचे प्रमाण वाढवावे म्हणजे बाधितांची संख्या कमी होईल, असा विश्वास  गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज व्यक्त केला.
कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या अनुषंगाने उद्भवलेल्या परिस्थिती आणि कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा बैठक आज गृहमंत्री श्री. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला पालकमंत्री बाळासाहेब पाटील, कृषी  राज्यमंत्री विश्वजीत कदम, खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार दिपक चव्हाण, आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आदी उपस्थित होते.
राज्यातील 20 ते 22 लाख परप्रांतीय हे आपापल्या राज्यात गेले आहेत. लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिल्यामुळे उद्योग सुरु झाले आहेत त्यामुळे परप्रांतीय परत राज्यात येत आहेत कोरानाचे संक्रमण वाढू नये यासाठी येणाऱ्यांबाबत दक्षता घ्यावी. फलटण आणि जावली तालुक्यातील संसर्ग झालेल्या रुग्णांच्या  मृत्युचे प्रमाण जास्त आहे, तो दर कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत.  
बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांचे संस्थात्मक विलगीकरण करुन टेस्टींगचे प्रमाण वाढवावे यामुळे बाधितांची संख्या कमी होईल. जिल्हा प्रशासन समन्वयाने चांगले काम करीत आहे. मृत्युचे प्रमाण कमी करण्यावर भर द्यावा. बाधितांमध्ये 61 टक्के पुरुष व 39 टक्के महिला आहेत. आजपर्यंत 1 हजार 12 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून यात 21 ते 30 वर्ष वयोगटातील तरुणांचे जास्त प्रमाण  आहे. जिल्ह्यात 308  प्रतिबंधित क्षेत्र आहेत या प्रतिबंधित क्षेत्रात शासनाने दिल्या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करावी त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांची व गरोदर मातांची काळजी घ्यावी. तसेच गंभीर असलेल्या कोरोना बाधित रुग्णांसाठी टॉसिलीझुमॅब व रेमडेसिवीर हे औषध शासन खरेदी करणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 55 वर्षावरील 12 हजार कर्मचाऱ्यांना सुटी दिली आहे. 50 ते 55 वर्ष वयोगटातील पोलीस कर्मचाऱ्यांना साधेकाम दिले आहे. तसेच जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी नव्याने उभारण्यात येणाऱ्या निवासी संकुलासाठी  निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे गृहमंत्री श्री. देशमुख यांनी सांगितले.
आषाढीवारी साठी जाणाऱ्या 9 पालख्या ह्या 30 जूनला पंढरपुरात पोहचतील. 2 जुलै रोजी विठ्ठल रूक्मिणी मंदिरात भेटीचा  कार्यक्रम होईल. 18 ते 20 वारकरी हे पादुका घेऊन जातील, याचेही नियोजन झाले आहे, असेही गृहमंत्री श्री. देशमुख यांनी शेवटी सांगितले.
बैठकीच्या प्रारंभी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोरोना संदर्भात जिल्हा प्रशासन राबवित असलेल्या उपाययोजनांची तर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलीस प्रशासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली.
या बैठकीत खासदार श्रीनिवास पाटील, उपस्थित आमदार यांनीही वेगवेगळ्या सूचना केल्या. या बैठकीला अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

दिनांक 29 जून 2020 अखेर ग्रेड सेपरेटर 15 ऑगस्ट पूर्वी पूर्ण होणार**पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे आदेश*

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
                $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

*अखेर ग्रेड सेपरेटर 15 ऑगस्ट पूर्वी पूर्ण होणार*

*पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे आदेश*

सातारा दि. 29 (जि. मा. का):  सातारा जिल्ह्याच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा आणि जिल्ह्याच्या वैभवात भर घालणाऱ्या ग्रेड सेपरेटरचे काम पूर्णत्वास आले आहे. पावेई नाका ते कासकडे  व पोवई नाका ते कोरेगावकडे जाणारा रस्ता येत्या 15 ऑगस्ट पूर्वी पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज दिले

पालकमंत्री श्री. पाटील यांनी आज ग्रेड सेपरेटरच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी शेखर सिंह,  प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, अधिक्षक अभियंता शरद राजभोज, कार्यकारी अभियंता शंकर दराडे, उपभियंता राहूल अहिरे यांच्यास टीएनटी कंस्ट्रक्शन ग्रुपचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

ग्रेड सेपरेच्या कामाची मागणी ही बऱ्याच वर्षापूर्वीची होती. हे काम 2018 मध्ये सुरु करण्यात आले असून या कामावर आत्तापर्यंत 60 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. पोवई नाका येथे 8 रस्ते मिळतात, यामुळे नेहमीच वाहतुकीची कोंडी होत होती. हे काम पूर्ण झाल्यानंतर पोवई नाक्यावरील वाहतूक सुरळीत होणार आहे. उर्वरित ग्रेड सेपरेटचे काम येत्या नोव्हेंबर 2020 अखेर पूर्ण करण्याच्या सूचनाही पालकमंत्री श्री. पाटील यांनी संबंधितांना यावेळी केल्या.


Sunday, June 28, 2020

दिनांक 29 जून 2020* जिल्ह्यात 39 नागरिकांचे रिपोर्ट आले कोरोना पॉझिटिव्ह*

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

                *ब्रेकिंग  न्युज*

*जिल्ह्याची कोरोना बाधीत रुग्ण संख्या 1012*

*जिल्ह्यात 39 नागरिकांचे रिपोर्ट आले कोरोना पॉझिटिव्ह*

सातारा दि. 29 (जि. मा. का): विविध रुग्णालयांत व कोरोना केअर सेंअर मध्ये उपचार घेत असलेल्या जिल्ह्यातील 39 नागरिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती  जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
यामध्ये *खटाव* तालुक्यातील बोंबाळे येथील 20 वर्षीय महिला
*जावली* तालुक्यातील रामवाडी येथील 27 व 48, 30 वर्षीय महिला, 5 वर्षाचा बालक, आखेगनी येथील 68 वर्षीय पुरुष व 40 वर्षीय महिला, बिरामनेवाडी येथील  52 वर्षीय पुरुष
*कराड* तालुक्यातील गोळेश्वर येथील 46 वर्षीय पुरुष, चचेगाव येथील 40, 20, 45, 65 वर्षीय महिला 12 मुलगी, 20 वर्षीय युवक, 8 वर्षाचा मुलगा,  उब्रंज येथील 47 वर्षीय पुरुष व 45 वर्षीय महिला, 43 वर्षीय पुरुष, मसूर येथील 10 वर्षाचा मुलगा, 50 वर्षीय महिला,  56, 27, 23 वर्षीय पुरुष
*पाटण* तालुक्यातील सांघवड येथील 31 वर्षीय पुरुष 
*फलटण* तालुक्यातील जिंती येथील 44 वर्षीय महिला, रविवार पेठ येथील 26, 27 वर्षीय महिला, 9, 6, 4 वर्षाची मुलगी, 7 वर्षाचा मुलगा, अलगुडेवाडी येथील 65 वर्षीय पुरुष
*वाई* तालुक्यातील वाघजाईवाडी येथील 44 वर्षीय महिला, पसरणी येथील 47 वर्षीय महिला, कवठे येथील 35 वर्षीय पुरुष
*सातारा* तालुक्यातील नागठाणे येथील 53 वर्षीय पुरुष
*कोरेगाव* तालुक्यातील चौधरवाडी येथील 32 वर्षीय पुरुष
*खंडाळा* तालुक्यातील शिरवळ येथील 34 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

Saturday, June 27, 2020

जिल्ह्यात 36 नागरिकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह तर 191 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह.

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
             $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

सातारा दि. 28 (जि. मा. का): विविध रुग्णालयांत व कोरोना केअर सेंअर मध्ये उपचार घेत असलेल्या जिल्ह्यातील 36 नागरिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती  जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

यामध्ये कराड तालुक्यातील  खूबी येथील 19 वर्षीय युवक, रेठरे खु येथील 21 वर्षीय महिला, तारुख येथील 60 वर्षीय महिला

पाटण तालुक्यातील  सितापवाडी 60 व 28 वर्षीय महिला, 31 वर्षीय पुरुष

माण तालुक्यातील खांडेवाडी वारुडगड येथील 33 वर्षीय पुरुष

खटाव तालुक्यातील येळीव येथील 76 वर्षीय महिला व 24, 26 वर्षीय पुरुष

कोरेगाव तालुक्यातील बनवडी 39 वर्षीय पुरुष, किरोली येथील 26 वर्षीय पुरुष, किरोली येथील 28 वर्षीय पुरुष, नागझरी येथील 28 वर्षीय पुरुष

जावली तालुक्यातील रामवाडी येथील 48 वर्षीय महिला, 33 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय पुरुष, 26 वर्षीय महिला, 11 वर्षाचा मुलगा, 22 वर्षीय महिला, 40 वर्षीय महिला, 16 वर्षीय युवक, 18 वर्षीय महिला, 38 वर्षीय पुरुष, धोंडेवाडी येथील 65 वर्षीय पुरुष

सातारा तालुक्यातील गोडोली येथील 55 वर्षीय पुरुष,  जिहे येथील 50 वर्षीय महिला, चंदननगर कोडोली येथील 39 वर्षीय महिला, धावली  येथील 26 वर्षीय पुरुष, बोरगाव येथील 31 वर्षीय पुरुष, चोरगेवाडी येथील 50 वर्षीय पुरुष, सासपडे येथील 23 वर्षीय पुरुष

खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 60 वर्षीय महिला, शिरवळ येथील शहाजी चौक येथील 20 व 42 वर्षीय पुरुष

वाई सह्याद्रीनगर  येथील 30 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

एक रुग्ण हा पुणे येथे स्थायिक असल्याने त्याची गणना जिल्ह्याच्या रुग्ण संख्येत केलेली नाही.

191जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

एन.सी.सी.एस, पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड यांनी 191 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याचेही कळविले आहे, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

सातारा जिल्ह्यातील सलून्स, ब्युटी पार्लर दुकाने अटी व शर्तींवरसुरु करण्यास जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी.

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

सातारा जिल्ह्यातील सलून्स, ब्युटी पार्लर दुकाने अटी व शर्तींवर

सुरु करण्यास जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी

            सातारा दि. 27 (जिमाका): राज्य शासनाच्या आदेशातील मार्गदर्शक तत्वानुसार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सातारा जिल्ह्यात प्रतिबंधित क्षेत्र वगळता सर्व केशकर्तनालय/सलून दुकाने, ब्युटी पार्लर, स्पा यांना सुरु करण्यास सशर्त परवानगी दिली आहे.  नाभिक दुकाने व ब्युटीपार्लरमध्ये  सेवा देणाऱ्या ग्राहकाला सेवा देताना मास्क लावता येत नसल्यामुळे कोरोना संसर्गाची शक्यता टाळण्यासाठी काळजी घेण्यासाठी मार्गदर्शक आदेश जारी करण्यात आले आहेत. या मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे आहेत.

·                     या आदेशान्वये फक्त केशकर्तन करणे, केसांना डाय करणे, वॅक्सींग, थ्रेडींग इ. साठीच परवानगी राहील. तथापि त्वचेशी निगडीत सर्व प्रकारच्या सेवांना परवानगी राहणार नाही.

·                     केशकर्तनालयामध्ये व ब्युटी पार्लरमध्ये येणाऱ्या व्यक्तींसाठी रजिस्टर ठेवावे. या रजिस्टरमध्ये क्रमाक्रमाने येणाऱ्या ग्राहकांची नोंद करावी. त्याचप्रमाणे दुकानदाराने त्यांना संभाव्य वेळेची सूचना देवून त्याचवेळी पुन्हा येण्याची विनंती करावी. केशकर्तनालय व ब्युटी पार्लरमध्ये या नोंदीच्या क्रमाने ग्राहकांना सेवा द्यावी. प्रथम ग्राहकाचे काम संपल्यानंतर दुसरा ग्राहक सेवेसाठी दुकानात घ्यावा. केशकर्तनालय दुकाने, ब्युटी पार्लर दुकानामध्ये कारागीर व ज्या व्यक्तीचे केशकर्तन करावयाची आहे अशी एकच व्यक्ती दुकानामध्ये असतील. उर्वरित लोक दुकानाबाहेर थांबतील. मोठ्या सलून किंवा ब्युटी पार्लरमध्ये दोन खुर्चीमध्ये कमीत कमी सहा फुटाचे अंतर ठेवून अतिरिक्त कारागीराला काम करता येईल.

·                     सेवा घेणारी व्यक्ती ही मास्क लावू शकत नाही त्यामुळे केशकर्तन कारागीर, ब्युटी पार्लर चालवणाऱ्या  व्यक्ती व कारागिरांनी चेहऱ्यावर मास्क लावून त्यावर फेसशिल्ड कायमस्वरुपी घालणे बंधनकारक आहे. तसेच हातामध्ये ग्लोज घालणे व ॲप्रण घालणे बंधनकारक राहील.

·                      सलून दुकानामध्ये किंवा ब्युटी पार्लरमध्ये एका ग्राहकाला सेवा दिल्यानंतर त्यासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याचे (उदा. खुर्ची व इतर अनुषंगिक साहित्य) निर्जंतुकीकरण करणे बंधनकार राहील.

·                     एका ग्राहकाला वापरेला टॉवेल किंवा अंगावर टाकलेले कापड दुसऱ्या ग्राहकाला वापरू नये. यासाठी एकदा वापरुन झाल्यावर विल्हेवाट लावता येईल असे टॉवेल किंवा नॅपकिन इ. ची उपलब्धता करुन वापर करावा. त्यासाठी ग्राहकांच्या संख्येइतके टॉवेल व कापडाची उपलब्धता दुकानदाराने करुन ठेवावी.  

·                     काही सलून अथवा व्युटी पार्लरमध्ये फेस वॉशसाठी पाण्याच्या वाफेचा वापर केला जातो. त्यासाठी पाण्याचे वाफेत रुपांतर करण्याचे मशीन वापरले जाते. या मशिनवर लोखंडी किंवा स्टीलचे असलेली हत्यारे निर्जंतुकीकरण करता येईल. बाकीची हत्यारे ही सॅनिटायझरचा वापर करुन निर्जंतुकीकरण करावे.

·                     दुकानामध्ये येणाऱ्या लोकांनी, दुकानाबाहेरील लोकांनी सोशल डिस्टन्सींग पाळणे बंधनकारक राहील.  

·                     दुकानातील भूपृष्ठभागाचे दर 2 तासांनी सॅनिटाईज करणे बंधनकारक राहील.

*सुरक्षा आदेशाचे  उल्लंघन केल्यास पाचशे पासून 2 हजारापर्यंत दंड*

            दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन न केल्यास संबंधित दुकानधारकावर कडक कारवाई करण्यात येईल. दुकानामध्ये काम करणाऱ्या कारागीराने चेहऱ्यावर मास्क परिधान न केल्यास संबधित व्यक्तीवर रु. 500/- दंड आकारण्यात येईल तसेच दुकानामध्ये एका खुर्चीसाठी एका ग्राहकापेक्षा जास्त व्यक्तींना घेण्यास मनाई करण्यात येत आहे. या आदेशाचे ग्रामीण भागात प्रथम उल्लंघन झाल्यास रु. 500/- दंड आकारण्यात येईल. दुसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास रु. 1000/- दंड आकारण्यात येईल व तिसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास दुकानाचा परवाना तीन दिवसांसाठी निलंबित करुन दुकान तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येईल.

या आदेशाचे शहरी भागात प्रथम उल्लंघन झाल्यास रु. 1000/- दंड आकारण्यात येईल. दुसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास रु. 2000/- दंड आकारण्याता येईल व  तिसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास दुकानाचा परवाना तीन दिवसांसाठी निलंबित करुन दुकान तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येईल. ग्रामीण व शहरी या दोन्ही भागात या आदेशाची अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्थेने करावी.

जिल्ह्यातील आणखी 19 नागरिकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह कोरोनाबाधितांची आज दिवसभरातील एकूण संख्या 47

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

🌐 *ब्रेकिंग  न्युज*🌐

*आज शनिवार दिनांक 27 जून 2020 रोजी*

*जिल्ह्याची कोरोना बाधीत रुग्ण संख्या 938*

*जिल्ह्यात 47 नागरिकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह*

*185 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह*

*कोरोनाबाधित रुग्णांमध्ये 34 पुरुष व 13 महिलांचा समावेश*

*यात मुंबई येथून प्रवास करुन आलेले 12 प्रवासी, 7 निकटसहवासित मुंबई, ठाणे, शाहजहा येथून प्रवास करुन आलेले 6 प्रवासी, 18 निकटसहवासित आणि 4 सारीचे रुग्ण आहेत.*


कोरोना चाचणीसाठी साताऱ्यात सुविधा उपलब्ध करून देणार; वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यास गती देणार- उपमुख्यमंत्री अजित पवार.

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
कोरोना चाचणीसाठी साताऱ्यात सुविधा उपलब्ध करून देणार; वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यास गती देणार
- उपमुख्यमंत्री अजित पवार

▪️ शासकीय इमारतीच्या  देखभाल व दुरुस्तीसाठी निधी देणार
▪️ विकास आणि रोजगार निर्मितीसाठी तज्ञ लोकांच्या मार्गदर्शनाखाली आराखडा तयार करणार.

सातारा दि. 27 /06/2020 : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्य शासन पूर्ण खबरदारी घेत आहे. कोरोना संदर्भात काम करणाऱ्या यंत्रणेला कुठल्याही प्रकारची कमतरता भासू दिली जात नाही. रुग्णांचा रिपोर्ट लवकरात लवकर मिळावा यासाठी सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात कोविड चाचणी केंद्र  सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयतील नियोजन भवनात विकास कामांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेतला सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील,  खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आदी उपस्थित होते.
कोरोना बाधित रुग्णाला तात्काळ आरोग्य सेवा मिळण्यासाठी ऑक्सिजन, व्हेंटीलेटरच्या तसेच इत्यादी सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, लॉकडाऊनमध्ये शिथीलता देण्यात आलेली आहे. नागरिकांच्या मनातील कोरोनाची भितीही कमी झालेली आहे, परंतु  प्रत्येकाने मास्क वापरुन  व सुरक्षित अंतर ठेवूनच आपली काळजी घ्यावी  आणि शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे. आज लॉकडाऊनला शंभर दिवस झाले आहेत. लॉकडाऊनच्या काळात कुणीही उपाशी राहू नये यासाठी शासनामार्फत अन्नधान्याचा पुरवठा करण्यात आला आहे यापुढेही धान्य देण्याची शासनाची तयारी आहे.
सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजूरी देण्यात आलेली होती, परंतु आजपर्यंत या महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न सुटलेला नाही. पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी मंत्रालयाकडे पाठवलेले तीन प्रस्ताव दाखवले आहेत. कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या जागेसंदर्भात बैठक घेण्यात येणार असून पुढील 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून या शासकीय महाविद्यालयालय उभारण्याच्या कामास गती देण्यात येईल.
प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात शासकीय इमारती आहेत. यांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी आमदार फंडातून त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातील 10 टक्के निधी इमारतींच्या देखभाल दुरुस्तीसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यातील उपलब्ध पाण्याचा आढावा घेतला असता मागील वर्षी 28 टक्के धरणातील पाणीसाठा होता,आज   समाधानकारक 36 टक्के आहे. जिल्ह्यातील रस्ते हे वन विभागाच्या हद्दीतून जातात, खराब झालेल्या रस्त्यांच्या  दुरुस्तीबाबत  निर्णय जे  मंत्रालयस्तरावर असतील ते तिथे  तसेच स्थानिक पातळीवरील निर्णय पालकमंत्री व जिल्हाधिकारी घेतील.
विकासाबरोबरच रोजगार निर्मिती होण्यासाठी भविष्याच्या परिस्थितीचा विचार करुन महाराष्ट्रात मोठे उद्योग कसे येतील याचे तज्ञांच्या सल्यानुसार नुसार दूरदर्शी आराखडा  तयार करण्यात येईल.
  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला गती दिली जाईल, जिल्हास्तरावरील प्रश्न पालकमंत्री व जिल्हाधिकारी बैठक घेऊन सोडवतील तर मंत्रालयस्तरावरीलही प्रश्न गतीने सोडविले जातील, असे उपमुख्यमंत्री अजित  पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

शिवेंद्रराजेंनी घेतली शरद पवार, अजित पवारांची भेट.

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
             $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. मात्र या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नसल्याचं कळतंय.

शरद पवार आणि अजित पवार हे आज सातारा दौऱ्यावर आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी संदर्भात ते साताऱ्यात आहेत. यावेळी दोन्ही नेत्यांची शिवेंद्रराजे यांनी वेगवेगळ्या ठिकाणी भेट घेतली आहे.

शिवेंद्रराजेंनी मतदारसंघातील प्रलंबित समस्या संदर्भात दोन्ही नेत्यांशी संवाद साधला. जिल्हा बँक, एमआयडीसी, वैद्यकीय महाविद्यालय आणि प्रलंबित समस्या संदर्भात निवेदन दिल्याची माहिती आहे.

सातारा एमआयडीसीतील बजाजचा महाराष्ट्र स्कूटरचा उद्योग सुरु करावा, चाळीस एकर जमीन त्यांच्या ताब्यात आहे. सर्वात जास्त जमीन ही बजाजकडे आहे. लोकांना कारखाने उभे करण्यास जागा नाही. त्यामुळे त्यांनी तिथे काहीतरी करावी नाहीतर जागा एमआडीसीकडे हस्तांतरित करावी, अशी मागणी शिवेंद्रराजेंनी अजित पवारांकडे केली आहे.

Friday, June 26, 2020

*जिल्ह्यात 28 नागरिकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह**185 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह*

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
             $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

*जिल्ह्याची कोरोना बाधीत रुग्ण संख्या 919*

*जिल्ह्यात 28 नागरिकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह*
*185 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह*

सातारा दि. 27 (जि. मा. का): विविध रुग्णालयांत व कोरोना केअर सेंअर मध्ये उपचार घेत असलेल्या जिल्ह्यातील 28 नागरिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून 185 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती  जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
              या कोरोनाबाधित 28 रुग्णांमध्ये 21 पुरुष व 7 महिलांचा समावेश असून यात  मुंबई, ठाणे, शाहजहा येथून प्रवास करुन आलेले  6 प्रवासी, 18 निकटसहवासित आणि 4 सारीचे रुग्ण आहेत. 
बाधित रुग्णांमध्ये *वाई तालुक्यातील* कडेगाव येथील 34 वर्षीय पुरुष, पसरणी येथील 48 वर्षीय पुरुष, अमृतवाडी येथील 50 वर्षीय पुरुष, बावधन येथील 57 वर्षीय पुरुष.,

*खटाव तालुक्यातील* मायणी येथील 29 वर्षीय पुरुष.,

*सातारा तालुक्यातील* धावली(रोहोट) येथील 45 वर्षीय महिला, राजापुरी येथील 39 वर्षीय पुरुष, पाटखळ माथा येथील 28 वर्षीय पुरुष.,

*खंडाळा तालुक्यातील* शिंदे वस्ती (लोणंद) येथील 38 वर्षीय महिला, आसवली येथील 27 वर्षीय पुरुष.,

*पाटण तालुक्यातील* उरुल येथील 60 वर्षीय पुरुष.,

*कराड तालुक्यातील* तारुख येथील वय 21, 22 वर्षीय युवक तसेच वय 27, 28 व 48 वर्षीय पुरुष आणि वय 45 व 50 वर्षीय महिला,  चरेगाव येथील 4 वर्षीय बालक, वय 38 व 36 वर्षीय पुरुष आणि 32 वर्षीय महिला, बनवडी येथील 29 वर्षीय पुरुष, कराड शहरातील शनिवार पेठेतील 75 वर्षीय पुरुष.,

*कोरेगाव तालुक्यातील* नागझरी येथील 26 वर्षीय पुरुष.,

*जावळी तालुक्यातील*  रामवाडी येथील 65 वर्षीय पुरुष व 60 वर्षीय महिला, आखेगनी (रांजणी) येथील 42 वर्षीय पुरुष यांचा  समावेश आहे.


कोविड बाधित 70 वर्षीय पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यु106 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह.

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
               $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

सातारा दि. 26 ( जि. मा. का ) : काल रात्री उशीरा प्राप्त रिपोर्टनुसार  सह्याद्री हॉस्पिटल, कराड येथे पाटण तालुक्यातील सदा दाढोली येथील 70 वर्षीय कोविड बाधित पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे वाई तालुक्यातील शेंदुरजणे येथील 62 वर्षीय पुरुषाला सारी ची लक्षणे असल्याने काल दाखल करुन नमुना तपासणी करीता पुणे येथे पाठविण्यात आला आहे. त्याचा काल रात्री उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

106 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह

काल रात्री उशीरा एन.सी.सी.एस, पुणे व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड  यांच्याकडून 106 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याचे कळविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

Thursday, June 25, 2020

22 जणांचा अहवाल आला पॉझिटिव्ह

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
$ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
22 जणांचा अहवाल आला पॉझिटिव्ह
    सातारा दि.25 (जिमाका) : कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड व एन. सी. सी. एस. पुणे  यांच्याकडून प्रापत झालेल्या अहवालानुसार 22 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
    यामध्ये कराड तालुक्यातील उंब्रज येथील 26 वर्षीय पुरुष, येळगांव येथील  53,28 व 58 वर्षीय महिला, वडगाव येथील 55 वर्षीय महिला, चचेगाव येथील 45 वर्षीय महिला, 28 वर्षीय पुरुष.
कोरेगांव तालुक्यातील नायगाव येथील 40 वर्षीय महिला, 15 वर्षाचा मुलागा व 14 वर्षाची मुलगी, करंजखोप येथील 40 व 62 वर्षीय महिला, 21 वर्षीय तरुण.
फलटण रविवार पेठ येथील 68,25,62 व 60 वर्षीय महिला, सोमवार पेठ येथील 35 वर्षीय पुरुष तर फलटण तालुक्यातील  फडतरवाडी येथील 45 वर्षीय पुरुष.
वाई तालुक्यातील सुरुर येथील 50 वर्षीय पुरुष.
जावली तालुक्यातील रामवाडी येथील 58 वर्षीय पुरुष.
पाटण तालुक्यातील चाफळ येथील 27 वर्षीय पुरुष.

Wednesday, June 24, 2020

सुधारित 14 जणांचा अहवाल आला पॉझिटिव्ह

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
$ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
सुधारित
14 जणांचा अहवाल आला पॉझिटिव्ह
सातारा दि. 24 ( जि. मा. का ) : कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड व एन. सी.सी.एस. पुणे यांच्याकडून प्राप्त  झालेल्या अहवालानुसार 14 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
यामध्ये पाटण तालुक्यातील शितापवाडी  येथील 72 वर्षीय पुरुष, पालेकरवाडी (बहुले ) येथील 50 वर्षीय पुरुष व 65 वर्षीय महिला.
कराड तालुक्यातील रेठरे खुर्द येथील 45 वर्षीय महिला, तारुख येथील 20,40,56,40 व 45वर्षीय पुरुष व 7 वर्षीय मुलगी.
वाई तालुक्यातील कवठे येथील 20 वर्षीय पुरुष, एकसर येथील 25 वर्षीय पुरुष.
कोरेगांव तालुक्यातील पिंपोडे येथील 35 वर्षीय पुरुष.
सातारा तालुक्यातील  लिंब (शेरे) येथील 36 वर्षीय पुरुष.

आर्वीचे वीर जवान अक्षय यादव यांच्या कुटुंबाची गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतली भेट.

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
$ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

सातारा दि. 24 ( जि. मा. का ) :  सातारा जिल्ह्यातील कोरेगांव तालुक्यातील आर्वी येथील वीर जवान अक्षय यादव यांचे मणिपू्र येथे  निधन झाले होते. त्यांच्यावर काल त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज आर्वी येथे वीर जवान अक्षय यांच्या आई  छाया यादव यांची भेट घेऊन त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले.

            यावेळी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी यादव कुटुंबाला राज्य शासनाच्या वतीने सर्वातोपरी मदत करण्यात येणार असून श्रीमती छाया यादव यांच्या घराबाबतचा निर्णय लवकर घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी कोरेगावचे आमदार महेश शिंदे, शिवसेना उपनेते प्रा.नितीन बानुगडे पाटील, कोरेगावच्या प्रातांधिकारी किर्ती नलवडे, कोरेगावच्या तहसिलदार रोहिणी शिंदे, उपविभागीय पोलिस अधिकारी बी.बी महामुनी,   जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कमांडर विजयकुमार पाटील, जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील, आर्वीच्या सरपंच सविता राऊत, माजी पंचायत समिती सदस्य विकास राऊत विस्ताराधिकारी सपना जाधव उपस्थित होते.


Tuesday, June 23, 2020

5 जणांचा अहवाल आला पॉ‍झिटिव्‌ह तर 305 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह.

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
$ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

सातारा दि. 24 ( जि. मा. का ) : एन.सी.सी.एस, पुणे यांच्याकडून रात्री उशिरा आलेल्या रिपोर्टनुसार कराड तालुक्यातील बनवडी   येथील 32 वर्षीय पुरुष, तारुख येथील 25 वर्षीय महिला, पाटण तालुक्यातील शेजवलवाडी येथील 49 वर्षीय महिला, बोंडरी येथील 34 वर्षीय पुरुष, सातारा येथील वाढे फाटा येथील 56 वर्षीय महिला असे एकूण 5 रुग्णांचा रिपोर्ट कोविड बाधित आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

305 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह

काल रात्री उशीरा एन.सी.सी.एस, पुणे व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड  यांच्याकडून 305 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याचे कळविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

दिनांक 23 जून 2020 दोन नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह.

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
$ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
सातारा दि. 23(जिमाका) : कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे तपासणी करण्यात आलेल्या दोन नागरिकांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
    यामध्ये पाटण तालुक्यातील सडा दाडोली येथील 70 वर्षीय पुरुषाचा व कराड तालुक्यातील चरेगाव येथील 55 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

मौजे वडूथ ग्रामपंचायत क्षेत्रातसुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र आदेश जारी.

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
$ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
सातारा दि. 23 (जिमाका): सातारा  तालुक्यातील मौजे वडूथ ग्रामपंचायत क्षेत्रात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने. सातारा तालुक्यातील वडूथ  गावाच्या क्षेत्रात  पुढील आदेशाप्रमाणे उपविभागीय दंडाधिकारी तथा इन्सिडंट कमांडर, सातारा उपविभाग, सातारा मिनाज मुल्ला यांनी सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहेत.

त्यानुसार बाधित क्षेत्रातील आपत्कालीन व जीवनावश्यक वस्तूंच्या सेवा व पुरवठा सुरळीत राहण्याकरीता अन्य व्यक्तींना संबंधित प्रतिबंधित क्षेत्रामध्ये प्रवेश करण्यास व परिसरातून बाहेर पडण्यास बंदी करण्यात येत आहे. प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केलेल्या क्षेत्रामध्ये अत्यावश्यक सेवा व वस्तू पुरवठा करण्याकरीताची वेळ ही जिल्हा दंडाधिकारी यांनी यापूर्वीच दिलेल्या आदेशाप्रमाणे राहील.  या परिसरात  जीवनावश्यक वस्तुंचा, अत्यावश्यक सेवा पुरविणारे कार्यालय व  व्यक्तींना, व त्यांच्या वाहनांना यामधून वगळण्यात येत आहे. जीवनावश्यक वस्तु व सेवा (दुध व दुग्धोत्पादन, किराणा माल, फळे व भाजीपाला इ.) यांच्या वाहतूकीसाठी कोणतेही निर्बंध नसून त्यासाठी वाहतूक पास उपविभागीय पोलीस अधिकारी, सातारा यांच्याकडे उपलब्ध होतील. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये दुध, भाजीपला, औषधे, किराणामाल इ. वस्तू घरपोच करण्यात याव्यात. त्याचे नियोजन गावामध्ये गट विकास अधिकारी, पंचायत समिती, सातारा यांनी आदेशाप्रमाणे स्वतंत्रपणे करावे व त्यावर तहसिलदार जावली यांनी योग्य ते नियंत्रण करावे. तसेच प्रतिबंधित क्षेत्रामधील सर्व नागरिकांनी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा.

            या आदेशान्वये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी, कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काम करणारे तसेच ग्रामपंचायतीचे अत्यावश्यक सेवेसाठी कार्यरत असलेले सर्व कर्मचारी व त्यांची वाहने तसेच शासकीय व अन्य अत्यावश्यक सेवा देण्यात येणाऱ्या वाहनांना या आदेशानुसार वगळण्यात येत आहे.

Monday, June 22, 2020

सारी व कोविड बाधित 62 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यु.

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
$ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

सातारा दि. 23 ( जि. मा. का ) : क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा  येथे दाखल असणारा फलटण येथील सारी व कोविड बाधित 62 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान आज सकाळी मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

101 नागरिकांचे  रिपोर्ट आले निगेटिव्ह

        काल रात्री उशीरा एन.सी.सी.एस, पुणे व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड  यांच्याकडून 101 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याचे कळविण्यात आले आहे.

आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या एकूण 844 झाली असून कोरोनातून बरे झालेल्या 668 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.  विविध रुग्णालयांमध्ये कोरोनावर उपचार सुरु असणाऱ्यांची संख्या 137 इतकी झाली आहे तर   शासनाच्या नियमाप्रमाणे मृत्यू पश्चात चाचणी करायची नसल्यामुळे कराडच्या कृष्णा हॉस्पिटल मध्ये दि.19 जून रोजी  मृत्यू झालेला. मृत्यू पश्चात बाधित निघाला होता. तो बाधित मृत्यू मधून कमी केल्यामुळे आता बाधित मृत्यूची संख्या 39 झाली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.गडीकर यांनी दिली.

जिल्हाधिकारी यांच्या हस्ते कुस्ती मॅटचे वितरण

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
$ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

सातारा दि. 22 ( जि. मा. का ) :  शालेय  शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्यामार्फत क्रीडांगण विकास अनुदान योजना अंतर्गत क्रीडा साहित्य खरेदी करण्याकरिता रक्कम रुपये 7 लक्ष पर्यंत अनुदान मंजूर करण्यात येते अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी दिली.

जिल्हा नियोजन समिती, सातारा अंतर्गत जिल्हाधिकारी यांच्या प्रयत्नातून सन 2019-20 या आर्थिक वर्षामध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत क्रीडांगण विकास अनुदान योजनेतंर्गत एकूण 8 संस्थांना प्रत्येकी रक्क्म रुपये 5 लक्ष याप्रमाणे रक्क्म रुपये 40 लक्षच्या कुस्ती मॅटचा पुरवठा करण्यात येणार आहे. त्यापैकी प्रतिनिधीक स्वरुपात ग्रामपंचायत असवली ता. खंडाळा, ग्रामपंचायत अंगापूर तर्फ तारगांव ता. सातारा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पाडळी ता. सातारा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बिभवी ता. जावली या संस्थाना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते आज कुस्ती मॅटचे वितरण करण्यात आले.

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, जिल्हा नियोजन अधिकारी भगवान जगदाळे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, उप-शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, अनिल सातव राज्य क्रीडा मार्गदर्शक, दत्ता माने राज्य कुस्ती क्रीडा मार्गदर्शक, पै. जितेंद्र कणसे, एन.आय.एस क्रीडा मार्गदर्शक, पै. नवनाथ ढमाळ आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच, पै. आर.वाय. जाधव अध्यक्ष कोल्हापूर विभागीय शारिरीक शिक्षण शिक्षक संघ, यशवंत गायकवाड राजेंद्र माने उपस्थित होते.



*आज 25 जणांना सोडले घरी**171 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह*

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg

$ *रॉयल सातारा न्युज* $
~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~


सातारा दि. 22 ( जि. मा. का ) : क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 1, कोविड केअर फलटण येथील 2, कृष्णा मेडीकल कॉलेज, कराड येथील 8, बेल एअर हॉस्पिटल, पाचगणी येथील 6, कोविड केअर केंद्र खावली येथील 6, कोविड केअर केंद्र वाई येथील 1, कोविड केअर केंद्र ब्रम्हपुरी येथील 1 असे एकूण 25 रुगणांना  आज 10 दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

आज घरी सोडणाऱ्यांमध्ये *कृष्णा हॉस्पिटल, कराड* येथील *कराड तालुक्यातील* वडगांव (उंब्रज) येथील 86 वर्षीय पुरुष, , तुळसण येथील 51, 50 व 35 वर्षीय पुरुष, केसे येथील 64 वर्षीय पुरुष, *पाटण तालुक्यातील* उरुल येथील 26 वर्षीय पुरुष,जांभेकरवाडी येथील 30 वर्षीय पुरुष, नवसारी येथील 55 वर्षीय पुरुष.

तर *बेल एअर हॉस्पिटल, पाचगणी* येथील *जावली तालुक्यातील* भणंग येथील 24 वर्षीय युवती व  21 वर्षीय युवक,ओझरे येथील 5 वर्षीची बालिका, 25 वर्षीय महिला व 34 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. धोंडेवाडी येथील 65 वर्षीय पुरुष.

*कोविड केअर केंद्र, ब्रम्हपुरी*  येथे दाखल असणाऱ्यांमध्ये *कोरेगाव तालुक्यातील* साप येथील 39 वर्षीय पुरुष्.

*कोविड केअर केंद्र, वाई* येथे दाखल असणाऱ्यांमध्ये *वाई तालुक्यातील* बावधन नाका येथील 25 वर्षीय पुरुष.

*क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुगणालय, सातारा* येथे दाखल असणाऱ्यांमध्ये *जावली तालुक्यातील* धोंडेवाडी येथील 57 वषीय पुरुष.

*कोविड केअर केंद्र, खावली*  येथे दाखल असणाऱ्यांमध्ये  *सातारा तालुक्यातील* समर्थ नगर येथील 19 वर्षीय युवक, देगाव येथील 55 वर्षीय पुरुष,शहापुरी येथील 58 वर्षीय पुरुष, कारंडवाडी येथील 23 वर्षीय महिला  8 वर्षीय मुलगी, सैदापूर येथील 37 वर्षीय पुरुष.

*कोविड केअर केंद्र, फलटण*  येथे दाखल असणाऱ्यांमध्ये *फलटण तालुक्यातील* वडले येथील 24 व 52 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

*171 जणांचा अहवाल आला निगेटिव्ह*

            काल रात्री उशिरा एन.सी.सी.एस. पुणे यांचेकडून 171 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले आहे.

*248 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*

क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुगणालय, सातारा येथील 17, कृष्णा मेडीकल कॉलेज, कराड येथील 30, वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 77, ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथील 2, शिरवळ येथील 12, पानमळेवाडी येथील 16, मायणी येथील16, महाबळेश्वर येथील5, पाटण येथील24, दहिवडी येथील 49 असे एकूण 248 जणांच्या नागरिकांच्या घशातील स्त्रावाचे  नमुने एन.सी.सी.एस, पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

7 जणांचे अहवाल आले पॉझिटिव्ह

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg

$ *रॉयल सातारा न्युज* $
~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~


सातारा दि. 22 ( जि. मा. का ) : प्राप्त झालेल्या अहवालानुसार 7 नागरिकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

         यामध्ये सातारा येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या सातारा तालुक्यातील वडुथ येथील 63 वर्षीय पुरुष कोविड बाधित असल्याचे संबंधित हॉस्पिटलने कळविले आहे.

जावली तालुक्यातील म्हातेखुर्द येथील 38 वर्षीय पुरुष व 11 वर्षीय मुलगा.

फलटण तालुक्यातील कोरेगाव येथील 26 वर्षीय महिला.

कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथील 44 वर्षीय पुरुष. 

पाटण तालुक्यातील आचरेवाडी येथील 38 वर्षीय पुरुष.

कराड तालुक्यातील कोयना वसाहत येथील 40 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्या नागरिकांनीगृह विलगीकरणाचे नियम कडकपणे पाळावेत - गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

सातारा दि. 22 (जिमाका) : सातारा जिल्ह्यात बाहेरुन येणाऱ्या नागरिकांनी गृह विलगीकरणात प्रशासनाने घालून दिलेले नियम कडकपणे पाळावेत, त्यांच्या नियम तोडण्याने, जवळचे नातेवाईक, गावातील नागरिक बाधित होवू शकतात. त्यामुळे त्यांनी गाव आणि जिल्ह्याचे हित लक्षात घेवून गृह विलगीकरण कडकपणे पाळावे. गाव समितीने यावर विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात पावसाळ्यातील संभाव्य पूरपरिस्थिती आणि कोरोना संदर्भात आढावा घेतला. त्यावेळी गृहराज्य मंत्री बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, जिल्हा पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडकरी, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुध्द आठल्ये, पाटणचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे  उपस्थित होते.

             ज्या शाळांमध्ये विलगीकरण करण्यात आले आहे. त्या शाळा अतिवृष्टीत असुरक्षित असतील तर त्याची पर्यायी व्यवस्था करावी. तसेच बाहेरुन आलेल्यांना त्यांच्या राहत्या घरी किंवा त्यांच्या जवळच्या नातेवाईकांकडे विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. ते नागरिक कडकपणे विलगीकरण पाळतील यासाठी गाव समित्यांनी विशेष लक्ष द्यावे असे आवाहन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी योवळी दिले.

            पाटण आणि कराड तालुक्यात अतिवृष्टीच्या काळात पुराचा धोका असतो. हे ओळखून प्रशासनाने पावसाळयापूर्वीच एनडीआरएफ टिमचे नियोजन केले असून पाटण आणि कराडसाठी बोटी वितरित केल्या असून पूरपरिस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षणही एनडीआरएफ कडून दिले जाईल असे  गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी सांगितले.


Sunday, June 21, 2020

दिनांक 22 जून 2020 20 जणांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह.

सातारा दि. 22 ( जि. मा. का ) :  रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार 20 नागरिकांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
    यामध्ये    जावली तालुक्यातील गांजे येथील 24 वर्षीय पुरुष.
    कराड तालुक्यातील तारुख येथील 20 वर्षीय 2 पुरुष व 24 वर्षीय  पुरुष.
पाटण येथील गोवारे येथील 40 वर्षीय महिला, 24 वर्षीय पुरुष व 11 वर्षीय मुलगी, हवालेवाडी येथील 28 वर्षीय पुरुष, पालेकरवाडी येथील 42 वर्षीय पुरुष, कोयनानगर येथील 21 वर्षीय महिला, बागलवाडी येथील 60 वर्षीय पुरुष.
फलटण येथील रविवार पेठ येथील 3 वर्षीय बालक.
खटाव तालुक्यातील शिरसवाडी येथील 50 वर्षीय महिला, 40 व 56 वर्षीय पुरुष व 2 वर्षाचे बालक, म्हासूर्णे18 वर्षीय तरुणी.
सातारा तालुक्यातील क्षेत्र माहुली येथील 49 वर्षीय 2 महिला व 16 वर्षीय तरुण.

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...