Thursday, October 15, 2020

दिनांक. 15/10/2020. त्रैमासिकविवरणपत्र ईआर-131 ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याच आवाहन...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

त्रैमासिक विवरणपत्र ईआर-1

31 ऑक्टोबर पर्यंत सादर करण्याच आवाहन

                 सातारा दि.15 (जिमाका) : जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व  खाजगी आस्थापनांनी  तसेच जिल्ह्यातील सार्वजनिक  व खाजगी क्षेत्रातील आस्थापनांनी त्यांच्याकडे काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती पुरुष, स्त्री, एकूण ( त्रैमासिक विवरणपत्र ईआर-1) सेवायोजन कार्यालयास ऑनलाईन सादर करणे कायद्याने बंधनकारक आहे.

                त्रेमासिक विवरण पत्र (ईआर-1) दि. 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने https://rojgar.mahaswyam.gov.in  या बेबपोर्टलवर सादर करावे. प्रत्येक नोंदणीकृत आस्थापनेस युजर आयडी, रजिस्ट्रेशन आयडी व पासवर्ड यापूर्वीच दिलेला आहे.  या संदर्भात काही समस्या असल्यास, अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नवीन प्रशासकीय भवन सातारायेथे अथवा कार्यालयाच्या 02162-239938 येथे संपर्क साधावा, असे सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी कळविले आहे.

दिनांक. 15/10/2020. सुधारीत *जिल्ह्यातील 268संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 9 बाधितांचा मृत्यु*...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~

*जिल्ह्यातील 268 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 9 बाधितांचा मृत्यु*

 सातारा दि.15 (जिमाका): जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 268 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर  9 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक   डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये 

 *सातारा तालुक्यातील* सातारा 13, यादोगोपाळ पेठ 1, बुधवार पेठ 1, मंगळवार पेठ 1,  सोमवार पेठ 1, शनिवार पेठ 1, रविवार पेठ 1, बसापपा पेठ 1, मंगळवार तळे 1, सदर बझार 5, पंताचा गोट 1,  तामजाईनगर 2, शाहुपुरी 2, कृष्णानगर 1,  करंजे 8, गोडोली 5, शाहुनगर 1, शाहुपुरी 1, माची पेठ 1,  गडकर आळी 2, चिंचनेर वंदन 1, सत्वशीलनगर 1, लिंब 1, वेणेगाव 1, खोजेवाडी 4, पळशी 1, अंगापूर वंदन 1, सैदापूर 5, मत्यापुर माजगाव 1, केसरकर पेठ 1, माची पेठ सातारा 1, मालगाव 1, वडूथ 1, बोरखळ 1, गेंडामाळा सातारा 1, गडकर आळी सातारा 1, धोंडेवाडी 1, वर्ये 1, गोळीबार मैदान सातारा 1,

  *कराड तालुक्यातील* कराड 3,  मंगळवार पेठ 1, रविवार पेठ 1, शनिवार पेठ 2,  विद्यानगर 1, कोयना वसाहत 1, हजारमाची 1, वहागाव 1, रेठरे 1, अटके 2, राजमाची 1, काले 1, कोळे 1, कार्वे 1, मलकापूर 1, आगाशिवनगर 1, शामगाव 1, नंदगाव 1, कापिल 1, येळगाव 1, मसूर 1, उंडाळे 2, येळगाव 2, पेर्ले 1, ओंडोशी 1, उंब्रज 1

*फलटण तालुक्यातील* फलटण 1, मंगळवार पेठ 1, शुक्रवार पेठ 1, पवारवाडी 1, बरड 2, भादळी खुर्द 1, काळज 4, साठेफाटा 1, आदर्की 1, जाधवाडी 1, होळ 1, कोळकी 3, घोडकेवाडी 1, मलटण 2, पाडेगाव 2,  गोळखी 1,

*वाई तालुक्यातील* सोनजरविहार 1, गणपती आळी 1, ओझर्डे 2, भुईंज 2, लोहारे 1, कळंबे 1, कोलावडी 1, राऊतवाडी 1, वैराटनगर 2, बोपर्डी 1, शेदुरजणे 2,

 *पाटण  तालुक्यातील* पाटण 3, कुठरे 3, ढेबेवाडी 1, मल्हार पेठ 1, सोनाईचीवाडी 1, साबळेवाडी 4, कुंभारगाव 1, गुडे 1, बनपुरी 1,  

*खंडाळा  तालुक्यातील* वाठार बु 3, नायगाव 1, लोणंद 2, घाटदरे 1, शिरवळ 1, शिवाजीनगर खंडाळा 1, खेड बु 1,भोली 1,

 *महाबळेश्वर तालुक्यातील* पाचगणी 3, चिखली 1, ताईघाट 1, माचुतर 1,

 *खटाव तालुक्यातील* वडूज 2, जाखणगाव 1, डिस्कळ 1, दारुज 1, जाखनगाव 1, सिद्धेश्वर कुरोली 1, औंध 1, जायगाव 1,   

  *माण  तालुक्यातील* बिजवडी 1, जाशी 1, म्हस्वड 3, बीदाल 1, मलवडी 1, शिंगणापुर 3, भवानवाडी 1, पळशी 1, दहिवडी 1,

 *कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 12, करंजखोप 1, वाठार किरोली 1, रहिमतपूर 2, चंचली 2, देऊर 1, सातारा रोड 3, वाठार स्टेशन 2, पिंपोडे बु 2, जळगाव 2, आर्वी 1,  तारगाव 1, रहिमतपूर 6, धुमाळवाडी 1, सासुर्वे 1, शिरंबे 1, पेठ किन्हई 1,

 *जावली तालुक्यातील* मोरावळे 1,

*इतर* 1, रांजणी 1, फडतरवाडी 1, नडवळ 1,निगडी 1,

बाहेरील जिल्हा- शिराळा 1, कुंडलवाडी वाळवा 1, बारामती 1,

*9 बाधितांचा मृत्यु*

 क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्या शाहुपरी येथील 74 वर्षीय महिला, वडूज ता. खटाव येथील 76 वर्षीय महिला, वर्ये ता. सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, खेड नंदगिरी ता. कोरेगाव येथील 75 वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये झिरपवाडी ता. फलटण येथील 82 वर्षीय पुरुष, करवडी ता. कराड येथील 63 वर्षीय महिला. तर रात्री उशिराळ कळविलेले राजपुरा ता. सातारा 67 वर्षीय पुरुष, बेलवडे ता. कराड येथील 67 वर्षीय महिला, कोरेगाव येथील 45 वर्षीय महिला अशा  एकूण 9  कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

 *घेतलेले एकूण नमुने --167340*

*एकूण बाधित --42698*  

*घरी सोडण्यात आलेले --34498*  

*मृत्यू --1408* 

*उपचारार्थ रुग्ण- 6792*  

दिनांक.14/10/2020. भारतीय हवामान खात्याने दिला वीजेच्या गडगडाटासह पाऊस होण्याचा इशारा ; जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
भारतीय हवामान खात्याने दिला वीजेच्या गडगडाटासह पाऊस होण्याचा इशारा ;
जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन


सातारा, दि. 14 (जिमाका) : भारतीय हवामान खात्याने 13 ते 17 ऑक्टोंबर कालावधीत बहुतेक ठिकाणी वीजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. तरी अतिवृष्टीच्या कालावधीत जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्यामार्फत करण्यात आलेले आहे.
नागरिकांनी मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळावे. घराबाहेर अथवा असुरक्षित ठिकाणी असल्यास पाऊस थांबेपर्यंत सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. पाऊस पडत असताना, विजा चमकत असल्यास नागरिकांनी झाडाखाली उभे राहू नये. मोबाईलवर संभाषण करू नये आणि इलेक्ट्रीक वस्तूपासून दूर रहावे. अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा.   कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये व अफवा पसरवू नये. कुठल्याही अशा मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सुत्राकडून करून घ्यावी. अतिवृष्टी होत असताना कोणीही नदी नाला इत्यादी ठिकाणी प्रवेश करू नये. पूराच्या पाण्यात नागरिकांनी सेल्फी काढू नये. DAMINI Lighetening Alert हे ॲप आपल्या क्षेत्रात पडणाऱ्या आगाऊ वीजपडीची माहिती देते. तसेच वीजपडीपासून संरक्षण करावयाच्या उपाय योजनांची माहिती देते.  तरी हे ॲप प्ले स्टोर वरून डाऊनलोड करावे, असेही आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले आहे.

Wednesday, October 14, 2020

दिनांक. 14/10/2020. जिल्ह्यातील 354 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 18 बाधितांचा मृत्यु...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
जिल्ह्यातील 354 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 18 बाधितांचा मृत्यु
 सातारा दि.14 (जिमाका): जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 354 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 18   कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक   डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
 सातारा तालुक्यातील सातारा 8, गुरुवार पेठ 3, शनिवार पेठ 6, बुधवार पेठ 1, रविवार पेठ 2, करंजे 2, गोडोली 3, कोडोली 1,  सदरबझार 4, देगाव 3, चिंचणेर वंदन 1, काशिळ 1, कामटी 1, आवर्डे 1, वाढे 4, उंबारडे 1, गडकर आळी सातारा 2, तामाजाईनगर सातारा 14, प्रतापसिंहनगर सातारा 1, विलासपूर 2, कोंढवे 1, शाहुपुरी 3, शाहुनगर 2, सैदापूर 4, पंताचा गोट सातारा 3, कळंबे 1, सोनगाव 1, वर्णे 1, मोळाचा ओढा सातारा 1, मल्हार पेठ सातारा 1, दरे 2, देगाव फाटा 2, वेळे कामटी 1,नागठाणे 8,  
  कराड तालुक्यातील कराड 2, मंगळवार पेठ 1, सोमवार पेठ 2,  आगाशिवनगर 3, मलकापूर 6, विद्यानगर 4, कोयना वसाहत 3,  येनके 4,  गोटे 2,  , पार्ले 2, काले 4, कार्वे 2, कालवडी 1, बैल बाजार कराड 1, हिंगणगाव बु 1, सारुड 4, शेनोली 6, पोटले 1, घोगाव 1, येनपे 4, मुंढे 1, म्हासोली 1,वडगाव हवेली 5, चरेगाव 1, अटके 1, शेरे 2, कोपर्डी हवेली 1, कोर्टी 1, उंडाळे 1,
फलटण तालुक्यातील शुक्रवार पेठ 1,  फडतरवाडी 3, विढणी 1, साठे फाटा 1, तरडगाव 1, नागेश्वरनगर 1, झिरपवाडी 1, साखरवाडी 2, बरड 1, कापशी 4, कोळकी 1, मलटण 2, मुरुम 1, तडवळे 2, कापडगाव 1,
वाई तालुक्यातील यशवंतनगर 1, दरेवाडी 2, ओझर्डे 1, केंजळ 1, पसरणी 1, धर्मापुरी 1, यशवंतनगर 1, निकमवाडी 1, कवठे 1, मेणवली 1, विराटनगर 3, गंगापुरी 3, वाई 1, सिद्धनाथवाडी 1, बोपर्डी 1, खानापूर 1, चिंधवली 1,
 पाटण  तालुक्यातील कालगाव 1, सणबुर 1, मालदन 2, कुंभारगाव 2, कालगाव 1, निवडे 1, निरवळे 1, टोलेवाडी 1, त्रिपुडी 2,  
खंडाळा  तालुक्यातील खेड बु 7, भादवडे 1, बोरी 5, भादे 1, शिरवळ 1, बावडा 1,शिंदेवाडी 1, अहिरे 2, लोणंद 1,  
 महाबळेश्वर तालुक्यातील भिलार 1, पागचणी  1,
 खटाव तालुक्यातील त्रिमाळी 1, कातरखटाव 1, वडूज 6, खटाव 3, साठेवाडी 3, औंध 2, जांभ 1, जाखनगाव 1, पुसेगाव 1, कुरोली 1, विखळे 1, गणेशवाडी 5, तुपेवाडी 1,
  माण  तालुक्यातील बीजवडी 2, मार्डी 1, म्हसवड 3, मार्डी 2, मलवडी 1, भवानवाडी 3, दहिवडी 1, गोंदवले बु 1, लोधवडे 1, वडगाव 1, पळशी 1,वरकुटे मलवडी 1, विराली 1, विरकरवाडी 1,
 कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 4, रहिमतपूर 4,सासुर्वे 2, सातारा रोड 1, नागझरी 1, पिंपोडे बु 1, आसनगाव 1, एकंबे 1,सांघवी 1,  खेड 1, ल्हासुर्णे 1, शिरढोण 1, बोरगाव 1, तारगाव 2, भक्तवडी 1,
 जावली तालुक्यातीलम्हाते बु 1, मुरावळे 4, गावडी 2, भोगावली 3, कुडाळ 11,  
इतर 1, करावाडी 1, शिंदेनगर 1, पाडेगाव 2,
बाहेरील जिल्हा- तांबवे ता. वाळवा 1, शिराळा 1, कासेगाव 1, पुरंदर 1, पंढरपूर 1, नातेपुते 1, नरसेवाडी ता. तासगाव 1,  
18 बाधितांचा मृत्यु
 क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्या कोडोली ता. सातारा येथील 69 वर्षीय पुरुष, मसूर ता. कराड येथील 65 वर्षीय महिला, सोनर्डी ता. जावली येथील 70 वर्षीय पुरुष. तसेच जिल्ह्यातील खासगी हॉस्पीटलमध्ये गजानन हौसिंग सोसायटी कराड येथील 35 वर्षीय महिला, म्हासोली ता. कराड येथील 72 वर्षीय पुरुष, कराड येथील 69 वर्षीय पुरुष, रविवार पेठ वाई येथील 78 वर्षीय पुरुष, वाई येथील 67 वर्षीय महिला, बेलमाची ता. वाई येथील 83 वर्षीय महिला, कातर खटाव ता. खटाव येथील 68 वर्षीय पुरुष, उशिरा कळविलेले क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे जैतापूर ता. सातारा येथील 68 वर्षीय पुरुष, होबळवाडी ता. वाळवा येथील 60 वर्षीय रुग्ण, कळंबवाडी ता. वाळवा येथील 55 वर्षीय पुरुष, वाळवा येथील 100 वर्षीय व 38 वर्षीय पुरुष, विद्यानगर ता. कराड येथील 41 वर्षीय महिला, मोरावळे ता. जावली येथील 54 वर्षीय पुरुष, राऊतवाडी ता. वाई येथील 65 वर्षीय महिला  अशा  एकूण  18 कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
 
घेतलेले एकूण नमुने --165929
एकूण बाधित --42430  
घरी सोडण्यात आलेले --34113  
मृत्यू --1399
उपचारार्थ रुग्ण- 6918.

Tuesday, October 13, 2020

दिनांक. 13/10/2020. जिल्ह्यातील 242 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 7 बाधितांचा मृत्यु...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
जिल्ह्यातील 242 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 7 बाधितांचा मृत्यु

 सातारा दि.13 (जिमाका): जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 242 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 7 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
 सातारा तालुक्यातील सातारा 4, मंगळवार पेठ 4, शुक्रवार पेठ 1, शनिवार पेठ 5, रविवार पेठ 2, गुरुवार पेठ 2, बुधवार पेठ 2,  सदरबझार 9, देशमुख नगर 1, शाहुपुरी 11, पंताचा गोठ 1, मोळाचा ओढा 1, मल्हार पेठ 1,  कोपर्डे 1, निनाम 3, बोरखळ 1, रेवडी 2,  आर्वी 1, ढोंबरेवाडी 3, चिमणपुरा पेठ 1, संकल्प कॉलनी सातारा 1, गुजरवाडी 2, सालवाडी 1, पोवई नाका सातारा 1, अपशिंगे 1,  राधिका रोड सातारा 1, करंजे पेठ 1, देगाव 1, जकातवाडी 1, अजिंक्य कॉलनी सातारा 1, यादव गोपाळ पेठ 1, काशिळ 1, अतित 1, वाढे 3, पाटखळ 1, सैदापूर 2, देगाव फाटा 1, वडूथ 1,


   कराड तालुक्यातील कराड 12, मंगळवार पेठ 1, शुक्रवार पेठ 1, शनिवार पेठ 2,  विद्यानगर 1, कोयना वसाहत 2, आगाशिवनगर 3, शिवनगर 4, करवडी 1, सुपणे 1, वहागाव 1, केसे 2, तांबवे 1, सावदे 1, काळेवाडी 4, ओंडशी 1,कर्वे 6, मलकापूर 2, उंब्रज 2, अटके 5,   बेलदरे 1, ओगलेवाडी 1, खराडे 1, गोंदी 1, सैदापूर 1, मसूर 3, कापिल 1, कांबीरवाडी 2, बेलवडे 1, सैदापूर 1, काले 2, रेठरे खु 2, कासार शिरंबे 1,कोळे 1, वाखण रोड 1,

 फलटण तालुक्यातील  मलठण 1, विद्यानगर 1, लक्ष्मीनगर 1, डीएड चौक 1, रविवार पेठ 1,  फरांदवाडी 1, हिंगणगाव 1, बरड 1, जाधववाडी 5, सस्तेवाडी 1, वडजल 1, काळज 1, तरडगाव 1, झिरपवाडी 1, गिरवी 1, चौधरवाडी 2, जिंती नाका 1.

वाई तालुक्यातील  कवठे 1, बेलमाची 1, जांब 3, भुईंज 1, गंगापुरी 1,

 
पाटण  तालुक्यातील पाटण 1, मल्हार पेठ 1, हरगुडेवाडी 1, ढेबेवाडी 1, गारवाडी 1, चाफळ 1, मुद्रुळकोळे 1.

 खंडाळा  तालुक्यातील  अंबरवाडी 1, लोणंद 1,  अहिरे 3, बोरी 1,

महाबळेश्वर तालुक्यातील  मेन रोड पाचगणी 6.

खटाव तालुक्यातील  भोसरे 1, पडळ 1, जाखणगाव पुसेगाव 1, नागनाथवाडी 1, पुसेगाव 1, सिध्देश्वर कुरोली 1, नेर 4.

माण  तालुक्यातील बिजवडी 1, म्हसवड 1, मार्डी 1, कारखेल 1, टाकेवाडी 1, मलवडी 1,

 कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 1, वाठार स्टेशन 3, एकसळ 1, दुघी 1, रुई 1, रहिमतपूर 1,  सासुर्वे 1, वेळू 1, पिंपोडे 1, शेंदूरजणे 1, दुर्गलवाडी 1.

इतर वाठार कॉलनी 1, निगडी 1, माजगाव 1,
बाहेरील जिल्ह्यातील  इस्लामपूर 2, शिराळा 1,
7 बाधितांचा मृत्यु
 क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेतलेल्या  एकंबे ता. कराड येथील 75 वर्षीय पुरुष, कोंडवे ता. सातारा येथील 48 वर्षीय पुरुष, भक्तवाडी ता. सातारा येथील  70 वर्षीय महिला तसेच जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये कृष्णानगर ता. सातारा येथील 61 वर्षीय पुरुष, महतपुरा पेठ ता. फलटण येथील 42 वर्षीय महिला, जांब ता. खटाव येथील 78 वर्षीय पुरुष, हिंगणी ता. माण येथील 80 वर्षीय महिला अशा  एकूण 7 कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
 
घेतलेले एकूण नमुने --164293
एकूण बाधित --42076  
घरी सोडण्यात आलेले --33871  
मृत्यू --1381
उपचारार्थ रुग्ण- 6824  

दिनांक. 13/10/2020. स्व. क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयात तिसऱ्या आयसीयु कक्षाचे व 5 ऑक्सीजन मशीनचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयात  
तिसऱ्या आयसीयु कक्षाचे व 5 ऑक्सीजन मशीनचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण


सातारा दि.13 (जिमाका): स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात आज तिसऱ्या आयसीयु बेड कक्षाची नव्याने निर्मिती करण्यात आली. कोविड रुग्णांसाठी असणाऱ्या या आयसीयुकक्षात 15 बेड असून याचे  लोकार्पण आज जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते झाले. आर्ट ऑफ लिव्हींगच्यावतीने 5 ऑक्सीजन मशीन या कक्षाला देण्यात आल्या आहेत, याचेही लोकार्पण जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते झाले.
या उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते.
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात  एकूण 2 आयसीयु कक्ष आहेत आज तिसऱ्या आयसीयु कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. हा कक्ष अत्याधुनिक उपकरणांसह रुग्णांच्या सेवेसाठी आजपासून सज्ज झाला आहे. या कक्षामार्फत रुग्णांना उपचार  मिळणार आहेत.
आर्ट ऑफ लिव्हींगने ऑक्सीजन मशीन दिल्याबद्दल जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आर्ट ऑफ लिव्हींगचे आभार त्यांनी मानले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनी या कक्षाची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.

Monday, October 12, 2020

दिनांक. 12/10/2020. 338 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 498 जणांचे नमुने पाठविले तपासणीला...

https://www.youtube.com/channel/UCvp7Tk3ZFm4sSfiyw3fSaWg
              $ *रॉयल सातारा न्युज* $
 ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~
338 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 498 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

सातारा दि. 12 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 338 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 498 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
498 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 49, कराड येथील 15, फलटण येथील 22, कोरेगाव येथील 27, वाई येथील 33, खंडाळा येथील 65, रायगाव येथील 37, पानमळेवाडी येथील 27, मायणी येथील 9, महाबळेश्वर येथील 3, पाटण येथील 19, दहिवडी येथील 13, खावली येथील 7, तळमावले येथील 32, म्हसवड येथील 29 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे 111 असे एकूण 498 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
घेतलेले एकूण नमुने – 163114
एकूण बाधित -- 41834
घरी सोडण्यात आलेले ---33871
मृत्यू -- 1374
उपचारार्थ रुग्ण --  6589.

मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर्तब: मंत्री शंभूराज देसाई....

                  रॉयल सातारा न्युज* $  ~~🙏सामान्य जनतेच्या हक्का साठी 🙏~~ मोदींच्या विराट सभेत महाराजांच्या विजयावर शिक्कामोर...