Monday, June 22, 2020

जिल्हाधिकारी यांच्या हस्ते कुस्ती मॅटचे वितरण

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
$ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

सातारा दि. 22 ( जि. मा. का ) :  शालेय  शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्यामार्फत क्रीडांगण विकास अनुदान योजना अंतर्गत क्रीडा साहित्य खरेदी करण्याकरिता रक्कम रुपये 7 लक्ष पर्यंत अनुदान मंजूर करण्यात येते अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी दिली.

जिल्हा नियोजन समिती, सातारा अंतर्गत जिल्हाधिकारी यांच्या प्रयत्नातून सन 2019-20 या आर्थिक वर्षामध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत क्रीडांगण विकास अनुदान योजनेतंर्गत एकूण 8 संस्थांना प्रत्येकी रक्क्म रुपये 5 लक्ष याप्रमाणे रक्क्म रुपये 40 लक्षच्या कुस्ती मॅटचा पुरवठा करण्यात येणार आहे. त्यापैकी प्रतिनिधीक स्वरुपात ग्रामपंचायत असवली ता. खंडाळा, ग्रामपंचायत अंगापूर तर्फ तारगांव ता. सातारा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पाडळी ता. सातारा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बिभवी ता. जावली या संस्थाना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते आज कुस्ती मॅटचे वितरण करण्यात आले.

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, जिल्हा नियोजन अधिकारी भगवान जगदाळे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, उप-शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, अनिल सातव राज्य क्रीडा मार्गदर्शक, दत्ता माने राज्य कुस्ती क्रीडा मार्गदर्शक, पै. जितेंद्र कणसे, एन.आय.एस क्रीडा मार्गदर्शक, पै. नवनाथ ढमाळ आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच, पै. आर.वाय. जाधव अध्यक्ष कोल्हापूर विभागीय शारिरीक शिक्षण शिक्षक संघ, यशवंत गायकवाड राजेंद्र माने उपस्थित होते.



No comments:

Post a Comment

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...